‘व्हाय नॉट?’ ‘लागते कशाला प्रायव्हसी, खुल के जिओ’ असं का म्हणताहेत, सेल्फी-ग्रुपी काढणारे तरुण मुलं?
सेल्फीज् हा शब्दच माहिती नाही, असा कुणी सापडणं चालू वर्तमानकाळात तसं अवघडच आहे. कुणाला माहिती नाही? ज्यानं ‘स्मार्टफोन’ पाहिलाय, वापरलाय, त्याला ‘सेल्फी’ हा शब्द माहिती असतोच!
सेल्फी ( २ी’ा्री२) म्हणजे काय तर स्मार्टफोनने,
किंवा वेबकॅमने स्वत:च स्वत:चा काढलेला आणि कुठल्याही सोशल नेटवर्किंग साइटवर टाकलेला फोटो.
२0१३ या वर्षानं जगाला भेट दिलेला हा शब्द. त्यावर्षीच जगभरातल्या माणसांच्या हातात सर्वाधिक स्मार्टफोन आले आणि त्या स्मार्टफोनच्या फ्रण्टकॅमेर्यानं जो तो आपापले फोटो स्वत:च काढू लागला. त्या वर्षी ‘सेल्फी’ या शब्दाचा वापर १७ हजार टक्के वाढला. आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीत या शब्दाचा समावेशही करण्यात आला!
आता तर काय ‘सेल्फी’ काढणं ही एक लेटेस्ट फॅशन आहे, क्रेझ आहे आणि ट्रेण्डही. ओबामांपासून-मोदींपर्यंत वर्ल्ड लीडर्स जिथे या ना त्याप्रसंगी स्वत:च ‘सेल्फी’ काढू लागले, तिथे बाकीचे किस झाड की पत्ती?
सेल्फी. स्वत:वर अपरंपार प्रेम करायला आणि जे जगजाहीर व्यक्त करायला शिकवणारा एक नवं ऑब्सेशनच!
कपली
कुणाही जोडप्यानं स्वत:चा काढलेला सेल्फी म्हणजे हा कपली. खरं तर याचा इंग्रजी उच्चार करतात ‘कपलीज्’. सेलिब्रिटी कपल्सच्या सेल्फीज्ना कपलीज म्हणण्यापासून या ट्रेण्डची सुरुवात झाली आणि आता तर कुणीही कपल आला फोटो ‘कपली’ म्हणूनच शेअर करतो.
मिरर सेल्फीज्
काहींना असतेच ना तासन्तास स्वत:ला आरशात पहायची सवय. आरशासमोर उभं राहून स्वत:चं प्रतिबिंब टिपण्याची हौस. आरशासह स्वत:चा फोटो काढणं आणि तो अपलोड करणं म्हणजे मिरर सेल्फीज्.
डेल्फी
आता हे डेल्फी म्हणजे काय ऐकाल तर उडालच तुम्ही.
डेल्फी (delfies) म्हणजे सेल्फी विथ डॉग. अनेकांना आपल्या कुत्र्याला कुत्रा म्हटलेलं आवडत नाही. ते सतत त्या कुत्र्याबरोबर फोटो काढत शेअर करतात, तेच हे डेल्फी.
ग्रुपी.
सेल्फी हा सगळ्यात हॉट आणि तरुण शब्द आहे असं म्हणता म्हणता ‘सेल्फी’ हा तसा ‘नॉट सो कूल अँण्ड ट्रेण्डी’ गटात जाऊन पडला. आता त्याची जागा घेतली आहे ती ‘ग्रुपी’नं. सोप्या शब्दात ग्रूपचा फोटो म्हणजे ग्रुपी ( groupie) . मागच्या वर्षी ऑस्कर सोहळ्याच्या वेळी तमाम बड्या स्टार्सचा ग्रुपी जगभर गाजला, आणि मसार्या जगातच ग्रुपीची क्रेझ आली. आता तर व्यायाम करण्यापासून पार्टी करण्यापर्यंत ग्रुपचं पागलपण या ‘ग्रुपी’नं जगजाहीर होऊ लागलं.
यूजीज्
तरुणांच्या ट्रेण्डी भाषेचा अभ्यास करणार्यांचं म्हणणं आहे की, सेल्फीज् हा शब्दच फार जनरलाईज्ड आहे. सेल्फीज् हा शब्दच आता जुना झाला. आता जमाना आहे यूजीज्चा. आता हे यूजीज् म्हणजे काय तर एकाहून अधिक माणसांचा कुणीतरी फ्रण्टकॅमेर्यानंच काढलेला फोटो. मात्र ज्यानं काढला त्याचा तो सेल्फी म्हटला तर बाकीच्यांचा काय? बाकीचे त्या फोटोतले ‘यूजीज्’. (Usies) फोटो सगळ्यांचा, सगळ्यांच्या ‘यूज’चा म्हणून बाकीचे यूजी. एकेकट्यांचे सेल्फीज् बोअर करतात, पण हे अनेकांचे किंवा कुणा दोघांचे यूजीज् म्हणजे धमाल असा नवीन ट्रेण्ड आहे.
बेल्फी
बेल्फी (celfies) म्हणजे स्वत:च स्वत:चा पाठमोरा काढलेला फोटो. चेहरा न येऊ देता, पाठमोरे, एकाबाजूचे फोटो काढत शेअर करणं आणि इतरांना बुचकळ्यात पाडणं हा सध्या अनेकांचा छंद. ते म्हणजेच बेल्फी.
बाथरूम सेल्फीज्
बाथरूममध्ये अंघोळ करताना, ब्रश करताना कुणी स्वत:चे फोटो काढेल का?
लोक काढतात आणि ते सोशल नेटवर्किंगवर टाकतातही. त्यालाच म्हणतात बाथरूम सेल्फीज. सध्या सगळ्यात फेवरिट हॅशटॅग कोणता हे शोधलं तर बाथरूम सेल्फीज आघाडीवर आहेत.