शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

पर्चे, मोर्चे, चर्चे

By admin | Published: February 19, 2016 2:58 PM

थेट जेएनयूमध्ये जाऊन समजून घेतलेलं या विद्यापीठाचं व्यक्तिमत्त्व. स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करणारं जेएनयू नेमकं ‘जगतं’ कसं याचा एक स्पेशल रिपोर्ट थेट जेएनयूच्या कॅम्पसमधून !

 

कॉलेज- अमृता कदम
( लेखिका नवी दिल्लीस्थित मुक्त पत्रकार आहेत.)
 
 मध्ये शिकत असताना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात जेएनयू म्हणजे ‘डाव्या विचारांचं केंद्र’ असाच समज होता. तेव्हा खरं तर ‘डावा-उजवा’ विचार फारसा कळायचाही नाही. पण तरीही जेएनयूची ही प्रतिमा डोक्यात रु जली होती. त्यानंतर हळूहळू जेएनयूचं सामाजिक, राजकीय क्षेत्नातलं वैचारिक योगदान कळत गेलं आणि वाटायला लागलं. मात्न गेल्या आठवडय़ापासून याच जेएनयूवर देशद्रोहाचा अड्डा, भारतविरोधी विचारांचं केंद्र अशी टीका होऊ लागली. विद्यार्थी संघटनांमधला वाद कॅम्पसच्या बाहेर पडून राजकीय आखाडय़ात आला. 
या सगळ्या घडामोडींमध्ये वाटलं, जाऊन पाहावं तरी की सध्याच्या राजकीय धुरळ्यापलीकडे जाऊन या विद्यापीठाचं नेमकं ‘व्यक्तिमत्त्व’ कसं आहे? इथलं पॉलिटिकल कल्चर नेमकं कसं आहे?
मी ज्यादिवशी जेएनयूमध्ये गेले, त्यादिवशी या प्रकरणी अटक केलेल्या जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाची, कन्हैयाकुमारची कोर्टामध्ये सुनावणी होती. त्यामुळे मुख्य गेट बंद आणि कडेकोट बंदोबस्त होता. बाहेर इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या ओबी व्हॅन होत्या. दुस:या गेटने आत गेले. विद्यापीठाच्या अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगशेजारच्या पाय:या आणि मोकळ्या जागेवर मोठय़ा संख्येनं विद्यार्थी जमले होते. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी घोषणा देत होते. तिथेच बाजूला काही विद्यार्थी लगबगीनं पोस्टर्स तयार करत होते. देशद्रोही म्हणत आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचेपी होत आहे, त्याचा रोष हे विद्यार्थी भाषणं, पथनाटय़ं, गाण्यातून व्यक्त करत होते. दुसरीकडे देशविरोधी घोषणा नेमक्या कोणी दिल्या हे माहिती नाही म्हणत त्या घोषणा देण्याचा निषेधही काहीजण करत होते. मात्न त्या कारणावरून जी पोलीस कारवाई सुरू झाली, त्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुळात हा मुद्दा विद्यापीठाच्या अखत्यारितला आहे; शिवाय इथे यापूर्वीही विद्यार्थी संघटनांमध्ये टोकाचे वाद-विवाद झाले आहेत, पण म्हणून त्याचं राजकीयीकरण करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं असल्याचंही काही जणांनी सांगितलं. 
