शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

(ना)लायक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:59 PM

कुठल्या शाखेतल्या इंजिनिअर्सची घाऊक भरती करणाºया आयटी कंपन्याच आता म्हणतात की, प्रशिक्षण देऊन एकसुरी काम द्यावं इतपत ‘लायकी’चं मनुष्यबळही आमच्याकडे येत नाही. परदेशात तर सोडाच देशातही आयटीत हमखास नोकरी मिळण्याचे दिवस आता सरले आहेत...

आयटीतल्या नोकºया आटल्या, आता पुढे?

अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’चा डंका पिटायला सुरुवात केली तेव्हाच खरं तर ‘अमेरिकन ड्रीम्स’ मनात घेऊन वर्षानुवर्षे कीबोर्ड बडवत बसलेल्या अनेक तरुण इंजिनिअर्सच्या पोटात इकडे गोळा आला. भारतातून जाणाºया सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचं कसं होणार, अशी भीती अनेकांच्या मनात घर करू लागलीच.अखेर ट्रम्प सत्तेत आलेआणि अपेक्षेपणे त्यांनी स्वदेशीचा झेंडा फडकवला. त्यानुसार वर्षाच्या सुरुवातीलाच व्हिसाचे नियम बदलणार हे स्पष्ट झालं. नियम तिकडे बदलले तरी त्याचा आपल्याकडच्या आयटी इंजिनिअर्सवर मोठा परिणाम होणार हे उघड होतंच. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या कंपन्यांत काम करणारांचेही धाबे दणाणले. शेअर बाजारात या कंपन्यांच्या ९ टक्क्यांनी किमती आपटल्या.अचानक देशामध्ये आयटी क्षेत्र, त्यातील नोकºया धोक्यात आल्याचं वातावरण तयार झालं. पाठोपाठ काही महत्त्वाच्या आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली. आणि आता आयटीतल्या नोकºया आटणार असा एकच गलका सुरू झाला. आयटी-सॉफ्टवेअरवालेच कशाला, अन्य शाखांचे इंजिनिअरही अस्वस्थ झाले. देशातील सर्व स्तरातील, सर्व प्रकारच्या इंजिनिअर्सना खुल्या दिलानं आपलंसं करणारं हे क्षेत्र. पॅकेज उत्तम. तिथंच बहुसंख्य नोकºया. तिथं नोकरकपात होणार म्हटल्यावर एकच गहजब उडाला. अर्थात यावर लगेचच टाटाच्या एन. चंद्रसेकरन यांनी आयटी क्षेत्रात सर्व आलबेल असून, उलट देशात वाढत्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे २०२५ पर्यंत दोन कोटी नव्या नोकºयांच्या संधी आयटी क्षेत्रात निर्माण होतील असं सांगितलं. काही प्रमाणात चंद्रसेकरन यांचं म्हणणे खरं आहे. पण तसं अर्धच खरं. कारण डिजिटल तंत्रज्ञानामुळे नव्या नोकºया भविष्यात निर्माण होण्याची संधी दिसत असली, तरी त्यांचं नक्की स्वरूप कसं असेल याची ठोस कल्पना अजून नाही.आणि दुसरीकडे नासकॉम या आयटी आणि बीपीओ क्षेत्रातील व्यापारविषयक राष्ट्रीय संघटनेचा अंदाज वेगळीच सद्यस्थिती दर्शवितो. नासकॉम अंदाजानुसार २०१७ च्या आर्थिक वर्षात नव्या नोकºयांची उपलब्धता ही २० टक्क्यांनी कमी होईल. येत्या तीन ते चार वर्षांमध्ये या क्षेत्रात सध्या असलेल्या नोकºयांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट अपेक्षित असून, ती २० ते २५ टक्के एवढी असू शकेल, असा अंदाजही नासकॉमने वर्तविला आहे.