सोशल मीडिया या दोन शब्दांनी सारं उघड-वाघड करून, पर्सनल लाइफच संपवून टाकलं ते हे वर्ष. सोशल मीडिया तसा काही आता नवीन नाही. २०१६ मध्ये सोशल मीडियात फार वेगळं असं काही घडलं नाही...घडलं ते एकच, जे तरुण सोशल मीडियात नव्हते ते मोठ्या संख्येनं सोशल मीडिया वापरू लागले आणि वापरापेक्षा गैरवापरानं हे वर्ष जास्त गाजलं...त्या सोशल मीडियाची नोंद घेतल्याशिवाय २०१६ची मेमरी रिव्हाईजच होऊ शकत नाही...१) सोशल मीडियात अनेक ट्रेण्ड आले. दहशतवादाचा धिक्कार म्हणून, एलजीबीटी कम्युनिटीला सपोर्ट म्हणून आणि सोशल कॉजला पाठिंबा म्हणून अनेकांनी आपापले डीपी अनेकदा बदलले. त्यातल्या अनेकांना आपण नेमका फोटो का बदलतोय हेदेखील माहिती नव्हते.२) नो सेव्ह नोव्हेंबर, पूट यूवर हॅण्ड हाय, चिर्पी आइज, बी बोल्ड, मदरहूड चॅलेंज, बुक चॅलेंज असे अनेक चॅलेंजेस सारखे येत-जात राहिले आणि त्या लाटांत अनेकजण भिजले.३) पाकिस्तानातला चायवाला, नेपाळी तरकारीवाली यांसारखी सामान्य माणसं सोशल मीडियातल्या लाटेनं रातोरात स्टार झाली. आणि जगभर फेमसही झाली. ४) अनेकांच्या पर्सनल लाइफचं वाभाडं सोशल मीडियात निघालं. आणि पर्सनल असं काहीच न उरल्यानं नामुष्कीची, बदनामीचीही वेळ आली.५) सोशल मीडिया अॅडिक्शन प्रचंड वाढलं आणि त्यापायी डी अॅडिक्शन, डी स्ट्रेस सेण्टर्सही मोठ्या शहरांत सुरूझाली.६) सगळ्यात गंभीर म्हणजे सोशल मीडिया साइट्सवरच्या वाढत्या संपर्कातून गुन्हेगारी वाढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वाढल्या.
उघडा-वाघडा
By admin | Published: December 28, 2016 5:22 PM