या गर्दीतच मला बिजेश भेटला. मूळचा केरळचा असलेला बिजेश इथे एका सरकारी प्रोग्रॅमअंतर्गत ठरावीक कालावधीच्या इंटर्नशिपसाठी आलेला आहे. त्यामुळे तो कुठल्याही संघटनेशी जोडला गेलेला नाही. ‘केरळचा असल्याने मला विद्याथ्र्याची आंदोलनं काही नवीन नाहीत, पण इथल्या वातावरणातून तुम्ही राजकारण वेगळं काढूच शकत नाही,’ असं तो म्हणाला. सध्याच्या वादावर तो फारसं बोलला नाही. पण इथले विद्यार्थी राजकीयदृष्टय़ा जागरूक आहेत. त्यांची राजकीय मतं ही त्यांची ‘स्वत:ची’ आहेत, कोणीही त्यांच्यावर ती लादू शकत नाही, हे आपलं निरीक्षण त्यानं आवर्जून नोंदवलं. 
त्याच्या त्या निरीक्षणातून प्रश्न पडला की खरं तर कॉलेजमध्ये येताना आपली सगळ्यांची एकच अशी काही विचारसरणी नसते. असतो फक्त भाबडा आदर्शवाद. मग तिथून स्वत:ची राजकीय विचारसरणी बनवण्यार्पयतचा इथल्या विद्याथ्र्याचा प्रवास नक्की कसा होत असेल? त्यासाठीच मग इथल्या शिक्षकांशी, विद्याथ्र्याशी बोलून इथली विद्यार्थी संघटनांची रचना, त्यांची कार्यपद्धती आणि निवडणूक प्रक्रि या समजून घेतली. इथे प्रत्येक राजकीय पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. भाजपाची अभाविप, कॉँग्रेसची एनएसयूआय, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एआयएसएफ. इथे फुले-आंबेडकरवादी विचारांच्याही संघटना आहेत. आणि ज्यांच्या हक्कांबद्दल सध्या बरंच लिहिलं, बोललं जात आहे, त्या एलजीबीटींचीही संघटना आहे. विशेष म्हणजे, त्यांचा एक प्रतिनिधीही विद्यार्थी संघटनेवर आहे. विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका घेण्यासाठी विद्यापीठाची स्वतंत्न घटना आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी एक निवडणूक आयोगही नेमला जातो. या सर्व प्रक्रियांमध्ये शिक्षकांचा, विद्यापीठाचा कोणताही हस्तक्षेप नसतो. 
हे ऐकल्यावर माझा स्वाभाविक प्रश्न आला की, मग यामध्ये गैरप्रकार होत नाहीत का? त्यावर सगळ्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. एकवेळ मुलं मतदान करणार नाहीत, पण गैरप्रकार अजिबात करत नाहीत. जेएनयूचं निवडणुकांचं मॉडेल हे लिंगदोह कमिटीनेही आदर्श मानल्याचं त्यांनी अभिमानाने सांगितलं. 
मग पुढचा मुद्दा पैशाचा! निवडणूक म्हटली की पैसा आलाच. जेएनयूमध्ये तर सर्वच राजकीय पक्षांची ‘बाळं’. म्हणजे इथे भरपूर फंडिंग वगैरे होत असेल, असं वाटलं. पण नंतर कळलं की या विद्यापीठाची निवडणूक सर्वात कमी पैशात होते. निवडणुकीमधलं प्रचारसाहित्य - मग ते पोस्टर्स असो की पत्नकं - सर्व काही मुलं हातानंच तयार करतात.
केवळ निवडणुकीच्याच काळात नाही, तर एरवीही या संघटना आपापली राजकीय भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळ्या व्यासपीठांचा वापर करतात. त्यातलाच एक भाग म्हणजे ‘पोस्ट डिनर डिबेट’. जेएनयूमध्ये पीएच.डी. करत असलेला दीपक मूळचा जेजुरीचा. त्यानं या पद्धतीबद्दल सांगितलं. हॉस्टेलच्या मेसमध्ये ब:याचदा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थी संघटनांकडून चर्चा घेतल्या जातात. या चर्चा म्हणजे जेवणानंतरच्या अघळपघळ गप्पा नसतात. एखादा सामाजिक, आर्थिक, राजकीय विषय घेतला जातो. संबंधित संघटना त्यासाठी रीतसर वॉर्डनची परवानगी घेतात. त्यासंबंधीची पत्नकं ज्याला इथं ‘पर्चे’ म्हणतात, ती मेसमध्ये ठेवली जातात. विद्यार्थी या चर्चासत्नांना आवजरून हजर राहतात.