आता प्रश्न असा आहे की, या नोकºया एकाएकी अशा कमी का होत आहेत?त्याचं कारण म्हणजे येत्या काळात १२ टक्के नोकºया या उद्योगांमध्ये वाढलेल्या स्वयंचलित प्रणालीच्या म्हणजेच आॅटोमेशनच्या वापरामुळे जाण्याची चिन्हे आहेत. कामातील अचूकता, वाचणारा वेळ, जागा, त्यातून पैशांची मोठ्या प्रमाणात होणारी बचत आणि या सगळ्यांतून वाढणारी एकूण कार्यक्षमता या सर्व कारणांमुळे जागतिक पातळीवर स्वयंचलित प्रणालीचा वापर वाढत आहे. याचा सर्वात मोठ्ठा फटका केवळ कोडिंग, टेस्टिंग आणि कामांमध्ये सततचा तोच तोपणा असणाºया नोकºयांना बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या ३५ लाख मनुष्यबळावर ‘ले आॅफ’ची म्हणजे थोडक्यात बडतर्फीची टांगती तलवार आहे. मागील एका वर्षाचा आढावा घ्यायचा झाल्यास इन्फोसिसने ८ ते ९ हजार कर्मचाºयांना कमी करून नव्या कामांसाठी स्वयंचलित प्रणाली वापरात आणल्याची माहिती आहे. विप्रोनेही अशाच स्वरूपाची पावलं उचलून तीन हजारांच्या आसपास कर्मचाºयांना मुक्त केल्याचे कळते. आयटी क्षेत्रातील या दोन अत्यंत बड्या कंपन्या. कॅम्पसमध्ये या कंपन्यांसाठी तरुण इंजिनिअर सिलेक्ट झाले की इंजिनिअर झाल्याचं पावन झालं असा एक समज आहे. मात्र तिथले हे बदलच सांगत आहेत की येत्या काळात तरुण इंजिनिअर्सना नोकºया मिळणं, त्या टिकणं हा एक मोठा स्ट्रगल असेल.नजीकच्या काळात आज अस्तित्वास असलेल्या एक चतुर्थांश नोकºयांसमोर अस्तित्वाचा प्रश्न असला तरी उरलेल्या तीन चतुर्थांशांनाही नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं मोठ्ठं आव्हान आहे.कॉग्निझंट या आयटी क्षेत्रातील आणखी एका मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रँक डिसूझा यांच्या मते तर येत्या काळात जवळपास १३ टक्के नव्या नोकरीच्या संधी आयटी क्षेत्रात निर्माण होतील. पण त्या काय असू शकतील याचा अजून आपल्याला अंदाज नाही. प्रचंड वेगाने घडणाºया बदलांचंच हे एक प्रतीक आहे. बदलतं तंत्रज्ञानच नव्या नोकºयांना, संधींना जन्म देईल अशी एक शक्यता आहे.म्हणूनच आयटीत काम करणाºया तरुण इंजिनिअर्सना भेटा. वेगाने बदलणाºया नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी सध्या त्यांचा आटापिटा सुरू आहे. कंपन्यादेखील बदलांशी जुळवून घेण्यासाठी त्यांना प्रशिक्षिण देत आहेत.पण इथेच कंपन्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. तज्ज्ञांच्या मते, आज काम करत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी हे बदलांशी जुळवून घेण्यास आणि प्रशिक्षण देण्याइतकेही लायक नाहीत.कॅपजेमिनीचे श्रीनिवास कंदुला यांच्या म्हणण्यानुसार आजचे ६० ते ६५ टक्के कर्मचारी हे नवीन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्याइतपतही लायक नाहीत. कारण त्यासाठीचे पूर्वज्ञानही त्यांच्याकडे नाही. या सर्वांत शिक्षणपद्धतीचा दोष मोठा आहे. काळानुरूप न बदललेले अभ्यासक्र म, परीक्षा पद्धतीमध्ये सर्जनशीलतेचा अभाव या सर्वच गोष्टी भविष्यासाठी मारक आहेत.