शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पिंप्री बुद्रूक ते फ्रान्स व्हाया इस्त्रायल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 3:04 PM

कजगाव पिंप्री बुद्रूक गावातला शेतक-याचा मुलगा. परिस्थिती जेमतेम. जळगावला शिकतो, संशोधन करायचं ठरवतो, धडका मारत आधी फ्रान्स मग इस्त्रायलमध्ये संशोधन शिष्यवृत्ती मिळवतो.

- डॉ. चंद्रशेखर देवीदास पाटील,

कजगाव पिंप्री बुद्रूक गावातलाशेतक-याचा मुलगा.परिस्थिती जेमतेम. जळगावला शिकतो,संशोधन करायचं ठरवतो,धडका मारत आधी फ्रान्समग इस्त्रायलमध्ये संशोधन शिष्यवृत्ती मिळवतोआणि तिथून एक हनुमान उडी घेतविज्ञान संशोधनासाठीअत्यंत प्रतिष्ठेची मादाम क्युरी शिष्यवृत्ती मिळवतोहे एरवी कुणाला खरं तरी वाटेल का?पण हे घडलं, कारणमी जे ठरवलं तेकरताना माघारी फिरलो नाही..माझ्रं बालपण पिंप्री बुद्रूक (कजगाव) या लहानशा खेड्यात गेलं. आमचं सामान्य शेतकºयाचं एकत्र कुटुंब, शेती हेच सर्वांचं आयुष्य. काबाडकष्ट करायचं, शेत पिकवायचं आणि जे मिळेल त्यात सर्वांनी आनंदी राहायचं, या सर्वसाधारण धाटणीतलं माझं घर. घरात माझे पाच काका, त्यांचं कुटुंब, मुलं-मुली असं भरगच्च घर. माझे एक काका(प्रा. एस. सी. पाटील) जळगावला नूतन मराठा कॉलेजात प्राध्यापक होते. त्यांच्या सारखं शिकायचं एवढंच त्यावेळी मला वाटत होतं. नंतर काकांच्या आग्रहाने जळगावला शिकायला आलो. माहेरची श्रीमंत असणारी माझी काकू मनानेही तेवढीच श्रीमंत आहे याची प्रचिती मला जळगावला आली. आजवरच्या प्रवासात तिचं आणि भावांचं मायेचं छत्र माझी साथ करत राहिलं.दुसरीपर्यंतचं शिक्षण गावातल्या शाळेत झालं. त्यामुळे जळगावला सुरुवातीला शाळेत प्रवेश घेतला तेव्हा खूप दडपण होते. खेड्यातून आला आहे म्हणून मराठी वाचन कसे आहे हे बघायला सौ. दुसानेबार्इंनी पहिल्याच दिवशी वर्गात उभे राहून धडा वाचायला सांगितला. माझं वाचन ऐकून, छान वाचतोस असं म्हणून एक चॉकलेट बक्षीस दिलं. एवढ्या शाबासकीने मन आनंदून गेलं आणि शिकायचं हुरूप आलं. पुढे ला. ना. शाळेत दहावी पूर्ण करून नूतन मराठा कॉलेजमधून बारावी केलं. शिक्षणादरम्यान सुटीत घरी जात असताना शेती, तिचे गंभीर प्रश्न, आर्थिक चणचण या गोष्टी जाणवत होत्या. मोठा भाऊ मिलिटरीत जॉइन झाला. त्याचा आर्थिक आधार माझ्या शिक्षणाला व घराला होता. बाकी शेतीत राबणं आणि हातात फारसं न येणं हे घरोघरी असतं तसं आमच्याही घरी होतं.शेतीशी संबंधित म्हणून मायक्र ोबायोलॉजी या विषयातून मु. जे. महाविद्यालयातून बी. एस्सी. चे शिक्षण घेत होतो. दरम्यान भारत सरकारची ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ वाचनात आली. त्यासाठी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोकरी करत असलेल्या भावाने स्कूल आॅफ लाइफ सायन्सेसमधील प्रा. डॉ. सतीश पाटील यांची ओळख करून दिली. त्या संबंधीच्या चर्चेतून विषयाची गोडी निर्माण झाली. आपणही पुढे संशोधन करावं असं मनात घेतलं. मग त्याच कॉलेजातून एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजीत प्रवेश घेतला. दरम्यान, विविध चर्चासत्रे, कॉन्फरन्समध्ये