पाठीवरचं बोचकंवजनाचा आकडा. मार्कशिटवरच्या लाल रेषा. मार्कांचे बिचारे टक्के. कुणाकुणाचे आता कधीही डायल करावे न लागणारे फोननंबर.. कुणी कुणी दिलेल्या, आणि आता फक्त छळणाऱ्या भेटवस्तू..कुणी कुणी कधी कधी केलेले अपमान.. कुणी मारलेले टोमणे कुणाच्या रोखून पाहणाऱ्या नजरा..आॅफिसात मिळालेले मेमो.. वडिलांनी दिलेले फटके..शेजारच्यांनी दिलेला त्रास..मित्रानं केलेला घात..मैत्रिणीनं दिलेला दगा.ब्रेकपनं भिजले रुमालपरीक्षेतलं अपयशहे सारं काय आहे?- ओझं.ते ओझं आपण मनावर सतत वागवतो.कधी मनाच्या माळ्यावर आतल्या बाजूला ठेवतो.कधी बाहेर काढून उस्तवार करतो.कधी ते बदाबद आपल्या अंगावर पडतं..आणि मग आपण ते तसंच ठेवून देतो कोंबूनमग ते डोकावत राहतं कुठकुठून...हे सारं का करतो आपण?ते ओझं उतरवून नाही ठेवता येणार?दिवाळीत माळ्यावरच्या अनेक अडगळीच्या गोष्टी भंगारात देतो,तसं भंगारात नाही काढता येणार?उगीच चोंबाळत बसायचं ते ओझं..ुउरापोटी घेऊन धावायचं..आणि मानगुटावर ओझं आहे म्हणून आपला स्पीड कमी पडतोम्हणत चिडचिडायचं.कशाला असं?उतरवून ठेवू,नकोसे आकडे.नकोसे टोमणे, नजरा. झालेले अपमान.नको त्या खुपत्या भावना.छळकुटे संवाद.हलकं वाटलं,तर कदाचित आपला आनंदी जगण्याचास्पीड वाढेल..ओझं वागवायचंकी उतरवून ठेवायचं..निर्णय आपला.. आपलाच!उडी आणि जमीनजास्त उड्या मारू नकोस..आपटशील..असं कुणी सांगितलं तर त्याच्याकडे बिंधास्त दुर्लक्ष करा!आणि स्वप्न आपलं कितीही मोठं असो,ेबेलाशक, हिमतीनं उडी मारा.विश्वास स्वत:वर पाहिजे,स्वत:तल्या बळावर पाहिजे,तेवढा पुरतो!पण अंदाज चुकला..उडी चुकली आणि आपण आपटलोच तर?तर...?तर काय?आपटलो तरी पडू तर जमिनीवरच ना!!आपण उड्या मारतोय,आकाशात उडतो म्हणूनकुणी आपल्या पावलाखालची जमीन तर नाही ना काढून घेऊ शकत?शकतं का?आपण उडालो, तरी आपली जमीन तिथंच राहते..पडलो तरी जमिनीवर पडू..लागलं तर परत उभं राहू..परत चालू, परत उडू..एवढा विश्वास तर कायम राहतो स्वत:वर..अंगावरच्या जखमांच्या खुणाआणि न भरलेले व्रणहे आपल्या धाडसाचे पुरावे..ते मानानं जपावेत..साजरे करावेत..मिरवावेत..
ओझं
By admin | Published: October 27, 2016 3:54 PM