शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

आता बोटातली डिजिटल अंगठी देईल कोरोनाचा अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 1:59 PM

बोटात घालायची एक साधी अंगठी, कोरोनाकृपेने डिजिटल जगण्याचं एक नवं रूप.

ठळक मुद्देडिजिटल सेफ्टी रिंग

- प्रसाद ताम्हनकर

कोविड-19 अर्थात कोरोना व्हायरसच्या साथीने जगभरातील अर्थव्यवस्था, उद्योग आणि सामान्य माणसं चांगलेच त्रस्त आहेत. जगभरातील विविध खेळांच्या स्पर्धादेखील कोरोनाच्या साथीमुळे रद्द कराव्या लागल्या आहेत. खेळाडूंची काळजी, प्रेक्षकसंख्येवर मर्यादा आणि गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार वेगाने पसरण्याचा धोका, अशा अनेक संकटांचा विचार करून क्रि केट, फुटबॉल, बास्केटबॉल अशा अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या, अथवा पुढे ढकलायला लागल्या. मात्न आता हळूहळू काही खेळांच्या स्पर्धाना सुरुवात होते आहे, हे एक आशादायक चित्न आहे. लवकरच क्रिकेटचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे, आणि त्याच जोडीला आता जगभरात प्रसिद्ध असलेल्या बास्केटबॉल खेळातील एनबीए (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) आपल्या पुढच्या हंगामाची तयारी करत आहे. मात्र हे सारं सुरू करताना खेळाडूंच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. यासाठी आता विज्ञानाच्या जोडीलाच आधुनिक तंत्नज्ञानाचीदेखील मदत घेण्यात आली आहे. 

नवीन हंगामात, खेळाडू सेफ्टी रिंग (अंगठी) घालून मैदानात प्रवेश करतील. या सेफ्टी रिंग खेळाडूमधील कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणो शोधण्यात सक्षम आहेत. तसेच खेळाडूंचे शरीराचे तापमान आणि हृदयाची गती यांचं निरीक्षणदेखील या रिंगमधील स्मार्ट तंत्नज्ञानाच्या मदतीने शक्य आहे.स्मार्ट वॉचप्रमाणोच या स्मार्ट रिंगमध्ये विविध प्रकारचे सेन्सर असतील जे खेळाडूंमधील विषाणूची लक्षणो शोधू शकतील. या ब्रेसलेटसारख्या दिसणा:या अंगठीबद्दल खास गोष्ट म्हणजे जर खेळाडूंमध्ये 6 फुटांपेक्षा कमी अंतर असेल तर ही रिंग धोक्याची सूचना म्हणून बीप बीप अशा ध्वनी निर्माण करते. 

वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठातील न्यूरोसायन्स संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार या ऑरा स्मार्ट रिंगच्या वापरासाठी मागील महिन्यात प्रस्ताव पाठविण्यात आला होता.रिंग परिधान केलेल्या खेळाडूचा डेटा अॅप व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मिळविण्याचे तंत्नज्ञानदेखील या रिंगमध्ये असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या रिंगची अचूकता  90  टक्क्यांर्पयत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. टायटॅनियम या धातूपासून बनविलेली ही सेकंड जनरेशनची ऑरा स्मार्ट रिंग आहे. ही रिंग वॉटरप्रूफ असून, हिचे वजन फक्त 4 ते 6 ग्रॅम आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सात दिवसांर्पयत ही रिंग वापरली जाऊ शकते. बॅटरी संपली की पुन्हा पूर्णपणो चार्ज होण्यासाठी रिंगला फक्त 80मिनिटे लागतात. यात इन्फ्रारेड एलईडी सेन्सर, तीन बॉडी टेम्परेचर सेन्सर आणि एक अॅक्सिलरोमीटर आहे. तसेच यात जायरोस्कोप सेन्सरदेखील देण्यात आलेला आहे. या स्मार्ट रिंगद्वारे, ती वापरणा:याचा सर्व मुख्य डेटा आयओएस किंवा अॅण्ड्रॉइड डिव्हाइसमध्ये अॅपद्वारे संकलित केला जाऊ शकतो. ही रिंग ब्ल्यूटूथच्या साहाय्यानेही काम करते आणि अत्यंत कमी ऊर्जेवरदेखील काम करू शकते.मानवी जगणं थांबत नाही, काही ना काही मार्ग काढून असे जगण्यासाठीच्या आनंदाचे पर्याय शोधले जातातच.त्यातलीच ही अंगठी!

(प्रसाद तंत्रज्ञानविषयक पत्रकार आहे.)