शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आउटसाइडर- फिल्म इंडस्ट्रीत बिनचेहऱ्याने  राबणारे  ते  नक्की  कोण  असतात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 4:06 PM

स्पॉटबॉय, स्टंटमॅन, लाइट-साउण्ड सांभाळणारे, एडिटर्स, कोरिओग्राफर्स, सहाय्यक दिग्दर्शक, लेखक असे बरेच.. सगळेच काही स्टार होत नाहीत. वेतनही तुटपुंजं. सुरक्षितता आणि स्थैर्य नावाचा प्रकार नसतोच. यातले बहुतेकजण छोटय़ा शहरांमधून ग्रामीण भागातून मोठी स्वप्न घेऊन आलेले असतात. त्यांचा संघर्ष इतका दीर्घ आणि दमवणारा असतो की, ऊर्जेने भरलेली ही पोरंपण एका टप्प्यावर थकतात.

ठळक मुद्देही सगळी इंडस्ट्रीमधली खरीखुरी आउटसाइडर मंडळी.

-अमोल उदगीरकर

नैराश्य (डिप्रेशन) आणि त्यातून होणारी आत्महत्या हे खूप गुंतागुंतीचं प्रकरण असू शकतं.कोरोना आणि लॉकडाऊननंतर मनोरंजन क्षेत्रतल्या अनेक माणसांची आर्थिक आणि मानसिक ससेहोलपट सुरू झाली. त्यातून आलेल्या नैराश्यातून काही दुय्यम अभिनेत्यांनी आत्महत्या केल्या. पण माध्यमांमध्ये चार ओळींच्या बातम्यांपलीकडे याची दखल घेण्यात आली नाही. पण सुशांतसिंग राजपूत या अतिशय गुणवान, होनहार अभिनेत्याने आत्महत्या केली आणि चित्रंच बदललं. सुशांत हा लोकप्रिय, मुख्य व्यावसायिक धारेतला सिनेमा करणारा अभिनेता असल्यामुळे कदाचित सगळेच जण या आत्महत्येवर बोलू लागले. माध्यमांनी या आत्महत्येला प्रचंड प्रसिद्धी दिली. त्यात एक मुद्दा असा होता की, काही तुरळक घराण्यांच्या आणि काही बडय़ा प्रॉडक्शन हाउसची मक्तेदारी असणा:या क्षेत्रत ‘आउटसाइडर’ असणं हा या आत्महत्येमागचा कळीचा मुद्दा असावा. सगळ्याच क्षेत्रत ही अंतस्थ विरु द्ध बहिस्थ लढाई कमीजास्त प्रमाणात चालू असते. पण मनोरंजन क्षेत्रत ही लढाई जितकी विषम आहे तितकी फार कमी क्षेत्रत असावी. मनोरंजन क्षेत्रंचं काही निवडक शहरांमध्ये केंद्रीकरण झालेलं असणं, काही घराण्यांची या क्षेत्रवर घट्ट पकड असणं, बाहेरून या क्षेत्रत आलेल्या माणसाला सतत स्वत:ला सिद्ध करत राहण्याचं राक्षसी ओझं वागवावं लागणं ही आणि इतर अनेक कारण या लढाईतल्या विषमतेला कारणीभूत आहेत. मनोरंजन क्षेत्रत काम करणारे लोक आणि इतर क्षेत्रतले लोक एकमेकांकडे फार वेगळे चष्मे लावून बघतात. पण फिल्म्समध्ये (आणि एकूणच मनोरंजन क्षेत्रत काम करणा:या) स्ट्रगलर्सचं स्वत:चं एक जग असतं. ही जमात वर्सोव्यात राहते. तिथून त्यांना पुढची ङोप सरळ बांद्रय़ात घ्यायची असते. नोकरदार माणसांकडे हे लोक तुच्छतेने बघतात आणि ते लोक यांच्याकडे प्राणिसंग्रहालयातल्या प्राण्यांकडे बघावे तसे कुतूहलाने. हे स्ट्रगलर इतरांकडून उधार मागून सिगारेट फुकतात. घरमालकाला भाडं देताना यांची तारांबळ उडते. आरामनगरमधल्या बारमध्ये बसून स्वस्त दारू