- अनिल भापकर
स्मार्टफोनवरच एडिटिंगची हौस भागवत, आपल्या फोटोंचा नूरच पालटणारं एक अँप
पूर्वी फोटोग्राफी करायची म्हटलं की एक चांगला कॅमेरा लागायचा.शिवाय फक्त कॅमेराच चांगला असून चालायचं नाही, तर त्यासाठी फोटोग्राफीचं चांगलं ज्ञान आणि तशी नजरसुद्धा लागायची; कारण तेव्हा रोलचा जमाना होता. आजच्या सारखी डिजिटल चंगळ नव्हती. एक चांगला फोटो मिळवण्यासाठी फोटोग्राफरला कित्येक तास नव्हे तर कधी कधी संपूर्ण दिवस मेहनत घ्यावी लागायची. फोटोग्राफी ही कठोर मेहनत घ्यायला भाग पाडणारी कलाच होती.
आजही ती कलाच आहे, मात्र तंत्रज्ञान आल्यानं हौशींनाही फोटो काढणं सोपं जाऊ लागलं. काळ बदलला आणि कॅमेरा रोलची जागा डिजिटल कॅमेरानं घेतली. फोटोग्राफी सोपी झाली आणि सामान्य माणसाच्या आवाक्यातही आली.
कॅमेरा हातातल्या स्मार्टफोनमध्ये आला आणि प्रत्येकजण आपली फोटोग्राफीची हौस भागवू लागला. मात्न आता हे हौशी फोटोग्राफर फक्त क्लिक केलं आणि फोटो काढला म्हणजे झालं इथंच आता काम संपत नाही.
फोटो एडिटिंग अँप्स सध्या जास्त चर्चेत आहेत. फोनवरच फोटो एडिटिंग सध्या केलं जातं. आणि आपल्याकडे किती एकसे एक अँप्स आहेत यावरून तरुण जगात बढाई मारणंही सुरू झालेलं आहे. अशाच एका अँप्सचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे त्याचे नाव आहे प्रिझमा.
अगोदर हे अँप फक्त आयफोनसाठी उपलब्ध होतं. मात्न, याची लोकप्रियता बघून हे अँप जुलैपासून अँण्ड्रॉईडसाठी उपलब्ध झालं आहे. प्रिझमा हे अँप उपलब्ध झालं तेव्हापासून अनेकांच्या प्रोफाईल फोटोची जागा प्रिझमा फोटोनं घेतली. प्रिझमाने बॉलिवूड कलाकारांनादेखील वेड लावलं.
काय आहे या प्रिझमात?
१. प्रिझमा अँप डाउनलोड करून स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करून घ्या. केवळ सहा एमबी साईज असलेले हे अँप लगेच इन्स्टॉल होतं.
२. प्रिझमा अँप रेडी टू यूज आहे, म्हणजे हे अँप अकाउंट क्रि एट करायला किंवा लॉगिन करायला सांगत नाही.
३. तुम्ही प्रिझमा अँपचा वापर करून फोटो घेतला की लगेच अनेक आर्टवर्कचे ऑप्शन्स तुमच्या समोर येतात. त्यापैकी एक छान आर्टवर्क सिलेक्ट करता येतं.
४.तुमच्या स्मार्टफोनवर आधीच सेव्ह असलेल्या फोटोंनासुद्धा प्रिझमा अँपच्या मदतीने एखाद्या छान आर्टवर्कमध्ये कन्व्हर्ट करता येतात.
५.तुम्हाला असं वाटलंच की एखाद्या प्रसिद्ध चित्नकारानं तुमचं चित्र काढावं. मात्न त्यासाठी पैसे नसतात. ही हौस पूर्ण होणं शक्य नाही. मात्न प्रिझमा अँपमुळे आता हे शक्य होऊ शकतं. फोटोला चित्राचा फील देता येऊ शकतो.
६. एखाद्या मोठय़ा स्केच आर्टिस्टकडून स्केच काढावं तसा या अँपचा वापर करता येतो.
७. फायनल झालेला फोटो तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा सोशल मीडियावर शेअरही करू शकता.
८. हौस भागवत आपल्याच फोटोंना नवीन लूक द्यायचा असेल तर प्रिझमा ट्राय करून पहायला पैसे पडत नाहीत.