-भूषण केळकर
‘ए, उगाच अॅटिटय़ूड दाखवू नकोस!’‘अगं तिला फारच अॅटिटय़ूड आहे. स्वतर्ला फारच काही तरी समजते. शिष्ट आहे खूपच!’ वरील दोन्ही वाक्यात जो ‘अॅटिटय़ूड’ हा शब्द आहे तो नकारात्मक आहे. आणि त्यात अहंगंड दिसतो, इतरांना कमी लेखण्याची वृत्ती दिसते. अर्थातच असा नकारात्मक अॅटिटय़ूड असणं काही बरं नाही; पण अॅटिटय़ूडच नको असंही नाही.तो असावा पण ‘पॉझिटिव्ह अॅटिटय़ूड. म्हणजेच ‘सकारात्मक दृष्टिकोन’. आता आजवर तुम्ही या सकारात्मक विचार आणि दृष्टी यासंदर्भात बरंच काही वाचलं असेल, तसे व्हॉट्सअॅप फॉरवर्डही फिरवले असतील. पण पॉझिटिव्ह अॅटिटय़ूड हे सॉफ्ट स्किल्समधील एक महत्त्वाचं स्किल आहे असा विचार केला आहे का? मागील आठवडय़ात आपण ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’विषयी बोललो, त्याचीच ही पुढची पायरी. बार्बरा फेडरिक्सन नावाच्या संशोधिकेने अमेरिकेत युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनामध्ये एक प्रयोग केला आणि त्यात तरुण-तरुणींना एकत्र करीत त्यांना खालील 5 प्रकारचे भावना उद्दिपित करणारे व्हिडीओ दाखविले 1) आनंदाचे 2) समाधानाचे 3) सर्वसाधारण तटस्थ 4) भीतिदायक आणि 5) चीड आणणारे.त्यानंतर या सर्व लोकांना काम दिलं होतं की एका ठरावीक प्रश्नाच्या उक्तीसाठी कृती आराखडा तयार करायचा होता. या प्रयोगातून असं सिद्ध झालं की चौथे व पाचवे क्रमांकाचे व्हिडीओ ज्यांनी पाहिले त्या लोकांना कृती आराखडा करताच आला नाही. ज्यांना तिसरा प्रकारचा म्हणजे साधारण तटस्थ व्हिडीओ दाखवला होता त्यांनी कृती आराखडा तयार केला. पण तो फारच सामान्य होता.पहिले दोन म्हणजे आनंद व समाधानाचे व्हिडीओ ज्यांनी पाहिले त्यांनी नुसता कृती आराखडा बनवला असे नाही तर त्यात अत्यंत वेगळ्या आणि खूप कल्पक सूचना केलेल्या होत्या.आपणा सर्वानाच कमी-अधिक प्रमाणात हा अनुभव येतो, खरं ना? मनाची अवस्था उल्हासित असेल तर आपण नुसतेच कार्यप्रवण होतो असे नाही तर त्यात आपण उत्तम क्षमतासुद्धा दाखवतो, कल्पकता आणतो. आणि म्हणूनच हा सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचे ‘सॉफ्ट स्किल’ आहे यात शंकाच नाही.हा सकारात्मक दृष्टिकोन प्रयत्नपूर्वक आणता येतो आणि वाढवताही येतो. त्यासाठी मानवसंसाधन विकास या मधील काही तज्ज्ञ व संस्थांनी संशोधन करून खालील पाच मार्ग सांगितले आहेत की जे आपण सगळेच म्हटलं तर प्रत्यक्षात आणू शकू. 1) नकारात्मक विचार कमी करणं र् यासाठी योग, प्राणायाम, उपासना, ध्यान याच बरोबर सकारात्मक विचारांचं वाचन/मनन हे उपयुक्त ठरतं. विद्यार्थी परीक्षेत बरेचदा असा विचार करतात की, पेपर प्रचंड अवघड आहे आणि आता काही खरं नाही! नंतर त्यांच्या लक्षात येतं की पेपर सगळ्यांनाच अवघड गेलाय!2) सकारात्मक विचार करणारे मित्र जोडा र् तुम्हाला आश्चर्य वाटेल पण केवळ एखाद्या सकारात्मक विचाराच्या माणसामुळे बाकीच्या माणसांचाही दृष्टिकोन बदलतो! माझं तुम्हाला खरंच सांगणं आहे की सगळी सिस्टीम वाईट आहे, सगळं जग तुम्हाला फसवणारंच आहे हा दृष्टिकोन ठेवणार्यांपासून चार हात दूर राहा आणि आनंदी-उत्साही-कल्पक मित्र जोडा!3) आपल्यात काय कमी आहे याची जाणीव जरूर असावी, पण आपल्याला काय मिळालं नाही याचबरोबर आपल्याला बर्यास चांगल्या गोष्टी मिळाल्यात त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवा.4) स्वतर्साठी आवजरून वेळ द्या र् आपली बॅटरी चार्ज करण्यासाठी, थोडा हलकाफुलका वेळ आणि मनोरंजन असावं. खेळ, संगीत, नाटय़, नृत्य इत्यादी तुम्हाला रिचार्ज करतील.5) स्वतर्ला बक्षीस द्या र् छोटे आनंदाचे क्षण लहान असले तरी यशाचे प्रसंग भरभरून एन्जॉय करा! 100 पैकी 95 मार्क्स मिळाले तर 5 कुठे गेले याचे विश्लेषण जरूर करा; पण दुर्ख उगाळत न बसता 95 मिळाल्याचे मनर्पूर्वक ‘सेलिब्रेट करा!