शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

तुम्ही शेवटचे उपाशी कधी राहिला होतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:55 PM

तुम्हाला ‘उपाशी राहण्याचा अनुभव’ नाही. तुम्हाला साधं पोहता येत नाही. वरून त्याबद्दल तुम्हाला जराही खंत नाही. सतत प्रश्नाचं उत्तर देणं ही दुसर्‍या कुणाची जबाबदारी आहे अशी तुमची भावना झाल्यानं तुम्ही प्रश्न विचारणंसुद्धा विसरला आहात..!

ठळक मुद्देजगभरातल्या अनेक राष्ट्रांतल्या तरुणांना आपल्या सभोवतालच्या समस्यांची सखोल जाणीव होत आहे आणि त्यांनी जग बदलवण्याच्या प्रक्रि येत सहभाग घेण्यास सुरु वात केली आहे. ..भारतातल्या तरुणांना मात्र याबद्दल काहीही माहिती नाही.

- राहुल बनसोडे

विद्यार्थी पुस्तकात आपले डोके खुपसून बसतो तेव्हा त्याचा मेंदू तरु णाईचे स्वप्न पाहत असतो, जिथे टेबलावर शब्द खदखदत असतात आणि मनात कुठलीशी कविता लपून असते. - रवींद्रनाथ टागोर