चर्चा हा या विद्याथ्र्याच्या चळवळींचा मूलभूत भाग आहे, असं प्राध्यापक मिलिंद आव्हाड यांनीही सांगितलं. ‘हे विद्यार्थी विचारांचा प्रतिवाद विचारांनी करतात. अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर स्वत:ची भूमिका निश्चित करण्यासाठीचा हा एक इंटलेुअल एक्सरसाईज म्हणता येईल. परदेशांमध्ये जशी तिथली विद्यापीठं त्या शहराची सांस्कृतिक ओळख बनून जातात. ऑक्सफर्ड, केंब्रिजसारख्या विद्यापीठांमध्ये हे ‘टाऊन कल्चर’ पाहायला मिळतं. जेएनयूने ही भूमिका आपल्याकडे बजावल्याचं आव्हाड सांगतात.
इथे प्रत्येक राजकीय विचाराला जागा असली, तरीही जेएनयूमध्ये पहिल्यापासूनच डाव्या संघटनांचं प्राबल्य राहिलं आहे. ‘भारतातल्या नावाजलेल्या विद्यापीठांशी तुलना करता जेएनयू खूप तरु ण विद्यापीठ आहे. देशात नव्याने रु जलेली लोकशाही नेमकी कशी असावी, तिचे फायदे सगळ्यांर्पयत कसे पोहचतील, या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना इथली विद्यार्थी चळवळ ही डाव्या विचारांपाशी येऊन थांबली,’ असं मत जेएनयूमधील जर्मन भाषेच्या प्रोफेसर पर्णल चिरमुलेंनी व्यक्त केलं. शिवाय ज्या काळात जेएनयू स्थापन झाली, वाढत होती, त्याच काळात जगभरातील तरु णांमध्ये कम्युनिस्ट विचारधारा लोकप्रिय होत होती. भारतही लोकशाही समाजवादाच्याच भूमिकेतून आपली धोरणं आखत होता. कदाचित त्यामुळेही इथं डावा विचार अधिक प्रकर्षानं रु जला असावा. 
जेएनयूची स्थापना ही केवळ विद्यापीठ म्हणून नाही, तर एक संशोधन संस्था म्हणून झाली. त्यातही मानवतावाद, सामाजिकशास्त्नांमधील अभ्यास हे इथलं वैशिष्टय़. देशाच्या राजकीय-सामाजिक जीवनात कार्यरत असणा:या जेएनयूच्या माजी विद्याथ्र्याची यादी जरी पाहिली, तरी या संस्थेचं योगदान लक्षात येतं. प्रकाश कारत, सीताराम येचुरी, निर्मला सीतारामन, योगेंद्र यादव, यूजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, नेपाळचे माजी पंतप्रधान बाबूराम भट्टराय अशी ही यादी बरीच मोठी आहे.
जेएनयूमधल्या सध्याच्या राजकीय वादापलीकडे जाऊन पाहिलं तर या संस्थेचं महत्त्व लक्षात येतं. प्राचीन भारतीय संस्कृतीत वाद-संवाद-वादाची परंपरा दिसून येते. विचारांचा प्रतिवाद विचारांनीच करत बौद्धिक अभिसरणाची हीच परंपरा कायम ठेवण्यामध्ये जेएनयूचा मोठा वाटा आहे. म्हणूनच ते केवळ विद्यापीठ न राहता देशातील एक महत्त्वाचं वैचारिक व्यासपीठ आहे, हे आपण नाकारू शकत नाही. अगदी आज कितीही वाद तापलेला असला तरीही !
 