जाऊन नवीन ऐकावं अशी सवय लागली, नंतर स्वत: सहभागी होऊ लागलो. एम. एस्सी. झाल्यावर घरची परिस्थिती पाहता सगळ्यांचा सल्ला होता, नोकरीला लाग! तरी पुण्याला संशोधनासाठी कुठे जाता येईल का? त्यासाठी विविध संस्थेत फिरलो. विदेशात जाऊन उच्चशिक्षण, पीएच. डी. करावी असं मला फार वाटत होतं. खूप फिरलो पण आशेचा किरण दिसला नाही. विदेशात पीएच. डी. प्रवेशासाठी मार्गदर्शन करणाºया खूप संस्था पालथ्या घातल्या; पण एकूणच सर्व खटाटोप करण्यासाठी वडिलांच्या भाषेत एक बैलगाडीभर खर्च येणार होता, तेवढे पैसे नव्हते म्हणून नाइलाज झाला. सामान्य माणसाला उच्चशिक्षण किती अवघड आहे याची जाणीव झाली.शेवटी वडिलांनी नोकरी कर यापुढे आर्थिक मदत करता येणार नाही असं सांगितलं आणि तारापूर येथील इम्पल्स फार्मा या कंपनीत लागलो. पण मन रमेना. संशोधनाचं वेड स्वस्थ बसू देईना. मग पुन्हा उमवित डॉ. सतीश पाटील सरांना भेटलो, त्यावेळेस सरांकडे काही स्कॉलरशिप नव्हती; पण भावांनी मदत केली. नंतर सरांकडेच यूजीसी नवी दिल्लीचा संशोधन प्रकल्प मंजूर झाला. त्यात सहायक म्हणून रु जू झालो. लॅबमध्ये कामाला सुरुवात झाली, मन रमू लागले; पण तेवढ्यात यूजीसीने पीएच.डी. प्रवेशाचे नियम बदलले. त्यामुळे पुढे दोन वर्षे प्रवेश रखडले. मन निराश होऊ लागले. पण सरांनी काम सुरू ठेवण्यास सांगितले. लॅबमध्ये काम सुरू केल्यानंतर कॉलेजपेक्षा खूप गोष्टी बदलल्या. काटेकोर कामाची सवय, अभ्यासाची शिस्त लागली. आपली परिस्थिती सुधारावी ही जाणीव व्यापक होऊन समाज ते देशासाठी काही करावे अशी झाली. संशोधनाबरोबर व्यापक सामाजिक जाणिवा सरांनी निर्माण केल्या. विद्यापीठात असताना राज्यस्तरीय आविष्कर संशोधन स्पर्धेत ३००० रु पये बक्षीस म्हणून मिळाले. तेव्हा प्रोजेक्ट सरांचा म्हणून त्यांना ते पैसे द्यायला गेलो तर त्यांनी ते माझ्या वडिलांना द्यायला सांगितले. त्यानुसार मी ते वडिलांना दिले; तर बरे झाले आज रविवारची मजुरी द्यायची आहे असं म्हणून त्यांनी ते वाटून टाकले. ही परिस्थिती बदलायचं भान मला तेव्हाच आलं.रणांगण, वाटेवरच्या सावल्या, झोंबी, सूर्यास्त, बालकांड, करु णाष्टके, माझी जन्मठेप अशी परिस्थितीशी लढणाºया पुस्तकांची व नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, अनिल तुकाराम या जीवनदर्शी साहित्यिक संत -कवींची ओळख झाली. लॅबमधील अतिशिस्तीचा तेव्हा त्रास वाटे. मोबाइलची रिंग वाजलेले लॅबमध्ये चालत नसे. (सर स्वत: मोबाइल वापरत नसल्याने अजूनच पंचाईत होई). रविवार शिवाय लग्नसमारंभ, मित्र, फिरणं या सर्वांवर अघोषित बंदी होती; पण त्याची फळे आज मिळालीत.शेवटी एकदाची पीएच.डी. नोंदणी झाली. काम जोरात सुरू होते. आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन प्रकाशित होऊ लागले. संशोधनातील वेगवेगळ्या कल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य होऊ लागल्या. मन हरखून गेले पण प्रत्येक वेळी पाय जमिनीवरच राहतील याची काळजी सरांनी घेतली. मग फ्रान्स सरकारच्या अत्यंत मानाच्या चारपाक (उँं१स्रं‘) फेलोशिपची जाहिरात आम्ही वाचली. आंतरराष्ट्रीय जर्नल्समधील पेपर्समुळे विदेशातील बºयाच शास्त्रज्ञांशी संपर्ककरणं सोपं झालं त्यामुळे आम्ही या फेलोशिपसाठी अर्ज केला.