शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
3
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
4
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
5
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
6
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
7
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
8
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
9
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
10
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
11
भाजपाने केला करेक्ट कार्यक्रम? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
12
ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
14
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
15
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
16
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
17
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
18
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
20
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा

कोरोनानंतरच्या काळात जॉब हवा असेल तर रट्टामारू डिग्रीचा उपयोग शून्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 7:50 AM

आपल्याला पुढे काय करायचं आहे याचं उत्तर ज्याच्यापाशी नाही, ज्याला परीक्षेच्या आदल्या रात्रीच अभ्यास करायचा आहे, ज्याला वाचनात गोडी नाही, ज्याला मेसेजेस नि व्हिडीओ क्लिप्स फॉरवर्ड करण्यातच रुची आहे, मात्र स्वत:ला अपडेट नि अपग्रेड करण्याचे जो प्रयत्न करत नाही, ज्याच्याकडे कोणतंच स्किल नाही अशा शंभरातील नव्याण्णव तरु ण/तरु णी कोरोनानंतरच्या जगात कसे तरतील?

ठळक मुद्देआपण या पुढच्या काळात बेरोजगार होऊ अशी धास्ती यापैकी अनेकांना नाही.

- डॉ. वृंदा भार्गवे

काही वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या  मैत्रिणीने तिच्या मुलीला शाळेतून काढून घरीच शिक्षण दिलं. मुलगी बुद्धिमान होती. भरपूर मार्क्‍स मिळवले. दहावीनंतर दोन वर्षे कॉलेज लाइफ एन्जॉय करायचं असं तिने ठरवलं. पण एक वर्षात त्यातला फोलपणा तिला कळला. बारावीत कला शाखेत नव्वद टक्के मिळवल्यावर कॉलेजला न जाता बाहेरून पदवी मिळवायची हे तिनं पक्कं केलं.पदवीचं शिक्षण घेत असतानाच स्वराज युनिव्हर्सिटीबद्दल तिला समजलं. हटके करण्याचा तिचा स्वभाव. तिथला एक टास्क तिच्या कायम स्मरणात राहिलेला.प्रत्येकाला  केवळ  एक सायकल देण्यात आली, बाकी एक पैसाही न देता त्यांना एका खेडय़ात भ्रमंती करण्यास सांगितलं. तिथं सात दिवस राहायचं. जगण्यासाठी कमाईचा पर्याय तुम्हीच शोधा, वापरा स्वत:ची स्कील्स असं ते आव्हान होतं.त्या सात दिवसात जाणिवांचा पासवर्डच तिला गवसला. सहवेदना, संवेदना, आत्मविश्वास, जबाबदारी, संभाषण कौशल्य, स्मरणशक्ती या झाल्या जमेच्या बाजू; पण तेव्हा तिला जाणवलं, अरे आपल्याला सायकलचं पंक्चर काढता येत नाही. विहिरीवरचं पाणी रहाटातून काढण्यासाठी शक्ती नाही. शेणानं सारवता येत नाही. गाव कधी पाहिलं नाही, पाळीव प्राण्यांशी दोस्ती नाही. अर्थात तिनं जे येत नाही त्याचा स्वीकार केला. यादी केली. जे येत होतं त्यात निष्णात झाली जे येत नव्हतं ते शिकून घेण्यातली तत्परता दाखवली. पुढे टीआयएसएसला प्रवेश मिळायला या सगळ्याचा तिला प्रचंड फायदा झाला. ज्यांना तिच्या एवढे मार्क्‍स नव्हते त्यांनीदेखील टाटा इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश मिळवला कारण संशोधन आणि नावीन्याची आस याचा प्रगल्भतेने वापर करण्याची त्यांची क्षमता.

