शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

खिसा

By admin | Published: May 12, 2016 3:10 PM

ऑपरेशन झालं. रिपोर्ट नॉर्मल आले. पण दोन किमो बाकी होत्या. प्रत्येकवेळी किमो सुरू व्हायच्या आधी नातेवाईक आणि ओळखीचे सूचनांचा भडीमार करत. गव्हांकूर खा, गव्हाच्या पातींचा रस काढून प्या. प्राणायाम करा. कॅन्सरवरील नवीन संशोधन वाचनात आलं की काहीजण ते घरी आणून देत. मी कधीही ते लिखाण वाचलं नाही, गूगल करून माझ्या रोगाबद्दल ट्रीटमेंट सुरू असताना शोधमोहीम राबवली नाही. आला अनुभव फक्त जगत राहिले.

शरीरात आणि मनातही नव्यानं निर्माण झालेला आशेचा एक कप्पाच!
 
 ऑपरेशन झालं. घरी आले. 
घरी आल्यावर खरी कसोटी होती. तो ड्रेनेज इव्हॅक्युएटर सांभाळत अंघोळ करणं. ते एक दिव्यच होतं. त्यामुळे एकूणच वावरण्यावर बंधनं यायला लागली. त्यावर एक उपाय शोधला. स्कर्ट घालायला सुरुवात केली. स्कर्टच्या आत कमरेभोवती नाडी बांधायची. त्या नाडीत ड्रेनेज इव्हॅक्युएटरला अटॅच रबरी नळी कमरेभोवती बांधायची आणि तो प्लॅस्टिक डबा पायाजवळ लटकता ठेवायचा. स्कर्टच्या घेरात तो दिसायचा नाही. दरम्यान गणोशोत्सव अगदी काही दिवसांवर आला होता. त्यामुळे माझी एक्साइटमेण्ट लेव्हल वाढत होती. काहीही करून आमच्या सोसायटीतील हरएक अॅक्टिव्हिटी मला एन्जॉय करायची होती. 
दरम्यान माझी बहीण मला अंघोळीला मदत करायची. अंघोळीनंतर मी आरशात बघून माझ्या काखेत मारलेल्या स्टेपल स्टिचेसचं निरीक्षण करायचे, एका सरळ ओळीत मारलेल्या दहा ते बारा स्टेपलरच्या पिना. व्यायाम करताना हात वर नेला की स्टेपल टाके तटतटायचे, डोळ्यात पाणी जमा व्हायचं. पण नेटानं व्यायाम सुरू ठेवला. कधीकधी बाबा आठवण करून द्यायचे. व्यायाम केला का विचारायचे. मी सरळ हो असं उत्तर ठोकून द्यायचे. आत्ता पुन्हा कर. ते म्हणायचे. मग माझा नाइलाज व्हायचा. सर्जरी झाली होती, पण अजून दोन किमो बाकी होत्या. आरशात पाहिल्यावर कळलं की हळूहळू डोक्यावर बारीक लव तयार झालीय. अर्थात उगवू पाहणारे ते केस पुन्हा किमो सुरू झाल्यावर  जाणार होते. काही दिवसांनी काखेतील जखम भरत आली.  ड्रेनेज इव्हॅक्युएटरला जी नळी जोडली होती, तिच्यासाठी पाडलेलं भोक बुजत आलं होतं. तिथे एक साधी बॅण्डेज पट्टी लावायला डॉक्टरांनी सांगितलं. 
बहीण प्रेमानं सगळं ड्रेसिंग करायची. बॅण्डेज बदलताना तिला खूप भीती वाटायची. मी तिला सांगायचे, एकदाच जोरात खेचून काढ. एकदाच काय ते दुखू दे. पण ती भीत भीत हळूहळू ओढायची आणि मी संतापायचे. काखेतली जखम भरत होती, आता थोडाच भाग भरायचा राहिला होता. तिथे एक छोटा कप्पा, खिसा असल्यासारखं वाटत होतं. मी सारखं त्यात बोट फिरवत रहायचे. आपल्या शरीराच्या आत आपण हस्तक्षेप करतोय. गुंतागुंतीच्या काळोख्या विश्वात आपलं एक बोटं, असं काहीही मनात यायचं. 
एकदा त्या खिशात मी कानातलं लपवलं होतं. जर मी ते काढलं नसतं तर जखम भरताना ते कानातलंही माझ्या शरीरात चिणलं गेलं असतं. अनारकलीसारखं. 
