शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

पोकेमॉन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

By admin | Published: December 28, 2016 4:51 PM

झपाट्यानं आपलं आयुष्य बदलतं आहे, असं टिपीकल वाक्यं ठोकून देण्याचे दिवस किती भुर्रकन उडून गेले. याची एक झलकच २०१६नं मावळता मावळता दाखवून दिली.

तंत्रज्ञान.झपाट्यानं आपलं आयुष्य बदलतं आहे, असं टिपीकल वाक्यं ठोकून देण्याचे दिवस किती भुर्रकन उडून गेले. याची एक झलकच २०१६नं मावळता मावळता दाखवून दिली. एका रात्रीत हातातला मोबाइल अनेकांच्या आर्थिक व्यवहाराचं एक साधन बनला. अर्थात, हा बदल काही कुणी चटकन स्वत:हून स्वीकारला नाही तो लादलाच गेला. पण त्यानिमित्तानं तंत्रज्ञानाचं एक वेगळं रूप सामान्य माणसाला पहायला मिळालं...मात्र तरुण मुलांच्या संदर्भात तंत्रज्ञानाचे काय ट्रेण्ड या वर्षात दिसले हे एका वाक्यात सांगायचं तर काहीजण व्हिज्युअल रिअ‍ॅलिटीच्या मागे धावले, तर काही पोकेमॉनच्या. काहींनी लाइव्ह व्हिडीओ अनुभवले, तर काहींनी याच तंत्रज्ञानाच्या अतिवापरानं आपलं मनस्वास्थ्य बिघडवून घेतलं...त्यामुळे सकारात्मक-नकारात्मक बदल काय झाले याची तुलना व्यक्तिपरत्वे वेगळी आहे, पण एक नक्की हातातला मोबाइल यंदा हाताइतकाच महत्त्वाचा अवयव बनला. आणि त्या अवयवात शिरलेल्या व्हायरसमुळे भेज्यातही बरेच किडे वळवळले!त्याच काही किड्यांची ही साधारण अशी वळवळ...१) स्ट्रिमिंग व्हिडीओखरं तर हा सोशल मीडियाचा भाग; पण तो तंत्रज्ञानामुळे साधला त्यामुळे त्याला तंत्रज्ञानाचीच कमाल म्हटली पाहिजे. आपण आपल्या फेसबुक पेजवर स्वत:च सेलिब्रिटी होऊ शकतं हे नवीन भान तरुणांना या स्ट्रिमिंग लाइव्ह व्हिडीओनं दिलं. कुणीही म्हणजे अगदी कुणीही लाइव्ह असूू शकतं, बोलू शकतो, आपण सारे ग्रुप करून गप्पा मारू शकतो ही सारी मजा या स्ट्रिमिंग व्हिडीओनं दिली. त्यामुळे या वर्षीचा सगळ्यात मोठा तंत्रज्ञानाचा ट्रेण्ड म्हणून या स्ट्रिमिंग लाइव्ह व्हिडीओंना मार्क द्यावे लागतील.२) ए. आर., व्ही. आर. आणि पोकेमॉनव्हिज्युअल रिअ‍ॅलिटी, जरा जड जातो हा शब्द पचायला. लांबचा वाटतो. त्यात फेसबुकच्या झकरबर्गने त्याचं लॉँच केलं इत्यादि बातम्या झळकल्या पण त्यात काही कुणाला फार हॉट वाटलं नव्हतं. व्हिज्युअल रिअ‍ॅलिटी पहिल्यांदा आयुष्यात आली ती ‘पोकेमॉन गो’चा हात धरून. तेव्हा पहिल्यांदा कळली नीट ही व्हिज्युअल रिअ‍ॅलिटीची भानगड. १० कोटी लोकांनी हा पोकेमॉन गो आॅफिशियली डाउनलोड करून घेतला. आणि अक्षरश: स्मशानात पाट्या लावायची वेळ आली की, इथं पोकेमॉन शोधू नयेत. या गेमनं तंत्रज्ञानाच्या, व्हिज्युअल रिअ‍ॅलिटीच्या एका नव्या टप्प्याला यंदा सुरुवात केली.३) आर्टिफिशियल इण्टिलिजन्सअर्थात, कृत्रिम बुद्धिमत्ता. या शब्दाची मोठी चर्चा झाली आणि ते वास्तव दूर नाही याची झलकही या वर्षानं दाखवून दिली. जी कामं रोबोट करू शकणार नाही तीच कामं भविष्यात माणसाला रोजगार म्हणून उरतील अशा चर्चांनी या वर्षी जोर धरला. अमेरिकेत ड्रायव्हरलेस ट्रक धावू लागल्या. येत्या काही वर्षांत माणसाइतकी बुद्धिमत्ता असलेले मशीन्स तयार करण्यात माणसाला यश येईल, अशा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी यंदा घडल्या.