हे आठवण्याचं कारण म्हणजे कोरोना लॉकडाउन. हे लॉकडाउन झालं त्या दिवसापासून आजर्पयत जवळपास दीड महिने घरी राहणारे कला, वाणिज्य वा विज्ञान शाखेतले विद्यार्थी काय करताहेत याचं सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न माझी एक विद्यार्थिनी करत होती. त्या निमित्ताने बराच संवाद होत होता तिच्याशी.आता परत घरात. परीक्षा पुढे ढकलल्या, म्हणजे अभ्यासदेखील मागे पडला. ज्या वेगानं पुस्तकं काढली त्या वेगानं ती ठेवूनदेखील दिली.यूपीएससी-एमपीएससीवाले ग्रंथालय बंद म्हणून अभ्यास करणार कसा, या प्रश्नाने त्नस्त..‘नेटा’ने तो करता येतो हे ठाऊक असूनही संत्रस्त.बाकीजण रेसिपींची फर्माईश नि त्या डिशेश इन्स्टावर टाकण्यात मग्न. परीक्षा घेणार कशा, पेपरचे स्वरूप काय या घोर विवंचनेत काही दंग, तर काहींना पुढच्या वर्गात आपण जाणार आहोत, काहीच न करता याचा सुगावा लागलेला (?).परीक्षा हा निव्वळ उपचार. आपण पास होणारच असं म्हणत ‘द ऑफिस’चे सगळे एपिसोड्स पाहण्यातला निवांतपणा शोधणारे काही.आपापला दिनक्रम आखलेला. चेह:याला रुमाल लावून नसलेलं सामान आणून देणं, कोणत्या न कोणत्या पडद्यावरची (मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर) चलत चित्नं पाहत बसणं, बाधितांचा आकडा कसा वाढला, कोरोनाची आपल्या शहरात घडलेली गॉसिप्स सांगत दिवस घालवणं. हे असं सगळं निवांत चाललेलं दिसतं.आपण या पुढच्या काळात बेरोजगार होऊ अशी धास्ती यापैकी अनेकांना नाही.भय आहे; पण पुढचं पुढे, आत्ता त्याचं काय? असा एकूण अॅटिटय़ूड.हा काळ कसा?- घरात बसणा:यांना घरातच बसा असं सांगण्याचा. तोंडाला फेस येईर्पयत स्टे होम, स्टे सेफ म्हणायचा. पण ‘सेफ’ म्हणजे निष्क्रिय नाही. निमूट बसा, निवांत नाही. उद्याची भ्रांत आहे. जगण्याचं भय आहे. आपल्या हाती कोणतंच कौशल्य नाही धडकी त्याची भरायला हवी.एक भाषा आपल्याला नीट बोलता, लिहिता येत नाही. आकलनाची बोंब. संकल्पनेर्पयत आपण पोहोचू शकत नाही. विषयाच्या तोंड ओळखीर्पयत कसेबसे पदवीर्पयत पोहोचलो.आजवर ‘शार्प’ नावाच्या एका गाइडने आपल्याला तारलं. या दीड-दोन महिन्यांच्या काळात आपण काय वाचलं, कोणता शोध घेतला, कशात पारंगत झालो?या प्रश्नांची उत्तरं आपली आपल्यालाच द्यायची आहेत. ही नेहमीसारखी सुटी नव्हती, नाही..तणावाशी सामना करणारा हा काळ.  आरोग्य, ज्याकडे दुर्लक्ष झाले आहे, ते निकोप कसं ठेवता येईल याची संधी. आपला मोबाइल हँग झाला तर तो ज्या वेगाने नि प्रचंड तत्परतेने दुरु स्त करायला घेतो, तसे  कित्येक वर्ष आपण हँग झालो आहोत, आपल्यालाच दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. या वेळेचा उपयोग करायला नको? पदवीधर झाल्यावर पुढे काय?उद्योग व्यवसायासाठी उभारलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणारे असंख्य मजूर आपापल्या गावी सध्या परतत आहेत. त्यातले काही परत येण्याची शक्यता कमी. अशावेळेस स्थानिक तरुणांची निकड भासणार आहे. पदवीधारक आहे मात्न निपुणतेचा अभाव. अशांना प्रशिक्षित केले जाईल. व्यावसायिकांना मनुष्यबळाची गरज आहे. मात्न त्यासाठी सर्वसामान्य कुवत असलेल्या कुठल्याही पदवीधारकाने प्रथम  स्वत:बद्दलच्या बेगडी अपेक्षा काढून टाकल्या पाहिजेत.मी इतका (?) शिकलेलो. एम.ए. - एम.कॉम झालो. नि आता हे काम? असा वेडगळ विचार सोडलाच पाहिजे येथून पुढे. पदव्युत्तर पदवी घेण्यामागील आपला हेतू तपासायला पाहिजे. आपण किती काळ पदव्यांची संख्या वाढवत जाणार आहोत? त्याऐवजी छोटे छोटे कोर्सेस आपण करू शकतो. कोणतीही लाज भीड न बाळगता लोकांच्या गरजा पुरवणा:या सेवकांचे काम करू शकतो.जे शिक्षण आपल्याला रोजगार प्राप्त करून देऊ शकत नाही  किंवा त्या शिक्षणात सारी कौशल्यं असली तरी तिचा समग्रतेने धांडोळा घेण्याची विद्याथ्र्याची क्षमता नसेल तर अभ्यासक्र मांच्या पुनर्रचनेची वेळ आता आली आहे. आपल्याला पुढे काय करायचं आहे याचं उत्तर ज्याच्यापाशी नाही, ज्याला परीक्षेच्या आदल्या रात्नीच अभ्यास करायचा आहे, ज्याला वाचनात गोडी नाही ज्याला मेसेजेस नि व्हिडीओ क्लिप्स फॉरवर्ड करण्यातच रु ची आहे, मात्न स्वत:ला अपडेट नि अपग्रेड करण्याचा मनस्वी कंटाळा आहे अशा शंभरातील नव्याण्णव तरुण-तरुणींनी आणि त्यांना लाडावून ठेवलेल्या पालकांनी आपल्या बंटी नि पिंकीला कोरोनानंतरच्या जगाची आतातरी जाणीव करून द्यावी.लॉकडाउनचा कंटाळा संधीत बदलला तरच या लॉकची किल्ली आपल्याला गवसेल !

