- गार्गी रानडे1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
ही जाणीव की विद्यार्थी म्हणून माझ्याकडे खूप एजन्सी आहेत.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
क्लायमेट चेंज आणि भारत सरकार.
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
खूप आनंदी आहे. एकटी आहे असं कधीच नाही वाटत.
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची?
आमच्या आईबाबांची पिढी गंडलेली आहे.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस?
फार कॉम्प्लिकेटेड आहे.
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय? ठरलंय. मेंटल हेल्थ अर्थात मानसिक आरोग्य हा विषय सामान्य माणसार्पयत पोहोचवायचा आहे.
7. संधी मिळाली तर भारत सोडून परदेशात जाईन/संधी मिळाली तर परदेशात शिकायला-नोकरी करायला जाईन; पण भारतात परत येईन ! - यातला कुठला ऑप्शन मी घेईन? का?
शिकायला/नोकरी करायला जाईन, पण नक्की परत येणार!
8. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?
अभिमान वाटतो तो आमच्या पिढीचा आणि आमच्या राजकारणाचा. संताप येतो आमच्या पिढीतल्या त्या लोकांचा जे इतिहासातून काहीच शिकले नाहीत.