शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

प्लीज.. डोण्ट ’Kill' युवरसेल्फ

By admin | Published: October 09, 2014 6:36 PM

तारुण्य हे जगण्याच्या लढाया लढण्यासाठी असतं, अशी शस्त्रं टाकून हार मानली तर कसं चालेल?

- ऑक्सिजन टीम
 
स्ट्रेस आणि सायबर बुलिंग
 
आत्महत्त्येच्या टोकावर पोहोचवणारे दोन नवे शत्रू.?
 
भारत ‘तरुणांचा’ देश. जगातला सर्वात तरुण देश. असं आपण नेहमी ऐकतो आणि जगातल्या सर्वाधिक ‘तरुण’ आत्महत्त्याही याच देशात व्हाव्यात? १५ ते २९ वर्षे या वयोगटात सर्वाधिक आत्महत्त्या भारतात होतात असा जागतिक आरोग्य संघटनेचा नुकताच आलेला रिपोर्ट सांगतो.
दर दोन मिन्टाला भारतात एक व्यक्ती आत्महत्त्या करते, असं हा रिपोर्ट म्हणतो ते वाचून धक्का बसतोच.
प्रेमभंग, शिक्षणातलं अपयश, नोकरीच न मिळणं, नोकरीच्या ठिकाणी वाढता स्ट्रेस, कौटुंबिक कारणं, प्रेमभंग, मानसिक आजार, डिप्रेशन ही अशी नेहमीची कारणं आहेतच,
मात्र सध्या दोन नवीच कारणं तरुण मुलांच्या जिवावर उठली आहेत. 
त्यातलं एक कारण आहे, स्ट्रेस.
भयंकर प्रमाणात स्ट्रेस, टेन्शन.
आणि त्यापायी रोज होणारी तरुण मुलांची कुतरओढ. घरच्यांच्या अपेक्षा, बदललेली लाईफस्टाईल, नोकरीच्या ठिकाणचे मोठमोठे टार्गेट्स, घरांसाठी घेतलेली कर्ज, त्याचे इएमआय, घरातली आपली दुरावलेली माणसं, कुणीच जिवाभावाचं नसणं, कुणावरही विश्‍वासच न ठेवता येणं, मित्रही नसणं किंवा दुरावणं यासार्‍या कारणांमुळे तरुण मुलांचा स्ट्रेस प्रचंड वाढतो आहेत.
आणि या स्ट्रेसशी अजिबातच कोप-अप करता न आल्यानं म्हणजे त्यावर तोडगेच न शोधता आल्यानं, अनेक तरुण मुलं या स्ट्रेसच्या भोवर्‍यात अडकतात. आणि मग त्यातून बाहेरच पडता न आल्यानं, स्वत:ला संपवायचं ठरवतात.
हे सारं एकीकडे वाढत असतानाच बंगरुळूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्सेसमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असा अभ्यास करताय की, ‘सायबर बुलिंग’ हे तरुण मुलांच्या संदर्भात आत्महत्त्येचं नवं कारणं ठरतंय का.?
म्हणजे काय तर बहुतांश तरुण मुलं हल्ली चोवीस तास ‘कनेक्टेड’ असतात. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअँप सुरूच असतं. इथे चेष्टा मस्ती चालते, वाद प्रतिवाद होतात. मग त्या अड्यांवरचे युक्तिवाद झेपत नाहीत, मनस्ताप होतो, तिथं कुणी जाणीवपूर्वक नालस्ती करतं, ईल एसएमएस किंवा मेसेजेस येतात, या सगळ्याला सायबर बुलिंग म्हणतात. त्यासार्‍या त्रास असह्य झाला की अनेकांना डिप्रेशन येतं. त्यातूनही सुटका झाली नाही तर अनेकजण आत्महत्त्येचा प्रयत्न करतात.
असे सुसाईड अटेम्प्ट केलेल्या अनेकजणांशी बोलून या सायबर आणि टेक्नॉलॉजिकल बिहेव्हिअरचा काय परिणाम होतो आहे, त्यातून आत्महत्त्येच्या टोकावर कसं जातात तरुण याचा अभ्यास मानसोपचार तज्ज्ञ करत आहेत.
अजून शंभर टक्के माहिती यासंदर्भात उपलब्ध नसली तरी दुर्दैवानं हे कारण आत्महत्त्येच्या दिशेनं घेऊन जातं, असा मानसोपचार तज्ज्ञांचा अभ्यास म्हणतो आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्सेसच्या मेण्टल हेल्थ एज्युकेशन विभागात काम करणार्‍या असिस्टण्ट प्रोफेसर डॉ. के. एस. मीना यांच्याशी ‘ऑक्सिजन’ने याविषयी तपशीलवार चर्चा करत हा विषय समजून घेतला. डॉ. मीना आत्महत्त्या प्रतिबंधात्मक उपचार याविषयातल्या तज्ज्ञही आहेत.
स्वत:ला संपवू पाहणार्‍या तरुण मुलांच्या मन:स्थितीची काही लक्षणं दिसतात का?
कारणं काय सापडतात?
आणि उपाय काय करता येतील?
 