एखाद्या कम्पल्सरी बोअरिंग लेक्चरला बेंचवर बसल्या बसल्या पुस्तकात डोकावताना तुमच्याही मनात उगवली असेलच केव्हातरी कविता; पण ती उगवली आहे हे कळण्याच्या आधी एखादी कविता तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये उगवून आलेली असेल. मनातल्या कवितेचा विचार करण्याऐवजी त्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली कविता वाचण्यासाठी तुम्ही आतुर झाला असाल. कम्पल्सरी लेक्चरची ती खरी दुनिया सोडून फोनच्या आभासी दुनियेत परतण्यासाठी तुमचं मन कासावीस होत असेल. चोवीस तास फोनच्याच दुनियेत राहाता आलं असतं तर किती बरं झालं असतं असाही विचार तुमच्यापैकी काहींनी केला असेल. तुमच्यातले काहीजण आपलं शिक्षण आणि ज्ञानाची दुनिया सोडून अगोदरच मोबाइलमध्ये रममाण झाले आहेत. त्यांच्या असे रममाण असण्याचा समाजाला तसा फायदाच आहे. पण याच समाजाच्या एका महत्त्वाच्या निर्णयावर तुमची भूमिका कधी नव्हे ती इतकी निर्णायक झाल्यानं गेल्या दोन महिन्यात तुम्हाला एकदमच महत्त्व प्राप्त झालं आहे. तुमच्या आईबाबांच्या वयाचे लोक ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’  असं गमतीनं वा गंभीरपणे म्हणत आहेत.त्यांच्या या म्हणण्याचा नेमका काय अर्थ हे अर्थात तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. त्यासाठी फोन बाजूला ठेवून तासभर का होईना शांतपणे एखादी संध्याकाळ त्यांच्यासोबत घालवावी लागेल. तुमच्या आईवडिलांची पिढी ही स्वतंत्र भारतातल्या सर्वात मेहनती लोकांची पिढी म्हणून गणली जाते. त्यांनी फक्त शारीरिकच नाही तर बौद्धिक कष्टही केले. दुनियेला ज्या चांगल्या गोष्टी भारतात कधीच घडणार नाहीत असा ठाम विश्वास होता तो विश्वास तुमच्या पालकांनी खोटा ठरवला.  तुमच्या आईवडिलांचे लहानपण आणि तारु ण्य जरा जास्त दगदगीत आणि श्रमात गेल्यानं त्यांनी तुम्हाला एखाद्या फुलासारखं वाढवणं साहजिकच होतं. आज जिथे कुठे तुम्ही उभे आहात तिथून तुमचं भविष्य काय याबद्दल तुमच्यापैकी बर्‍याच तरुणांच्या पालकांना काही स्पष्ट कल्पना नाही. तुमचं आयुष्य तुम्हीच घडवणार आहात असा आत्मविश्वास मात्र अनेकांना आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात तुमची पिढी प्रचंड आत्मविश्वासानं भरलेली पिढी म्हणून ओळखली जाते, तुमचा आत्मविश्वास हा येत्या काळाचं भवितव्य ठरवेल. तो फाजील असेल तर  देशाचं भविष्य खडतर होईल; पण तो योग्य असेल तर सगळ्या जगाला हेवा वाटावा असा देश तुम्हीच तयार कराल.- आत्तार्पयतचं हे सगळं एखाद्या व्हॉट्सअ‍ॅपच्या फॉरवर्डसारखे जरा जास्तच टॉप गिअर टाकल्यासारखं वाटू शकतं; पण हेच आता जगाचं वास्तव आहे. गेल्या मंगळवारी सुदानमध्ये तुमच्या वयाची एक मुलगी मोर्चाच्या गर्दीत एका कारच्या टपावर चढली आणि तिनं हुकूमशहा ओमर अल बशीरला सत्तेतून खाली खेचण्याची घोषणा दिली. तिचा टपावर चढलेला फोटो जगभर व्हायरल झाला आणि चोवीस तासाच्या आत तिथल्या हुकूमशहाची सत्ता संपुष्टात आली. हा लेख लिहीत असताना यूके आणि इतर अनेक देशांतल्या विद्याथ्र्यानी क्लायमेंट चेंजच्या प्रश्नावर आंदोलन उभारलं असून, ते ठिकठिकाणी मोर्चे काढत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा वेग पाहता ते लवकरच जागतिक आंदोलन बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुदानमधली वा यूकेमधली बातमी तुमच्याकडे पोहचण्याची शक्यता तशी फार कमी आहे; पण तुमच्या बातम्यांकडे जगभरातले इतर तरु ण मात्र व्यवस्थित लक्ष ठेवून असतात. ज्या वेगानं भारत तंत्रज्ञानक्षेत्रात प्रगती करत होता त्या वेगानेच हा देश चालला असता तर जगभरातल्या तरु णांना एक दिवस तुमच्या हाताखाली काम करावं लागलं असतं. पण ते तसं झालं नाही. मात्र तरीही खडतर आयुष्य काढणार्‍या तुमच्या अगोदरच्या पिढय़ांनी तुमच्या सुखासाठी जास्त प्रयत्न केल्यानं तुम्हाला जीवनाचे काही महत्त्वाचे नियम पूर्णपणे अजून समजलेलेच नाहीत.तुमच्या वयाच्या मुलांना मी एक प्रश्न अलीकडे नेहमी विचारतो. तुम्हाला भूक लागल्यावर तुम्ही काय करता? त्यावर ‘जेवण करतो’ असं सोपं उत्तर सर्वजण देतात. मग मी दुसरा प्रश्न विचारतो, ‘आणि जेवायला नसेल तर?’- या प्रश्नाचं उत्तर अनेकांना ठाऊक नसतं. मग मी विचारतो ‘असं कधी झालं होतं की तुम्हाला भूक लागली होती; पण खायला काही नव्हतं आणि अन्न विकत घ्यायला तुमच्याकडे पैसेही नव्हते?’ - हा प्रश्नही जरा जास्तच अवघड होतो. मग मी फायनल प्रश्न विचारतो, ‘तुम्ही शेवटचे उपाशी कधी राहिला होतात?’ आपण शेवटचे उपाशी कधी राहिलो होतो हे तुमच्यापैकी अनेकांना प्रयत्न करूनही आठवत नाही. उपाशी रहावं लागणं जिवंत जगाचा एक महत्त्वाचा नियम आहे आणि ते उपाशीपणही तुमच्यापैकी अनेकांच्या लक्षात नाही. उपाशीपण लक्षात रहात नसेल तर मग तुमच्या जगण्यातली ऊर्मीच कुठेतरी हरवून जाते. आणि जगण्याची ऊर्मी हरवून बसलेल्या तरु णांच्या देशाचे भवितव्य धोक्यात येऊ लागते.गेल्या गुरु वारच्या ‘ऑक्सिजन’च्या अंकात तुमच्या पिढीला लोकशाहीबद्दल काय वाटतं याचा सव्र्हे वाचण्यात आला. अगदी त्याच दिवशी जगातल्या इतर काही देशांमध्ये तुमच्याच वयाची मुलं त्यांच्या देशाची लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न करत होते याचा डेटा जगभरातले सायंटिस्ट अभ्यासत होते. जग ज्या कुठल्या परिस्थितीतून जातं आहे ती परिस्थिती बदलून चार सुखाचे दिवस येण्यासाठी असंख्य लोक झगडताहेत; पण तरुणांच्या सहभागाशिवाय त्यांना यश मिळण्याची शक्यता कमी आहे. जगभरातल्या अनेक राष्ट्रांतल्या तरुणांना आपल्या सभोवातलच्या समस्यांची सखोल जाणीव होत आहे आणि त्यांनी जग बदलवण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. भारतातल्या तरुणांना मात्र याबद्दल काही माहिती नाही, भारताचं शत्रूराष्ट्र पाकिस्तान आणि भारताची मित्र राष्ट्रं श्रीलंका आणि बांग्लादेशमधल्या तरुणांचीही अवस्था काहीशी अशीच आहे. नेमकी याच देशातली मुलं वास्तवापासून इतकी दूर का असावीत याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न काहींनी केला आणि त्यांच्या हाती आलेली तथ्यं तुम्हाला बुचकळ्यात टाकू शकतात.

