- रोहित सूर्यवंशी
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
माझा आतार्पयत इंजिनिअरिंगमध्ये कोणताही विषय मागे राहिलेला नाही, ही सगळ्यात भारी गोष्ट आहे आयुष्यातली! इंजिनिअरिंग करणे हे माझे लहानपणापासून पाहिलेले स्वप्न होते. ते आता लवकरच पूर्ण होईल.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
डिग्री पूर्ण झाल्यानंतरच्या गेट एक्झाम क्वॉलिफाय करणे हा सगळ्यात मोठ्ठा स्ट्रेस! आता मोठा झालो आहे. त्याबरोबर येतात त्या जबाबदार्या पूर्ण करू शकेन ना, याचीही कधीकधी भीती वाटते.
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
मला खरंच खूप मित्र-मैत्रिणी आहेत, मी अजिबात एकटा-बिकटा नाही.
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? आमचीच जनरेशन गंडलेली आहे. आम्हालाच आमच्या आईबाबांशी कनेक्ट करता येत नाही. आम्ही प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा मोबाइल किंवा सोशल मीडियातूनच बोलतो हल्ली. त्यामुळे घरी आईबाबांशी बोलायला, त्यांच्याशी जुळवून घ्यायला आम्हाला खूप अवघड जातंय. फेस टू फेस बोलण्याचं स्किल आम्ही विसरतच चाललो आहोत, त्यामुळेच जॉब इंटरह्यूमध्ये आमच्या दांडय़ा जातात. मोबाइलमुळे आमची जनरेशन पूर्णपणे वाया गेलेली आहे.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? लव्ह-लाईफसाठी इथे वेळ कुणाला आहे?
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय? डिग्री पूर्ण झाल्यावर गेटची तय्यारी करायची आहे, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचीही तयारी आणि चांगली सरकारी नोकरी मिळवणे. बस्स! माझं ठरलंय!