शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
4
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
5
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
6
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
7
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
8
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
9
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
10
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
13
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
14
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
15
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
16
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
17
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
18
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
19
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
20
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

ऑड इव्हन अक्षत

By admin | Published: April 22, 2016 9:13 AM

13व्या वर्षी त्यानं स्टार्टअप वेबसाइट सुरू केली, ती लोकप्रिय झाली, दुस:या एका कंपनीनं मागणी केली म्हणून त्यानं ती विकूनही टाकली, आता तो कंपनीच्या अॅडव्हायजरी बोर्डावर सल्ले द्यायचं काम करणार आहे.

दिल्लीच्या सम-विषम वाहन फॉर्म्युल्यानं जन्माला घातलेल्या एक कोवळ्या नवउद्योजकाशी गप्पा.

 
अक्षत मित्तल. वय वर्षे 13.
नोएडामधल्या अमिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीत शिकणारा विद्यार्थी आणि देशातला कदाचित सगळ्यात लहान वयातला नवउद्योजक. अक्षतचे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते दिल्लीमध्ये वाहतुकीच्या संदर्भातला सम-विषम नियम लागू झाल्यानंतर, कार पूलिंगसाठी त्यानं odd-even.com नावाची वेबसाइट डिझाइन केली. वापरायला अत्यंत सुटसुटीत अशी ही त्याची वेबसाइट अल्पावधीतच लोकप्रिय झाली. दिल्लीमध्ये सम-विषम नियमांचा दुसरा टप्पा सुरू होण्याच्या आधी काही दिवस कार पूलिंगसाठी काम करणा-या  orahi.com अक्षतची ही वेबसाइट विकत घेतली. या व्यवहारानंतर अक्षत लहान नवउद्योजक, स्टार्टअपवाला म्हणून माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला.डिसेंबर 2क्15 ते एप्रिल 2016 या अवघ्या पाच महिन्यात अक्षतने यशाचा जो टप्पा गाठला, त्यासंबंधी जाणून घेण्यासाठी अक्षतशी संपर्क साधला आणि त्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या..
 
अक्षत, ही कल्पना तुला नेमकी सुचली कशी?
दिल्ली सरकारनं जेव्हा सम तारखेला सम क्र मांकाची आणि विषम तारखेला विषम क्र मांकाची वाहने रस्त्यावर येतील, असा निर्णय जाहीर केला त्यानंतरच ही कल्पना मला सुचली. कार पूलिंगची सेवा देणा:या इतरही काही वेबसाइट आहेत, अॅप्स आहेत. पण यावेळेस गरज होती ती अधिक नेमक्या सेवेची. म्हणजेच सम तारखेला, सम वाहने पुरवली जातील आणि विषम तारखेला विषम वाहनेच मिळतील अशा सुविधेची. त्याचदृष्टीने विचार करून मी माझी साइट डेव्हलप करायला सुरुवात केली.
 
 सम-विषम तारखांना अनुसरून वाहनांची उपलब्धता हे तुङया वेबसाइटचं एक वैशिष्टय़ आहेच. पण त्याखेरीज odd-even.comचं अजून काय वेगळेपण सांगशील?
कारपूलिंगसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण ज्या वेळी, ज्या मार्गाने जाणार असतो, त्या मार्गावर, त्यावेळेला जाणा:या लोकांचा गट. ऑड-इव्हनडॉटकॉममध्ये नेमक्या याच गोष्टींचा विचार करून पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय वेबसाइटचे नावही अगदी सोपं आहे. यूजर्स त्यांच्या फेसबुक किंवा लिंक्डइन प्रोफाईलचा वापर करून या वेबसाइटवर लॉग-इन करू शकतात. मात्र त्यांना आपलं आधार कार्ड, पासपोर्ट किंवा इतर ओळखपत्न अपलोड करणं गरजेचं होतं. त्यामुळे फेक यूजर्सचाही प्रश्न यायचा नाही. यूजर्सचा वयोगट, लिंग, प्रोफेशन, त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे त्याची माहिती या सर्वावर आधारित असं या आइटचं अल्गोरिदम होतं. आता ओराहीने ही वेबसाइट खरेदी केल्यानंतर त्यामध्ये काही बदल त्यांच्या गरजेनुसार केले आहेत.
तू या वेबसाइटचा विचार केवळ ऑड-इव्हन फॉम्र्युल्यापुरताच केला होतास की हा प्रयोग संपल्यानंतरही त्यामध्ये काही सुधारणा करण्याचा तुझा विचार होता?
 सुरु वातीला मी फक्त सम-विषम तारखांपुरताच विचार केला होता. अर्थात त्यानंतर मी इतर गरजांचाही विचार करून सुधारणा करणारच होतो. पण सम-विषमच्या पहिल्याच टप्प्यात या वेबसाइटला चांगला प्रतिसाद मिळाला. या साइटचे 3क्,क्क्क् रजिस्टर्ड यूजर्स आहेत. आता ओराहीने ही साइट खरेदी केल्यानंतर ते त्यात सम-विषमचा दुसरा टप्पा लक्षात घेऊन सुधारणा करतील. 
 