माझी या फेलोशिपसाठी निवड झाली. आणि मी फ्रान्समधील ग्रेनोबल शहरातील आंतरराष्ट्रीय संस्थेत पीएच.डी. दरम्यान सहा महिन्यांसाठी रूजू झालो. तेथील प्रो. लौरेन्स यांच्याबरोबर काम करताना, भारतातील आम्ही करत असलेल्या डास नियंत्रणाच्या कामाचं महत्त्व समजलं. तेथील अनुभवाने पुढे या विषयाची अनेक क्षितिजे मला खुणावू लागली. पीएच.डी. नंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय इरसमुस फेलोशिप मिळवून फ्रान्समध्ये गेलो. तेथे असतानाच इस्त्रायल देशाची अत्यंत मानाची ‘आउटस्टॅण्डिंग पोस्ट डॉक्टरेट’ या फेलोशिपसाठी निवड झाली. कृषीतील संशोधन आणि संशोधनातून देश कसा मोठा करावा याची शिकवण बेन गुरिआॅन विद्यापीठातील प्रा. आर्याह या 80 वर्षीय अत्यंत मोठ्या संशोधकानं मला दिली. ज्या शास्त्रज्ञांचे संशोधनसंदर्भ घेत होतो प्रत्यक्षात त्यांच्या सोबत काम करणं स्वप्नातीत वाटत होतं. बºयाच आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या संशोधकांशी व्यक्तिगत ओळख झाली, चर्चा झाल्या. संशोधनावरचा विश्वास या लोकांनी वाढवला. कारण भारतात असताना बहुतांश लोकांना मी जेव्हा कुठलीही आंतरराष्ट्रीय फेलोशिप मिळाली असे सांगायचो तेव्हा पुढचा प्रश्न किती पैसे मिळणार, असा असायचा. त्यामुळे मन ओशाळायचं, निराश व्हायचं पण माझे लॅबमधील सहकारी माझं अभिनंदन करायचे, बळ द्यायचे. यापेक्षाही मोठं मिळवशील असा भरवसा द्यायचे. कधी-कधी वैयक्तिक, आर्थिक प्रश्न समोर असायचे. घरच्यांची स्वप्नं पूर्ण होतील की नाही या भीतीने झोप उडायची, पण माझी लॅब सदैव माझ्या पाठीशी असे.२०१६ साली इस्त्रायलमध्ये असताना मी जगविख्यात, अत्यंत सन्मानाच्या मेरी क्युरी या उच्चतम फेलोशिपसाठी अर्ज केला. त्यात माझ्या संशोधनाच्या नवीन कल्पना मांडल्या. माझी खरं तर ही हनुमान उडीच होती. पण सुदैवाने माझ्या आजवरच्या संशोधनाच्या जोरावर आणि मांडलेल्या संकल्पनेवर माझी नुसतीच निवड झाली नाही तर माझ्या प्रकल्पाला जगभरातून दहावं स्थान मिळाले. मेरी क्युरीचा निकाल मी इस्त्रायलमध्ये असताना भारतीय वेळेनुसार पहाटे २ वाजता ई-मेलने समजला. मला तर गगन ठेंगणं झालं. माझ्या डोळ्यासमोर शेतात राबणारे, खस्ता खाणारे आईवडील, माझं गाव, माझं मोठ्ठं कुटुंब, उमवितील माझी लॅब उभी राहिली, डोळे आपोआप वाहू लागले.कसा तरी वेळ काढत, भारतात पहाटेचे ५ वाजले असतील तेव्हाच सतीश पाटील सरांना फोन केला. सर, मला मेरी क्युरी फेलोशिप मिळाली, हे वाक्य बोलून मला पुढे बोलता येईना.. आणि सरांनाही नाही.आता कजगाव पिंप्रीतल्या शेतकºयाचा मुलगा फ्रान्सच्या परपीनिया येथे एका मानाच्या फेलोशिपद्वारे जैविक कीटकनाशकांसाठीच्या मानांकनावर संशोधन करतोय. आता मी खूप आनंदी असतो, कारण इंग्रजी कवी म्हणतो, "ड४१ ँंस्रस्र्री२३ ंि८२ ं१ी १ीेीेुी१्रल्लॅ ङ्म४१ ुं िंि८२ ङ्मा ङ्म४१ ’्राी" प्रत्येक कष्ट करणाºया प्रामाणिक विद्यार्थ्याच्या जीवनात हा दिवस उजाडतोच..आपण पुढे चालत रहायचं..