शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
3
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
4
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
5
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
6
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
8
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
9
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
10
IND vs NZ : पुण्यातही किवींनी काढला भारतीय फलंदाजीतील जीव; फरक फक्त एवढाच की,...
11
Diwali 2024: अयोध्येत प्रथमच बालकलाकारांकडून रामरक्षा आणि गीत रामायणाचे होणार सादरीकरण!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
13
"ईश्वर पूजाच्या आत्म्याला शांती देवो"; जिवंत बायकोचं नवऱ्याने घातलं श्राद्ध, केलं दुसरं लग्न
14
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
15
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
16
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
17
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
18
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
19
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
20
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!

अरे, यार किती बोलता तुम्ही?

By admin | Published: January 02, 2015 3:51 PM

खटकणा-या गोष्टींचा त्रस करून न घेता स्वत:सह मित्रंनाही सांगितलं जातं की, इग्नोर मार यार, सोड ना टॉपिक.! त्याच (न संपणा-या) यादीतले हे काही महत्त्वाचे मुद्दे. मुलामुलींच्याच शब्दात.

काय काय जाम बोअर होतं?

 
‘बिग बो....’ हा शब्द ‘त्यांच्या’ बोलण्यात येतोच अधूनमधून. मराठीत सांगायचं तर बिग ... म्हणजे  बिग बोअर!
‘कसला बोअर ड्रेस आहे, किती बोअर मारते आई, जाम बोअर टाकलं यार बाबांनी,  बोबो ( बोगस+बोअर) होता यार पेपर, भेजाचा बोअरडम झाला यार.’
ही वाक्य इतक्यांदा वापरली जातात की, ऐकणा:याला वाटावं; या मुलांना बोअर होण्यापलीकडे दुसरं काही होतं की नाही.?
आणि मग गम्मत म्हणून समजा, एक यादीच करायची ठरवली की, वयाच्या पंधराव्या वर्षी नेमकं काय काय बोअर होतं? इरीटेट करत डोक्यात जातं? खटकणा-या गोष्टींचा त्रस करून न घेता स्वत:सह मित्रंनाही सांगितलं जातं की, इग्नोर मार यार, सोड ना टॉपिक.! त्याच (न संपणा-या) यादीतले  हे काही महत्त्वाचे मुद्दे.  मुलामुलींच्याच शब्दात.
 
जे गुगल करून मिळतं,  तेच चिपकवून प्रोजेक्ट करणं,  इमॅजिन करा, किती बोअर असेल? काढ प्रिण्ट की मार प्रोजेक्ट,  हेच एक बिग बो आहे !’’
 
‘‘सतत कम्पॅरिझन. पेपरवाले छापतात कशाला  यशस्वी मुलांच्या कहाण्या, कुणाला दीड-दोन कोटीच्या नोक:या मिळाल्या याच्या बातम्या? तशा बातम्या दिसल्या की, आईवडील ऐकवतात आम्हाला .बघा .बघा असं काहीतरी करा!  असे लावा किमान दिवे, फुकट मिळतं सगळं त्याचं चीज करा ! ’’
 