तुमच्यातल्या दोनशे मुलांपैकी एखाद्यालाच पोहता येतं असा अंदाज आहे. शंभरातले नव्वाण्णव लोक पाण्यात पडले तर स्वतर्‍लाही वाचवू शकत नाहीत. हा आकडा मुलांचा. मुलींच्या बाबतीत हीच संख्या लाखांमध्ये एक आहे. तुमच्यातल्या कितीतरी मुली पोहता येणार्‍या एकाही मुलीला आयुष्यात भेटलेल्या नाहीत. उथळ पाण्यात पाय टाकून सेल्फी घेणार्‍यांची संख्या मात्र पन्नास टक्क्यांहूनही अधिक आहे. आपल्याला पोहता येत नाही याची तुमच्यातल्या कुणालाही खंत नाही. तुम्ही ज्या राष्ट्रपुरु षांचा, हीरोंचा आणि खेळाडूंचा अभिमान बाळगता त्यांना उत्तम पोहता येत होतं हे कळलं तर मात्र तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.तुमच्या देशातल्या भूभागावर तीस हजार वर्षांपूर्वी आलेल्या माणसाला इथं तगणं शक्य झालं त्यात पोहता येण्याच्या ज्ञानाचा मुख्य सहभाग होता. तुम्हाला पोहता येत नाही याचा दोष नेमका कुणाला द्यायचा याबद्दल मात्र कुणाचंही एकमत होत नाही. तुम्ही लहानपणी जेवण करायला नकार देत होता तेव्हा टीव्हीवर कार्टून दाखवून तुम्हाला भुलवणार्‍या तुमच्या पालकांना की तुमच्यावर कधीच व्यवस्थित विश्वास न दाखवलेल्या तुमच्या शिक्षकांना? की तुम्हाला अंगणात जाऊन खेळू देण्यापेक्षा घरात कोंडून ठेवणार्‍या सुरक्षिततेला? दोष देणं तसं सोपं आहे; पण खरंच तुम्हाला पोहायचं शिकायचंच असतं तर तुम्ही कुठे गेला असता? कारण पोहता यावं इतपत पाणी आता बर्‍याचशा भूभागावर शिल्लक नाही. तुमच्या देशातल्या नद्या आता जास्त वेळ वाहात नाहीत. वाहातात तेव्हा त्यांचा खवळलेला प्रवाह पोहण्यासारखा नसतो आणि साचतात तेव्हा ते पाणी अंगावर घ्यावं इतपत स्वच्छ नसतं. लोकांना जिथं प्यायला पाणी नाही तिथं पोहायला कुठून येणार? पोहण्याच्या या डेटाचा देशाच्या विकासाशी काय संबंध? असा प्रश्न तुमच्यातले अनेक जण विचारू शकतात. तुमच्या पिढीवर केलेल्या कुठल्याही आरोपावर चटकन प्रतिप्रश्न विचारायची तुमची सवय आहे; पण नेमका हा प्रतिप्रश्न ऐकणार्‍याला उद्धटपणा वाटतो. जितक्या वेगानं तुम्ही प्रतिप्रश्न विचारता तितक्याच वेगानं त्याचं उत्तर देण्याची क्षमता तुमच्यावर आरोप लावणार्‍यांमध्ये नाही. ती तशी का नाही याचा शोध घेतल्यावर कळतं की या प्रश्नांची उत्तरंच कुणाकडे नाहीत. डेटाचा अभ्यास करायचा झाल्यास तुमच्या पिढीचे असंख्य प्रश्न अनुत्तरितच आहेत असंच दिसून येतं. सतत प्रश्नाचं उत्तर देणं ही दुसर्‍या कुणाची जबाबदारी आहे अशी तुमची भावना झाल्यानं अनेक प्रश्नांची उत्तरं आपली आपणच शोधायची असतात हेच तुम्ही मुळात विसरून गेले आहात. तुमचं पोहायचं पाणी नेमकं कुठे गेलं? - हा प्रश्न तुम्हाला आज विचारावासा वाटतं नसेल तर उद्या तुमचं प्यायचं पाणी कुठं गेलं हा प्रश्नही विचारावासा वाटणार नाही.हाच पेपर वाचणार्‍या देशातल्या काही भागात तुमच्या पिढीच्या हक्काचं पिण्याचं पाणीही अदृश्य होऊ लागलं आहे. आपल्याच पिढीतल्या इतर बांधवांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तुम्हाला उभं राहावंसं वाटत नाही. तो आणि तुम्ही एकमेकांपासून बरेच दूर असाल, तो हंडाभर पाण्यासाठी मैलभर रपेट करीत असेल आणि तुम्ही शॉवरचे फवारे घेत असाल, त्याच्यात आणि तुमच्यात असलेल्या पैशाच्या अंतरामुळे तो गरीब आणि तुम्ही मिडल क्लास असाल. एकदा असा क्लास बनला की मग त्याचा तुमचा तसा काही संबंध उरत नाही, दोघांना एकमेकांच्या प्रश्नांशी काही घेणंदेणं उरत नाही. तुमचं वयोमान मात्र सारखंच आहे आणि तुम्हा दोघांना एकत्र मिळवून या देशाची तरु ण पिढी बनते. ज्यांच्या हातात या देशाचं भवितव्य आहे. तुमच्या मतांनी आज फरक पडतो आहे म्हणून तुम्हाला किंमत देणारे आज हजारो लोक मिळतील; पण उद्या निवडणूका संपल्या की त्यांना तुमचा रितसर विसर पडेल, तुमचा उपयोग आता फक्त मत मिळविण्यापुरताच आहे अशा गोड गैरसमजात अनेक राजकीय नेते आहेत. तुम्हाला हा त्यांचा गैरसमज मोडून काढण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल. असो, या उन्हाळ्यात पोहायला शिका. शांतता म्हणजे नक्की काय याची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल.