निव्वळ पदव्या भारंभार मार्च 2020 मध्ये 8.7 टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर एप्रिल महिन्यात 23.5 टक्के झाला. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया अॅण्ड इकॉनॉमीने जाहीर केलेली ही आकडेवारी. थोडे सोपे बोलायचे झाल्यास येथून पुढच्या काळात नोक:या मिळणं केवळ दुरापास्त. हा काळ घर हाच कट्टा करत ज्यांनी, सुमार असलेले सुमारे पन्नास तरी चित्नपट, वेब सिरीज पाहिल्या असतील नि आपला मुलगा/मुलगी काय करणार? बापुडी घरीच बसली आहे असा विचार पालक करत असतील तर त्यांनी किमान आतातरी प्रथम या तरुणांना वास्तवाची जाणीव करून द्यायला हवी. जवळपास 7.2 कोटी कामगारांचा रोजगार आज गेला आहे. साडेआठ कोटी, रोजगाराच्या शोधात आहेत त्यात या तरुणांची भर पडणार आहे. शहरी भागात बेरोजगारीचा दर 24.95 टक्के तर ग्रामीण भागात तो 22.89 टक्क्यांवर आहे. महाराष्ट्रात तो 20.9 टक्के आहे. जिथे आपण राहतो त्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषिक्षेत्नाचा वाटा 9.9 टक्के तर औद्योगिक क्षेत्नाचा 30.4 टक्के वाटा आहे. मोठय़ा शहरातील उद्योग ठप्प पडले आहेत. मुंबई, पुणो, ठाणो, पिंपरी-चिंचवड येथे ही घडी बसायला वेळ लागणार. राज्यात सव्वाचार लाख लघु अन् मध्यम उद्योग आहेत. तेथील महिन्याभराची उलाढाल सव्वा लाख कोटींची आहे. 8क् लाख लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. प्रत्यक्षात फक्त 14,781 उद्योग या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावाने सुरू होऊ शकले. अनेक कुटुंब यामुळे देशोधडीला लागली. मालेगाव, भिवंडी, सोलापूर, इचलकरंजी या शहरांमधील वस्नेद्योग 30 लाख लोकांना रोजगार देणारा. 50टक्के कामगार मात्र इतर राज्यातून येथे येतात. आज हे परप्रांतीय आपापल्या राज्यात परतले. त्यामुळे मोठय़ा छोटय़ा शहरात स्थानिक मजूर-कामगार-कौशल्य प्राप्त तरुणांची नितांत गरज भासणार आहे. अशावेळेस त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी काही कंपन्या पुढे सरसावतील. तेव्हा गेल्या काही महिन्यात कोणतेच स्कील प्राप्त न केलेले तरु ण तरु णी नक्की  नाकारले जातील.निव्वळ पदव्यांचा भारंभार साठा बाळगून आता उपयोग होणार नाही. आपण सेट-नेट करावे किंवा पीएच.डी. अशी महत्त्वाकांक्षा(?) असणा:यांच्या पदरी घोर निराशा येण्याचीच शक्यता. आज देशात अंदाजे सव्वादोन लाख ही परीक्षा आणि पीएच.डी. मिळवणारे आहेत. प्राध्यापकांच्या रिक्त जागा न भरल्याने तासिका तत्त्वावर काम करणा:या प्राध्यापकांची परवड भीषण नि भयावह आहे. या काळात आपण चौदा अठरा तास वाया घालवणं हा गुन्हा ठरेल.

मग नेमके करावे काय?तर गुगल गॅरेजवर सर्व प्रकारचे डिजिटल मार्केटिंग, कम्युनिकेशन, प्रेङोन्टेशन पब्लिक स्पिकिंगसारखे सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला करता येतील. वऊएटवर जगभरातील व्हिज्युअल आर्ट्स जसे कॅलिग्राफी, पब्लिक आर्ट, कॉमिक आर्ट, फोटोग्राफी यासारखे 37क्क् प्रकारचे कोर्सेस करता येतील. डूइटय़ूवर सेल्फ यासारख्या चॅनलवर मेकअप, हेअरस्टाइल, फॅशन डिझायनिंगचे कोर्स प्रमाणपत्नाशिवाय शिकता येतील.  ऊकउफएअळडफर येथे मशीन लर्निग-कार्पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, हॉर्डवेअरसारखे छोटे कोर्सेस प्रमाणपत्नाशिवाय शिकता येतील. हे किंवा यातील काही कोर्सेस वर्षभरात केले असते तरी या सगळ्याचा उपयोग लॉकडाउनच्या काळात सराव म्हणून करता आला असता. 

(लेखिका विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असून, नाशिक येथील हंप्राठा महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत.)