कालचीच एक बातमी.
आता भविष्यात माणसाच्या हातावर एक भन्नाट घडय़ाळ दिसू शकेल. वेअरेबल टेक्नॉलॉजीचा हा पुढचा टप्पा.
सध्या अॅपल वॉचची चर्चा आहेच. त्यांनी त्याचं पेटंटही घेतलं आहे. पण आता अॅपलक्ष्नसायडरने एक नवीन पेटंट घेतलंय. ते म्हणजे फ्लेक्झिबल वॉचचं.
म्हणजे कल्पना करा, तुमचं मनगट जेवढं असेल तसं लवचिक होत एखादं घडय़ाळ त्या मनगटावर चिकटेल आणि अत्याधुनिक सगळी यंत्रणाच त्या घडय़ाळावर उपलब्ध असेल.
सॅमंसगचा फ्लेक्ङिाबल फोन पुढच्या वर्षी येण्याची शक्यता आहेच. पण आता या नवीन पेटंटनं हे सिद्ध केलंय की भविष्यात कपडय़ांना चिकटलेले काही स्क्रिन्स, स्मार्ट क्लोदिंगच्या नावानं मार्केटमध्ये येऊ शकतात. बाकी चष्मे, फोन, ब्रेसलेट हे सारं तर स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या आधारे रंगरुप बदलत आहेतच.
अर्थात हे सारं मार्केटमध्ये येणं, ते लोकांना परवडणं हे फार पुढचं काम आहे. मात्र तरीही या नव्या पेटंटनं जगभरातल्या वेअरेबल टेक्नॉलॉजीच्या कक्षा रुंदावल्या आहेत हे नक्की!
या घडय़ाळाचा उल्लेख ‘वेअरेबल डिस्प्ले’ असा केला जातो आहे. ज्यात एक सिलिकॉन सबस्ट्रेट म्हणजे आपल्या वेफर्ससारखी 50 मायक्रोमीटरची एक चकती असेल. आणि तिचं रुपांतर ब्रेसलेट किंवा मनगटी घडयाळात होऊ शकेल!
तशीही आता पुन्हा हळूच घडय़ाळ घालण्याची फॅशन परत येते आहेच,
त्यात हे वेअरेबल गॅजेट्स आहे, तर मग स्मार्टनेसच्या जगात हंगामा होणं अटळच आहे!
-चिन्मय लेले