 
 
जीव नको केव्हा होतो.
आत्महत्त्येची कुठली लक्षणं तरुण मुलांमध्ये दिसतात?
आत्महत्त्या करणार्‍या, अस्वस्थ मुलांमध्ये कुठली लक्षणं दिसतात. याची ही यादी. अर्थात ही लक्षणं अनेकजणांमध्ये दिसतात. मानसिक आजारातही दिसतात. ही लक्षणं आहेत म्हणजे तो माणूस आत्महत्त्याच करील असं कुणी घरच्याघरी ठरवू नये. पण लक्ष ठेवावं. वर्तनबदल टिपत राहून, योग्य औषधोपचारांची मदत घ्यावी. मुख्य म्हणजे उत्तम डॉक्टरला भेटावं. घरगुती उपाय करत बसू नये.
अनेक तरुण मुलं मित्रांनाही भेटणं टाळतात. एकदम गप्प गप्प होतात. फोनसुद्धा उचलत नाहीत. कुणाशी बोलत नाहीत. घरच्यांशीही बोलत नाहीत.
त्यांना कशातच रस वाटत नाहीत. काहीच करावंसं वाटत नाहीत.
अभ्यासात, खाण्यापिण्यात, कशातच इंटरेस्ट वाटत नाही. त्यांचं वर्तन बदलतं. नजर बदलते. झोपेचे पॅटर्न बदलतात. कपडे मळकट कळकट घालणं, आंघोळ करणं, यातसुद्धा नियमित बदल दिसतात.
ते स्वत:च्याच तंद्रीत असतात. स्वत:च्याच विचारात हरवल्यासारखे दिसतात.
या मुलांचा कॉन्फिडन्स एकदम कमी झालेला असतो. भकास दिसतात. 
अनेकजण नेहमी बोलता बोलता म्हणतातही, आयुष्यात काहीच राम उरलेला नाही. माझं काही खरं नाही, मला मरून जावंसं वाटतं. नको हे आयुष्य.
काहीजण एकदम चिडतात. खूप रडतात. अनेक जण प्रचंड रागवतातही.
नॉर्मल माणसांसारखं आयुष्य जगणंच त्यांना अवघड होतं.
काहीजण आजारपणाला कंटाळलेले असतात. तेव्हाही असेच हताश होतात.
काहीकाही जण तर इतके विचित्र वागतात, घरच्यांना त्रास देतात. त्यांचं वागणंच कळत नाही.
 
 
 
का नको होतो जीव? कुठल्या कारणांमुळे मुलं आत्महत्त्येच्या टोकावर पोहोचतात?
 