एवढा सगळा विचार करून वेबसाइट बनवायला तुला वेळ किती लागला? कसं जमवलंस शाळा सांभाळून हे काम?
तीन ते चार आठवडय़ांत मी ही वेबसाइट बनवली.  माझी शाळा रोज 3 वाजता सुटते. त्यानंतर माझी टय़ूशन. मग थोडावेळ अभ्यास. रात्री जेवण झालं की मी या वेबसाइटच्या कोडिंगचं काम करायचो.
 
 वेबसाइटच्या कोडिंगचं काम करताना तू कोणाचं मार्गदर्शन घेत होतास? कुणी होतं मदतीला?
माङो वडील स्वत: आयटी उद्योजक आहेत. त्यामुळे ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. त्याबरोबर कॉम्प्युटर सायन्समध्ये शिकणारे माङो चुलतभाऊसुद्धा मला वेबसाइट तयार करताना काही अडलं तर मदत करायचे. 
वेबसाइट डिझायनिंगसारखं किचकट काम इतक्या लहान वयात करावं असं का वाटलं तुला?
 मी सातवीत होतो, तेव्हा आम्हाला बेसिक एचटीएमएल कोडिंग शिकवलं होतं. त्यावेळेसच मला ते आवडलंही होता. एकदा यामध्येच इंटरेस्ट आहे, हे जाणवल्यानंतर मी सीएसएस आणि दुस:या कोडिंग सिस्टिमही शिकून घेतल्या. आणि स्वत: वेबसाइट डिझाइन करण्याचा प्रयत्न करू लागलो. 
 
तुझी वेबसाइट आता कार पूलिंगची सेवा देणा:या ओराहीने खरेदी केली आहे. त्यातून पैसे तर मिळाले असतीलच; पण ओराहीने तुला अजूनही काही ऑफर दिली आहे का?
 या साइटचे अल्गोरिदम मी डिझाइन केलं आहे. त्यामुळे ओराहीने मला त्यांच्या टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डवर नेमलं आहे. अजून वर्षभर तरी मी या बोर्डाचा सदस्य असेन. त्याशिवाय ते एकवर्षभर मला मेंटॉर करतील. बिझनेससंदर्भातील काही मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी ते मला मदत करतील. त्यामुळे ही माङयासाठी नक्कीच खूप मोठी गोष्ट ठरणार आहे. 
 
इतक्या लहान वयातच तू बिझनेसच्या जगात प्रवेश केला आहेस. माध्यमांकडून भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. एकदम भन्नाट वाटत असेल ना?
 मला जे कौतुक, जी प्रसिद्धी मिळाली आहे, मिळत आहे त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं  आहे. आता मला लोकं ओळखू लागली आहेत. मी कुठे बाहेर गेलो तर आवर्जून मला भेटतात, बोलतात. पण तरीही मला माङया आयुष्यात खूप काही बदलल्यासारखं वाटत नाहीये. मी ‘सेलिब्रिटी बच्चा’ झालोय, असं नाही वाटत मला. मी अजूनही शाळकरी अक्षतच आहे.
 
 भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्नात करिअर करायचं ठरवतोहेस?
माङया वडिलांप्रमाणं आणि भावांप्रमाणोच मलाही माहिती आणि तंत्नज्ञान क्षेत्नातच शिक्षण घ्यायचं आहे. त्यानंतर मी एक उद्योजक म्हणूनच मी स्वत:चं करिअर घडवेन.
 
स्वत:चं करिअर प्लॅन करताना तू कुणाला आदर्श मानतोस?
माझे वडील आयटी उद्योजक आहेत,  तेच माझे आदर्श आहेत. त्यांच्याबरोबरच मी स्टीव्ह जॉब्जकडेही माझा रोल मॉडेल म्हणून पाहतो. स्टीव्ह जॉब्ज स्वत: अत्यंत निश्चयी होता. अपयशातूनही त्यानं संधी शोधल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो ऑल-राउण्डर होता. आपल्या व्यवसायातली प्रत्येक गोष्ट त्याला यायची. त्यामुळेच मलासुद्धा त्याच्यासारखंच व्हायचं आहे. 
 
मुलाखत आणि शब्दांकन
-अमृता कदम