पिताना हे लोक ‘सौ करोड क्लब’वाली फिल्म बनवून ‘इंडस्ट्री पे छा जाने के’ बेत बनवत असतात. आज खिसा फाटका असला आणि बूट चावत असला तरी ‘आनेवाला कल’ आपलाच असेल असा आत्मविश्वास त्यांना असतो. मनोरंजन क्षेत्रत काम करणा:या लोकांबद्दल इतर क्षेत्रतल्या लोकांना सुप्त आकर्षण असतं. अस्ताव्यस्त, वेळेची चाकोरी मोडणा:या जीवनशैलीचं आकर्षण आणि या मनोरंजन क्षेत्रत कार्यरत असलेल्या वर्गाबद्दल असलेले अनेक प्रवाद. या क्षेत्रतले लोक रोजच पाटर्य़ा करतात, नेहमी नशेत धुत्त असतात, रोज वेगळ्या लोकांसोबत झोपतात, अतिशय लहरी असतात, असे अनेक प्रवाद या लोकांबद्दल प्रचलित असतात. अर्थात हे सरसकटीकरण इतर कुठल्याही क्षेत्रबद्दल प्रचलित असलेल्या सरसकटीकरणाइतकंच चुकीचं आहे.दुर्दैवाने मनोरंजनक्षेत्रत काम करणारे म्हंटलं की, लोकांच्या डोळ्यासमोर फक्त प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रीचं येतात. या क्षेत्रत असंख्य चेहरा नसलेली माणसंपण काम करत आहेत. सहाय्यक दिग्दर्शक, लेखक, स्पॉटबॉय, स्टंटमॅन, लाइट सांभाळणारे लोक, साउण्ड सांभाळणारे लोकं , एडिटर्स, कोरिओग्राफर्स आणि चित्रपटनिर्मितीमध्ये सहभागी असणा:या इतर अनेक डिपार्टमेंटचे लोकं. इंडस्ट्रीमध्ये सगळेच अभिनेते -अभिनेत्री  स्टार नसतात. अनेक अभिनेते छोटय़ा पडद्यावर काम करत असतात. अनेकजण दुय्यम भूमिका करणारे असतात. त्यांचा आर्थिक आणि मानसिक संघर्षपण तितकाच भयावह असतो. यातल्या बहुतेकांना तुटपुंज वेतन मिळतं. त्यांच्या आयुष्यात सुरक्षितता आणि स्थैर्य नावाचा प्रकार औषधालापण नसतो. नक्की आकडेवारी उपलब्ध नसली तरी या चेहरा नसलेल्या काही माणसांच्या आत्महत्याही दरवर्षी होतात. पण त्यांच्याभोवती अभिनेत्यांसारखं वलय नसल्यामुळे त्यांच्या आत्महत्येची कुणीही आणि कुठेही दखल घेत नाही. यातली बहुतेक लोक छोटय़ा शहरांमधून -ग्रामीण भागातून मोठी स्वप्न डोळ्यात घेऊन आलेली असतात. या क्षेत्रत कुणीही गॉडफादर नसल्यामुळे आपल्या नशिबी मोठा संघर्ष आहे, याची मानसिक तयाररी या मुलामुलींची असते. पण तरी हा संघर्ष इतका दीर्घ आणि थकवून टाकणारा असतो की, ही ऊर्जेने भरलेली पोरंपण एका टप्प्यावर थकतात. कुठलंही अॅप्रिसिएशन नसताना, आर्थिक कुमक नसताना आणि हवं असलेलं यश नजरेच्या टप्प्यात दिसतं नसतं. कोरडवाहू शेती कसणारा बाप अगोदरच आपल्या फाटक्या खिशातून जमलं तसे पैसे मुश्किलीने पाठवत आहे, याची आतून सोलून काढणारी जाणीव त्यांना डाचत असते. त्यातलंच कुणीतरी पुढं जाऊन दिग्दर्शक बनतं. पण मोठय़ा मुश्किलीने स्वत:लाच बाजारपेठेला गहाण ठेवून सिनेमा बनवला तरी तो प्रदर्शितच होत नाही. एखादा लेखक सिनेमा लिहितो; पण त्याचं शूटिंगचं सुरू होत नाही. त्यावेळेस येणारं नैराश्य आयुष्य भोवंडून टाकणारं असू शकतं. 