 
आपल्या मनातलं बोलायलाच कुणी नाही, विश्‍वासाचं कुणी नाही. मनावरचा ताण हलकाच होत नाही. कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येत नाही आणि मग हे सारं काचायला लागलं की त्यापेक्षा गळफास बरा असं अनेक तरुण मुलांना वाटू लागतं.
त्यापैकी ही काही प्रमुख कारणं.
घरात सतत भांडणं. आईवडिलांचं न पटणं किंवा पालकांनी सतत रागवणं, धारेवर धरणं. अभ्यासासह अनेक गोष्टींचं प्रेशर देणं मुलांच्या अस्वस्थतेला कारण ठरतं.
अभ्यासातलं अपयश. जी शाखा निवडली, तो अभ्यासच न जमणं, सतत नापास होणं.
इंटरनेट/मोबाइल अँडिक्शन. पालकांनी ते काढून घेतलं किंवा ते मिळालंच नाही तरी पिसाटून आत्महत्त्या केल्याच्या काही घटना अलीकडे घडल्या. किंवा आत्महत्येचा प्रयत्न काहीजणांनी केला.
एकेकटं कुटुंब. घरात माणसंच नसणं. एकटेपणा. त्यातून आलेला मानसिक विकार. तसंच डिप्रेशन, स्क्रिझोफेनियासारखे आजार. काही गंभीर आजारपणं, अपघात, जवळच्या माणसाचा मृत्यू यातूनही आत्महत्त्या घडतात.
अनेक मुलांना ड्रग्ज किंवा दारूचं व्यसन असतं. त्यासाठी पैसा लागतो. तो पैसा मिळेनासा झाला, त्यासाठी वाईट संगतीतून काही गुन्हे घडले तर त्या अपराधभावनेपोटी तरुण मुलं आत्महत्त्या करतात.
नोकरीच्या जागी कामाचं टेन्शन असणं, कामच न जमणं, व्यावसायिक अपयश हे आत्महत्त्येचं आणखी एक कारण.
ब्रेकप, मित्रानं किंवा मैत्रिणीनं फसवणं, रॅगिंग, मित्रांनी छळणं, यातूनही काहीजण जगणं नाकारतात.
काहीजणांचा कम्युनिकेशनचा प्रश्न असतो. कुणाला मनातलं काही सांगता येत नाही, लोकांना विश्‍वासातच घेता येत नाही म्हणूनही मनावरचा ताण वाढून जीव नको होतो.
अपयश हाताळताच न येणं हा एक तरुण पिढीचा नवा प्रश्न आहे, त्यातून अनेकजण जगणं नाकारतात. अपयशात हरवून जातात.
जिवाभावाचे दोस्तच अनेकजणांना नसतात, म्हणून एकटेपणा आयुष्य पोखरताना दिसतो.
 
 
 
.डरपोक कुठचा? घरच्या घरी काय करू नये? 
 
हे सारं वाचून अनेकजणांना वाटेल की आपण घरच्या घरी जर आपल्या अशा ‘अस्वस्थ’ मित्रांशी बोललो तर प्रश्न सुटेल.
तो सुटत नाही वाढतो. आत्महत्त्या करू पाहणार्‍यांची मानसिकता ही सोपी गोष्ट नाही, फार जटिल विषय आहे.
त्यामुळे उपदेश करू नका. 
काय मरायच्या बाता मारतोस, तू डरपोक आहेस असं तर अजिबात म्हणू नका. आपल्याला बाकीचे डरपोक म्हणतात या भावनेनंही अनेकांचा जीव घेतलाय. त्यामुळे फुकट सल्ले देऊ नका. तुम्ही कौन्सिलिंग करू नका. कारण माणसं आपल्याला सांगतात तरी आपण ऐकत नाही, जगावंसं वाटत नाही याचा त्या माणसाला जास्त त्रास होतो. त्यामुळे असं कुणी जवळचं वागत असेल तर तुम्ही काहीबाही सांगण्यापेक्षा त्यांना उत्तम डॉक्टरकडे न्या. औषधोपचार करून घ्या. गप्पा मारा, नॉर्मल बोला. त्यांना धीर द्या. आधार बना. एकटं, एकाकी सोडू नका.
तुमचा मित्र एका अवघड काळातून जातोय एवढं लक्षात ठेवून त्याला सोबत करा.
आणि मुख्य म्हणजे त्याच्या वागण्याचा दोष देऊ नका, गिल्ट देऊ नका. आणि अति सहानुभूतीही दाखवू नका.
 
विशेष मुलाखत
डॉ. के.एस. मीना
असिस्टण्ट प्रोफेसर, मेण्टल हेल्थ एज्युकेशन विभाग 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्सेस, बंगलूरु 
......................
जॉन्सन थॉमस
संचालक, आसरा हेल्पलाईन