सर्जरी, टाके काढणं, जखम भरणं यात जवळपास महिना गेला. सर्जरीनंतरचा हिस्ट्रोपॅथॉलॉजीचा रिपोर्टही नॉर्मल आला. कॅन्सर ब्रेस्टव्यतिरिक्त मान, पोट, घसा, पाठ या अवयवांमध्ये पसरला नव्हता. धोका नव्हता. माझ्या वाटणीचं आयुष्य जगायचं बाकी होतं तर. आता फक्त दोन किमो आणि नंतर रेडिएशन बाकी होतं.
खरं म्हणजे आता किमोथेरपीची आता मला सवय झाली होती.  किमोथेरपीचा दिवस म्हणजे जय्यत तयारी. आदल्या दिवशी फाईल, पाण्याची बाटली, पुस्तक, गाणी ऐकण्यासाठी हेडफोन्स असं सगळं सॅकमध्ये भरून ठेवायचं. रात्रभर जवळपास दोन वाजेपर्यंत टीव्ही बघायचा. म्हणजे किमोथेरपी सुरू असताना मस्त झोप आली पाहिजे. म्हणजे भलतेसलते विचार डोक्यात येण्याचा प्रश्नच नाही. सकाळी घरून निघायचं. आईची मैत्रीण ब्रेकफास्टचा डबा द्यायची. मग टॅक्सी पकडून टाटाला. मी जाऊन बेड धरायचे. बाबा औषधं घेऊन यायचे. मग पुढचे चार-पाच तास बारीक धार टिपटिप. कधी पाण्यासारखं पारदर्शक औषध, तर कधी रक्तासारखं लाल. बाटलीमागून बाटली, रुटीन सुरू, नर्सची लगबग, त्यांच्या जोडीला पेपरवाले आणि चहावाल्यांची वर्दळ. सलाइनची एक बाटली संपत आली की नर्सला बोलावायचं, मग ती दुसरी लावायची. त्यात किमो रूमच्या पार दुस-या टोकाला टॉयलेट. मग पेशंट पुढे आणि दुस:या हातात उंचावर सलाइनची बाटली धरलेला त्या पेशंटचा नातेवाईक मागे अशी वरात टॉयलेटमध्ये जाई. पण सलाइनमध्ये खंड पडत नसे. बाहेर दुस:या पाळीतले पेशण्ट्स वेटिंगमध्ये असायचेच. म्हणून भल्या सकाळी किमो रूम उघडायच्या आधीच पेशंट्स लाइनीत उभे असत. सकाळी बेड नाही मिळाला तर पुन्हा वाट पहा. पुढच्या पेशंटची किमो संपली की तुमचा नंबर. सुदैवाने आम्ही पुरेसे लवकर पोहोचायचो. त्यामुळे कधी वाट पहावी लागली नाही. मी, बाबा आणि  काका यांनी आपापले रोल्स वाटून घेतले होते. टाटाच्या पोर्चमध्ये टॅक्सी थांबल्यावर मी फाईल घेऊन तडक किमो रूम गाठायची. बाबा बेसमेंटमध्ये जाऊन औषधं विकत घ्यायचे. काका टॅक्सीला पैसे देऊन बाबांबरोबर औषधं घेऊन किमो रूममध्ये येईपर्यंत मी बेड पटकावलेला असायचा. मिशन फत्ते. 
    किमो सुरू व्हायच्या आधी नातेवाईक आणि ओळखीच्यांनी सूचनांचा भडीमार केला होता. गव्हांकूर खा, सात मडक्यांमध्ये गहू पेरा. त्याच्या पातींचा रस काढून प्या. प्राणायाम करा. कॅन्सरवरील नवीन संशोधन वाचनात आलं की काहीजण ते घरी आणून द्यायचे. मी कधीही ते लिखाण वाचलं नाही, गूगल करु न माझ्या रोगाबद्दल ट्रीटमेंट सुरू असताना शोधमोहीम राबवली नाही. फक्त नियमितपणो रोज एक उकडलेलं बीट न चुकता खाल्लं. पुलंची विनोदी आणि अनंत सामंत यांची थ्रिल्लींग पुस्तक वाचली. 
किमो उरकून घरी आल्यावर त्या दिवशी थोडा त्रास व्हायचा. पण शेवटच्या दोन किमोमध्ये तोही खूप कमी झाला. दुस:या दिवशी खूप उत्साही आणि आनंदी वाटायचं. मी कम्प्युटरवर गाणी लाऊन नाचायचे. बॉयफ्रेण्डबरोबर फिरायला जायचे. जर्मन भाषेची लेक्चर्स अटेंण्ड करायचे. शॉपिंग, हॉटेलिंग आणि टेबल टेनिसही खेळायचे. कारण दोन किमोमध्ये तीन आठवडय़ांची गॅप असायची. तीन आठवडे नो इंजेक्शन, नो सलाइन, नो हॉस्पिटल. फ्रीडम इज इन दी एअर. 
 
- शची मराठे
shachimarathe23@gmail.com
 
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)