हा चित्रपट बॉलिवूडमधल्या स्ट्रग्लर्सच्या आयुष्यावर प्रकाश टाकतो. या चित्रपटातली दोन्ही मुख्य पात्रं अभिनयाच्या क्षेत्रत संघर्ष करत असतात. त्यातला नायक दिल्लीचा आणि नायिका कानपूरची. पूर्ण चित्रपट या दोन आउटसाइडर लोकांच्या नजरेतून दिसतो. हा चित्रपट एकूणच बॉलिवूडमध्ये कसं काम चालतं, यावर खुसखुशीत भाष्य करतो. हे भाष्य करत असताना बॉलिवूडमधल्या अभिनय सोडून इतर क्षेत्रंत कार्यरत असलेल्या व्यावसायिकांवरही प्रकाश टाकतो.या चित्रपटात एक सुंदर सीन आहे. विक्रम (फरहान) सोनाच्या (कोंकणा सेन) घरी आलेला असतो. सोना बाहेर जाऊन कुठूनतरी दूध घेऊन येते. ‘इतका वेळ तू कुठे गायब होतीस?’ अशी विक्रम तिला विचारणा करतो. त्याच्या या साध्या प्रश्नाला सोना जे उत्तर देते, ते बॉलिवूडच्या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित पेशाकडे आपलं लक्ष वेधतं. सोना विक्रमला सांगते की, तिचा फ्रीज बिघडला असल्यामुळे ती शेजारच्या वर्मा आंटीच्या फ्रीजमध्ये दूध ठेवते, ते घ्यायला गेले होते. इतकी चांगली शेजारीण सोनाला मिळाली आहे याबद्दल विक्रमला कौतुक वाटतं. पण लगेच सोना सांगतेल वर्मा आंटी तिच्याकडून फ्रीजमध्ये दूध ठेवायचे पैसे घेतात.वर्मा आंटीची असं करण्यामागे काही कारणं असतात. त्यांचे पती एकेकाळी स्टंटमास्टर असतात. एका अवघड स्टंटचं शूटिंग करताना त्यांना मोठा अपघात होतो आणि ते अपंग होऊन अंथरु णाला खिळतात. ‘वर्मा आंटी को भी अपना घर चलाना है,’ असं सोना सांगते. लक बाय चान्समधला हा सीन इंडस्ट्रीमधल्या धोकादायक क्षेत्रत काम करणा:या शेकडो लोकांच्या अवस्थेवर भाष्य करतो. विषमता ही सगळ्याच क्षेत्रत असते. काही लोक यशस्वी असणं आणि बहुसंख्य तितके यशस्वी नसणं हे तसं स्वाभाविकच. पण ‘नाही रे’ वर्गातून आपण आज न उद्या ‘आहे रे’ वर्गात जाऊ अशी आशाच संपणं सगळ्यात वाईट. पण या ‘नाही रे’ वर्गातल्या लोकांच्या आत्महत्यांची कुठंही दखल घेतली जात नाही. मनोरंजन क्षेत्रत काम करणा:यांना आपल्या एकटेपणाचं, नैराश्याचं फारसं शेअरिंग कुणासोबत करता येत नाही हा एक कळीचा मुद्दा आहे. याचं कारण आपल्या समाजव्यवस्थेत आणि कुटुंबव्यवस्थेत दडलं आहे. ही बहुसंख्य लोक कुठलीही मनोरंजन क्षेत्रची पाश्र्वभूमी नसलेल्या कुटुंबातली आहेत. 

ही खरीखुरी आउटसाइडर मंडळी. यांच्या गरीब/मध्यमवर्गीय आईबापांना विचारलं की तुमचा मुलगा काय करतो तर बिचा:या आईवडिलांना त्याचं नीट उत्तरपण देता येत नाही. जिथं आपल्या कुटुंबीयांना आपलं क्षेत्रच नक्की माहीत नाही, तिथं त्यांच्यासोबत आपल्या व्यावसायिक शेअरिंग तरी कसं करणार? कुटुंब ही तुमच्या नैराश्याविरोधातल्या लढाईतली पहिली फळी असते. या क्षेत्रतल्या आउटसाइडर माणसाला नेमकं हेच उपलब्ध नसतं. ही सगळी इंडस्ट्रीमधली खरीखुरी आउटसाइडर मंडळी. संधीच्या आणि आशेच्या अभावातून त्यांना येणारं नैराश्य हे त्यांना उद्ध्वस्त करणारं असतं.सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर एकूणच इंडस्ट्रीमध्ये आउटसाइडर   असणं आणि त्यातून येणार नैराश्य या गोष्टीवर चर्चा सुरू झाली ही असलीच तर फक्त सकारात्मक सुरु वात. जेव्हा या चर्चा दुय्यम अभिनेते, सह-अभिनेते, स्टंट करणारे, लेखक, सहाय्यक दिग्दर्शक, कोरिओग्राफर आणि चेहरा नसलेले शेकडोजण यांना कवेत घेतील, तेव्हाच मनोरंजन क्षेत्रतल्या नैराश्यातून होणा:या आत्महत्येच्या वर्णव्यवस्थेच्या शेवटाला सुरु वात झाली असं म्हणू शकू. आशा आहे, तो दिवस लवकरच येईल. उम्मीद पे दुनिया कायम है.