- इरावती सुजाता आनंद
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
सगळ्यात भारी म्हणजे अभ्यासक्रमात इंटरडिसीप्लिनरिटी येतेय. माझी शैक्षणिक बॅकग्राउंड पॉलिटिकल सायन्सची आहे; पण मी इकोनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स, डेटा अॅनालिटिक्स हे सगळं एकाचवेळी शिकायचा प्रय} करतेय. तेच फार एक्सायटिंग आहे.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
मला सगळ्यात जास्त स्ट्रेस ‘अनसर्टनिटी’चा, अनिश्चिततेचा येतो. सतत बदलत्या तंत्रज्ञानामुळे नव्या गोष्टी सतत आयुष्यभर शिकत राहायला लागणार आहेत. ते केलं नाही तर मी ईररिलेव्हंट होण्याचा धोका आहे.
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
माझे मित्र-मैत्रिणी ही एक मस्त सपोर्ट सिस्टीम आहेत. त्यांच्यासह मी मजेत आहे.
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची?
ंमाझे स्वतर्चे आइबाबा फारच चांगले आहेत; पण त्यांच्या पिढीलाच एकूण फार एक्सपोजर नव्हतं. त्यामुळे त्यांची विचारांची पद्धत फार रिजीड-बंदिस्त झालेली दिसते.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस?
दुसरा पर्याय. फार कॉम्प्लिकेटेड आहे.
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय? नाही ठरलं माझं. दररोज खूप नवीन-नवीन माहिती येतेय. अशा परिस्थितीत एक्झ्ॉक्ट एकाच करिअरची वाट कशी ठरवता येईल?
7. संधी मिळाली तर भारत सोडून परदेशात जाईन/संधी मिळाली तर परदेशात शिकायला-नोकरी करायला जाईन; पण भारतात परत येईन ! - यातला कुठला ऑप्शन मी घेईन? का?
मी परत येईन. इथं माझं ‘घर’ आहे, मला इथं कम्फर्टेबल वाटतं.
8. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?
अभिमान कशाचा वाटतो?- तर भारताच्या घटनेचा!आणि चीड याची येते की, अनेक प्रसंगांत असं वाटतं की, परस्परांच्या वेदना समजून घेण्याची क्षमताच आपण गमावून बसलोय. सहानुभूती, सहवेदना हरवतेय.