 
 
 
 
पळत जा, भिंत पकडा, बुक करा, चित्र काढा !
 
 विद्यापीठात सतत चालणा:या वैचारिक चळवळींचं प्रतिबिंब अगदी इथल्या भिंती-भिंतींवरही आहे. कॅम्पसमध्ये फिरताना विद्यापीठाच्या, हॉस्टेलच्या इमारतीच्या भिंतींवर मोठमोठी चित्नं काढलेली दिसत होती. प्रत्येक विद्यार्थी संघटनेनं आपापल्या विचारधारांना अनुरूप चित्न काढून त्यानुसार संदेशही लिहिले आहेत. एनएसयूआयच्या एका भिंतीवर नेहरूंचं चित्न काढून नेहरूंचाच लोकशाही आणि समाजवादाबद्दलचा विचार मांडला होता. एआयएसएफने 4 ँं5ी ल्ल3ँ्रल्लॅ 3 ’2ी ु43 841 ूँं्रल्ल2 हे कार्ल मार्क्‍सचं वाक्य लिहून, क्रांतीचा लाल ङोंडा हातात घेऊन समानतेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठीची सुरुवात करण्याचं आवाहन करणारंच चित्न काढलेलं दिसतं. अभाविपची एक भिंत शहिदांच्या बलिदानाचं स्मरण करणारी होती. 
 इथल्या प्रत्येक भिंतीला अशा पद्धतीनं तिचा ‘विचार’ मिळाला आहे. या भिंती विद्याथ्र्याना वाटून देतात का, असा प्रश्न विचारल्यावर मिळालेलं उत्तर अजून अनोखं होतं. वर्षातला एक दिवस या जागा ‘बुक’ करण्यासाठी ठरवून दिलेला असतो. रात्नी बारा वाजल्यानंतर विद्याथ्र्याचा वेळ सुरू होतो. धावत-पळत जाऊन शक्य तितक्या भिंतींवर आपल्या संघटनेचं नावं टाकायचं. एकदा नावं टाकलं, की नंतर इतर जण तिथे काहीही रंगवणार नाहीत. अगदी तुम्ही तिथे काही चित्न काढलं नाही तरी. स्वत:चा विचार मांडण्याची पण त्याचबरोबर दुस:याच्या अभिव्यक्तीलाही ‘स्पेस’ देण्याची सुरु वात इथूनच होत असावी, कदाचित.
 
 
गंगा ढाबा आणि गप्पा.
 
जेएनयूमध्ये ‘ढाबा कल्चर’ आहे. इथं छोटे-छोटे अनेक ढाबे आहेत. सर्वांत प्रसिद्ध आहे तो ‘गंगा ढाबा’. हा ढाबा कम्युनिस्ट संघटनांचा म्हणूनच ओळखला जातो. एरवी हा ढाबा संध्याकाळी पाचच्या सुमारास सुरू होतो आणि रात्नी तीन वाजेर्पयत सुरू असतो. पण निवडणुकीच्या काळात इथे रात्न-रात्नभर जाग असते. 
 गंगा ढाब्यावर रात्न-रात्नभर चालणा:या चर्चाबद्दल प्रोग्रेसिव्ह विमेन असोसिएशनच्या कविता कृष्णन यांनीही काही गमती सांगितल्या. त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनी, त्यावेळच्या विद्यार्थी संघटनेच्या सहसचिव. जेएनयूमध्ये स्वातंत्र्य - मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो, महिलांचे स्वातंत्र्य, लैंगिक स्वातंत्र्य - नेहमीचं महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आणि त्यासाठी इथल्या विद्याथ्र्यानी कायम भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आणीबाणीच्या काळात पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी जेएनयूमध्ये येणार होत्या. मात्न विद्याथ्र्यानी त्याला विरोध दर्शवला. त्यावेळेच्या कुलगुरूंनी मात्र विद्याथ्र्याना ठामपणो बजावलं की, भारताच्या नागरिक या नात्याने इंदिरा गांधींना इथे येण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचबरोबर तुम्हालाही तुमचा निषेध करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र आपला अधिकार जपताना दुस:याच्या स्वातंत्र्याचाही सन्मान केला पाहिजे हा लोकशाहीचा खरा अर्थ यातून समजला, असंही कृष्णन यांनी