***जे मत मागायला येतील, त्यांना हे विचारा, की..

आपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅपवर मत मागणार्‍या आणि आपल्या पक्षाचा प्रचार करणार्‍या कुठल्याही माणसाला तुमच्या पिढीचे प्रश्न विचारा -1. क्लायमेट चेंजमुळे आपल्या ग्रहावर जगणं दिवसेंदिवस अवघड होऊ लागले आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सरकार नेमकं काय करणार आहे?2. जगभर ऑटोमेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर वाढतो आहे ज्यामुळे येत्या काळात प्रचंड बेरोजगारीचा सामना काही देशांतल्या तरुणांना करावा लागणार आहे. बेरोजगारीच्या या संभाव्य संकटाला टाळण्यासाठी आणि नवे रोजगार तयार करण्यासाठी सरकार नेमकी काय उपाययोजना करणार आहे?3. अलीकडच्या काळात काही देश हे स्पेस सायन्समध्ये आणि अण्वस्र बनविण्यात प्रचंड पुढाकार घेत आहेत. युद्धाच्या सुरुवातीच्या बातम्या ऐकायला लोकांना मजा येते; पण नंतर युद्ध बोअरिंग आणि बोगस होऊ लागतं, त्यात खुपशा लोकांना आपले प्राणही गमवावे लागतात. अशा युद्धात सहभागी होऊन अण्वस्र हल्ल्याचा धोका पत्करण्यापेक्षा शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुमचे सरकार काय करणार आहे हाही प्रश्न तुम्ही विचारायला हवा. - पण तो तुम्हाला विचारावासा वाटण्याची शक्यता तशी कमी आहे. सभोवतली चाललेल्या हिंसक परिस्थितीकडे पाहता शांततेचे महत्त्व तुम्हाला कळणं तसं अवघड आहे. पण शांतता म्हणजे नेमकं काय हेच तुम्हाला माहिती नसेल तर त्याचं उत्तर शोधणं तसे खूप सोपं आहे.

(लेखक मानववंश शास्त्राचे  अभ्यासक आणि समाजमाध्यमांचे विश्लेषक आहेत.)