शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

‘हृदयात वाजे समथिंग’ ही भंकस अंधश्रद्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 6:30 AM

‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध. 

ठळक मुद्देका? कोण? काय? कधी? - लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट

- रामप्रसाद गायकवाड, अंबाजोगाई, जि. बीड  

1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?

माझे  वडील. जगात सर्व काही विसरलं तरी चालेल, पण कधी बाप विसरायचा नाही. ज्याच्याशी बोलण्याने, ज्याच्या असण्याने जी सकारात्मक ऊर्जा मिळते ती आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरते.

2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?आपण उच्चविद्याविभूषित आहोत. ठरवलेलं ध्येय गाठण्यात आपण सक्षम ठरू का? - हा प्रश्नच मुळात स्ट्रेस वाढवतो. घरच्यांच्या व समाजाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे नक्की झेपेल का नाही? - या प्रश्नाचे ओझे वाहण्यातच माझी पिढी खचलेली आहे. त्याला मीसुद्धा अपवाद नाही.

3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?

हल्ली जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणी असणे ही एक अभिमानाची, प्रतिष्ठेची गोष्ट, गरज बनत चाललेली आहे; परंतु या मैत्रीला स्वार्थ नावाच्या विषाणूचा संसर्ग झाल्यानेच की काय, मित्र-मैत्रिणीच्या गराडय़ात असूनसुद्धा मी मनातून मात्र एकटाच आहे.

4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? र्

आमचीच जनरेशन गंडलेली आहे. आम्हाला आई-वडिलांनी कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिलेली नाही. त्यामुळे आमच्या जनरेशनला संघर्ष, धरपड, चिकाटी ही मूल्ये ठाऊकच नाहीत. दोन्ही पिढय़ांमध्ये इमोशनल बॉण्ड नाही, त्यामुळेच आम्हाला आई-वडिलांशी हवं तेवढं कनेक्ट होता आलेलं नाही.

5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? 

लव्ह-लाइफ सुरुवातीला दिलासा देणारंच असतं; पण काही काळाने तो अत्यंत कॉम्प्लिकेटेड स्ट्रेस होऊन बसतो. ‘हृदयात वाजे समथिंग’वालं प्रेम ही एक अंधश्रद्धा आहे.

6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?

 नक्की काय ठरलंय ते सांगता येणार नाही; परंतु जे करू ते मात्र अत्यंत मनापासून, त्यात स्वतर्‍ला झोकून देऊन करायचं ते मात्र नक्कीच ठरवलंय. 

7. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?

वैविध्यपूर्ण संस्कृती, एकता आणि त्यातून निर्माण झालेल्या एकात्मतेचा अभिमान आहे. अशा संपन्न देशात धर्म-जात, भाषा, प्रांत यावरून दंगे पेटवणार्‍या, कर्मकांडात अडकलेल्या माणसांची मला तीव्र चीड आहे.

------------------------------------------------