> अभ्यास जाम म्हणजे जाम बोअर होतो. त्यातही बीजगणित, भूमिती आणि कसकसले प्रोजेक्ट! रट्टामार अभ्यास आणि परीक्षा, सगळ्यात बोअर काम.
> जे आपल्याला आवडत नाही ना, तेच खायला घालतात. आई तर एकसेएक फालतू भाज्या करून खाऊ घालते, भोपळा, दोडकी, पडवळ, गिलकी या काही खायच्या गोष्टी आहेत का?
> एका जागी शांत बसणं हे एक आणखी अवघड बोअर काम. शाळेत आणि घरी मात्र सगळ्याचं आपलं एकच, अरे शांत बसा, प्लीज हे काय आमचं शांत बसायचं वय आहे?
> एकच काम जास्त वेळ करायला सांगतात, म्हणजे काय तर पाठांतर करा, प्रोजेक्ट करा, वर्गात बसा.
> घरकाम करणं जाम बोअर काम, उष्टी-खरखटी आवरा, दळण आणा, गाद्या घाला, कपडय़ांच्या घडय़ाच करा, आणि कुणी काही सांगितलं की पळा दुकानात आणायला, आणि वर ऐका, की काहीही काम सांगा, ऐकत नाहीत पोरं.
> घरचे, नातेवाईक, शिक्षक किती बडबड करतात. बाष्कळ बडबड, उगाचच बोअर मारतात. मुद्दय़ाचं बोला ना यार, पॉइण्ट कळला, किती बोलाल.
> भाषणं जाम बोअर होतात, सतत उपदेश, नका ना म्हणजे बोलू..
> टीव्हीवरच्या ‘आईवाल्या’ सिरीयल्स कम्प्लसरी पाहणं जाम बोअर होतं.
> आईचं व्हॉट्सअॅपवर सतत असणं, आणि मैत्रिणींसह नातेवाइकांशी तासन्तास बोलत राहणं, आपल्या घरात जे जे घडतं ते ते सारं बाकीच्यांना सांगितलंच पाहिजे का?
> सकाळी लवकर उठणं हे आणखी एक बोअर काम, समजा उठलो उशिरा तर काय एवढं बिघडतं?
> सतत केस काप, केस काप असं म्हणतात ना घरचे तो एक ताप होतो.
> सततच्या सूचना; ‘आमच्यावेळी.’ ही टेप तर ब्रेकही घेत नाही.
> सगळ्यात बोअर, भयंकर बोअर म्हणजे याच्या त्याच्याशी तुलना. मोठी भावंडं, मावसेकाके भावंडं, इथपासून जे तुलना सुरू होते ती थेट मोदी आणि महात्मा गांधींर्पयत. बघा, ते कसे ग्रेट झाले.
> सिम्पल लॉजिक आहे, ते त्यांच्या मावसभावांसारखे वागले नसतील म्हणून ग्रेट झाले ना!.
------------
कुठले शब्द इन ? कूल
इतकी मुलं भेटली, अनेकांशी गप्पा मारल्या. भले माध्यम वेगळं असेल शिक्षणाचं, शहरं ते गावं असा प्रवास असो, पण या मुलांच्या तोंडी असलेले, त्यांच्या भावना व्यक्त करणारे शब्द, त्या शब्दांवर 
अचूक ठिकाणी दिलेला भार. हे सारं सारखंच होतं. असे कुठले शब्द या मुलांच्या आयुष्यात सतत भेटतात.?
 
बिग बो 
-म्हणजेच बिग बोअर. त्यांना ज्या गोष्टी, जी माणसं, ज्या घटना बोअर करतात, इरीटेट करतात, त्रस देतात, किंवा ज्यांची टिंगलच करायची असते, त्यासाठी अनेकजण हा बिग बो हा शब्द ‘बो’च्या पुढे हेल काढून वापरतात. एकदा बिग बोùù म्हटलं की बाकीच्यांना काय समजायचं ते समजतं.
 
कूल
कूल हा आणखी एक परवलीचा शब्द. कुणाला थॅँक्यू म्हणायचं असो किंवा प्रशंसा करायची असो, अॅटिटय़ूड सांगायचा असो किंवा शांत बसायचं असो, हा कूल शब्द ब:याच गोष्टी व्यक्त करतो.
 
चील.
जी कूलची गोष्ट, तीच चीलची. जरा शांत हो, जरा सोडून दे, जरा आराम कर, व्हसव्हस कमी कर असं सांगण्यापासून स्वत:च्या मानसिक अवस्थेर्पयत सारं चील असतं.
 
सोड ना.
एखाद्या विषयाचा डोक्याला ताप  झाला, कुणी फारच  लावून धरला की तो विषय संपवण्यासाठी हमखास शब्द. सोड ना.
 
डंबो
मठ्ठ माणूस, वृत्ती आणि प्रवृत्ती व्यक्त करण्यासाठी हा एकच शब्द पुरतो.
 
 
इग्नोर मार
एखादी गोष्ट दुर्लक्ष करायला सांगायची असेल तर शब्द दोनच, इगAोर मार.
 
कसलं सेक्सी आहे यार.
हे वाक्य कुठंही सहज वापरलं जातं, म्हणजे कसली सेक्सी भाजी आहे इथपासून तर आज हवा कसली सेक्सी आहे इथर्पयत.
 
फोन मार-फॉरवर्ड टाक
गॅजेट्स वापणारी मुलं हमखास म्हणतात मला एक फोन मार, काहीतरी चांगले फॉरवर्ड टाक.
हे मार-टाक दिवस दिवस चालू असतं, टुकूटुकू.