होतं काय, या बड्या आयटी कंपन्या घाऊक प्रमाणात तरुण इंजिनिअर्सना नोकºया देतात. सुरुवातीला आपल्या कामाच्या गरजेप्रमाणे या इंजिनिअर्सना प्रशिक्षण देतात. आणि त्याबरहुकूम नेमून दिलेलं काम हे इंजिनिअर्स करतात. पण तंत्रज्ञान बदललं की त्यानुरूप काम करणं सगळ्यांनाच जमत नाही. आणि मुख्य म्हणजे त्यासाठी आता जसं प्रशिक्षण कंपन्या देतात तसं त्या देतील की नाही याचीही शाश्वती नाही. त्यामुळे इंजिनिअरची डिग्री घेऊ नी आयटीत जाऊ, डिग्रीला विचारतं कोण हा अ‍ॅटिट्यूड यापुढे चालणार नाही.व्यवस्था बदलते आहे हे लक्षात घेऊनच आता काही महाविद्यालयं कंपन्यांच्या मदतीने इंजिनिअरिंगच्या विषयांमध्ये बदल करत आहेत. गरजेच्या गोष्टींचा अंतर्भाव अभ्यासक्र मात करत आहेत. रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल स्पेस, क्लाऊड कंप्युटिंग, बिग डेटा हे सर्व भविष्यातलं तंत्रज्ञान आता तरुण मुलांच्या नजरेच्या टप्प्यात आलंय. किंबहुना वापरातही येणं आता ते अनेकांनी सुरू केलं आहे.खरं तर तंत्रज्ञान, मग ती एखादी स्वयंचलित प्रणाली यांचा उद्देश हा इंजिनिअरला मदत करणं हाच असतो. इंजिनिअरने तंत्रज्ञानाच्या वापरानं अनावश्यक कामाचा ताण हलका करून, एकच एक प्रकारचे काम करण्याचे कष्ट कमी करून सर्जनशीलतेवर अधिक भर देणं अभिप्रेत असतं. अनेकदा इंजिनिअर इथंच चुकताना दिसतात. एकसुरी काम करत राहतात आणि नवीन काही आलं की बावचळून जातात.इन्फोसिसच्या प्रवीण राव यांच्या म्हणण्यानुसार तर इन्फोसिससारखी कंपनी, जी इतकी वर्षं केवळ अभियांत्रिकी पदवीधरांना नोकरीसाठी प्राधान्य देत होती; ती आज ‘लिबरल आर्ट्स’मधील पदवीधरांनादेखील नोकºया देण्याचा विचार करते आहे. कामामध्ये सर्जनशीलतेचं महत्त्व भविष्यात अधिकाधिक वाढत जाणार हेच सांगणारं हे विधान आहे.नव्या तंत्रज्ञानाने काही नोकºया गेल्या असल्या तरी नेहमीच नव्या संधी अधिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत हा इतिहास आहे. मात्र आताच्या काळात हा बदल अतिशय वेगाने होत आहे. आणि बदलाच्या या वाटेवर ‘टिकण्याचं’ आव्हान या इंजिनिअर्ससमोर आहे!प्रश्न आहे तो टिकाव कसा लागणार?कारण इंजिनिअरिंगच्या डिग्रीपलीकडचं भान अजूनही दुर्दैवानं तरुण इंजिनिअर्सना नाही!!

१. सध्या आयटीत कार्यरत असलेल्या ३५ लाख मनुष्यबळावर ‘ले आॅफ’ची म्हणजे थोडक्यात बडतर्फीची टांगती तलवार आहे.

२. कॅपजेमिनीचे श्रीनिवास कंदुला यांच्या म्हणण्यानुसार आजचे ६० ते ६५ टक्के कर्मचारी हे नवीन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्याइतपतही लायक नाहीत.

३. एकसुरी तांत्रिक काम करणाºया इंजिनिअरपेक्षा आटर््सवाल्या क्रिएटिव्ह भेजांना नोकरी देण्याची इन्फोसिसची तयारी.

४. नासकॉमच्या अंदाजानुसार २०१७ च्या आर्थिक वर्षात नव्या नोकºयांची उपलब्धता २० टक्क्यांनी कमी होईल. येत्या तीन ते चार वर्षांमध्ये आयटीतल्या नोकºया २५ टक्क्यांनी घटतील.