शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

पुरुषोत्तम करंडक पुणेकरांना का हुलकावणी देतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 7:25 AM

अरे करंडक पुण्याचा, असा आवाज आता पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत का घुमत नाही?

ठळक मुद्देगेली अनेक वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेवर पुण्यातल्या महाविद्यालयाचं वर्चस्व राहिलं आहे.

- राहुल गायकवाड

अरे आवाज कुणाचा, अरे करंडक कुणाचा.. गेली अनेक वर्षे या स्पर्धेवर पुण्यातल्या महाविद्यालयाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यातही बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, फग्यरुसन महाविद्यालय, सर परशुराम महाविद्यालय, पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय या महाविद्यालयातील विद्याथ्र्यानी पुरु षोत्तम नेहमीच गाजवलंय. पुरुषोत्तम जिंकणं म्हणजे पुण्याच्याच कॉलेजचं काम. बाकीच्यांना पुण्यात जाऊन काय जमेलंस नाही असंच अनेक वर्षाचं चित्र. पण गेल्या काही वर्षापासून अहमदनगरच्या काही महाविद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. वर्षानुवर्षे एक सांस्कृतिक परंपरा असणार्‍या पुण्यात नगरचे विद्यार्थी व्यक्त व्हायला लागले. पुण्यातल्या नावाजलेल्या, मोठी परंपरा असणार्‍या महाविद्यालयांचं तगडं आव्हान त्यांच्यासमोर होतं. सुरु वात अडखळत झाली. पुणेकरांइतकी ना साधनं होती ना सुविधा; पण लढण्याची जिद्दच नगरच्या विद्याथ्र्याना पुरुषोत्तम करंडकार्पयत घेऊन गेली. आणि म्हणूनच गेली तीन वर्षे सलग पुरुषोत्तम करंडक पटकावण्याचा मान नगरच्या महाविद्यालयांना मिळाला आहे. करंडक सलग तिसर्‍यांदा पुण्याच्या बाहेर गेलाय?असं पुण्यात कसं घडलं? का घडलं असावं?कला ही एकाअर्थाने आपल्या जगण्याचं प्रतिबिंब असते. आपण जसं जगतो, जसं पाहतो, जे अनुभवतो ते कलेतून व्यक्त करत असतो. त्यातही नाटक, एकांकिका हे जिवंत माध्यम आहे. समोर बसलेल्या शेकडो लोकांसमोर अभिनय करणं तसं आव्हानात्मक असतं. पुणे शहर म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. या शहरात कलांना आणि कलाकारांना एक मानाचं स्थान दिलं जातं. त्यामुळेच आत्ताच्या घडीचे अनेक प्रतिथयश कलाकार या पुण्यभूमीतून तयार झाले. कलाकारांना पोषक वातावरण नेहमीच पुणे शहरात मिळतं.  नाटकांसाठीची नवनवीन नाटय़गृहे असोत, की चित्रकारांसाठीच्या आर्ट गॅलरी पुणेकरांनी नेहमीच कलाकारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर दिला. त्याचंच फळ म्हणजे पुण्यात भराभराटीस आलेली सांस्कृतिक चळवळ. नाटय़ चळवळ. परंतु अनेकदा ही सांस्कृतिक चळवळ पुण्यापुरतीच आणि त्यातही एका विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित राहिल्याचा सूर दबक्या आवाजात उमटू लागला होता. ज्याप्रमाणे पुण्यातील कलाकारांचं कौतुक केलं गेलं त्याप्रमाणे इतर भागातील कलाकारांचं कौतुक अभावानेच होताना दिसलं.पुरु षोत्तम स्पर्धेत आता पुण्याच्या महाविद्यालयांना टक्कर देण्यासाठी अहमदनगरची महाविद्यालये पुढे येत आहेत. आपल्या मातीतलं, आपल्या भाषेतलं, आपलं जगणं आता ते एकांकिकांमधून मांडतायेत. हे मांडत असताना त्यातील साधेपणा कुठेही झाकोळला जाणार नाही याचीही ते कटाक्षाने काळजी घेत आहेत. छोटय़ाश्या विषयातदेखील किती मोठा अर्थ दडला आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहेत.  पुरु षोत्तम ही खरं तर अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन यावर भर देणारी स्पर्धा आहे. नगरच्या एकांकिकांमध्ये भावणार्‍या गोष्टी कुठल्या असा प्रश्न परीक्षकांना विचारला तेव्हा या एकांकिकांचे विषय आणि तो मांडण्याची पद्धत भावल्याचं परीक्षकांनी सांगितलं. आपल्याकडे काय आहे याचा विचार करून त्याचा जास्तीत जास्त सकारात्मक वापर एकांकिकांसाठी नगरच्या महाविद्यालयांनी केल्याचं मत परीक्षकांनी नोंदवलं. त्यातही संहितेला दिलेलं महत्त्व त्यांचं यश अधोरेखित करणारं होतं असंही परीक्षकांना वाटतं.पण मग या सगळ्यात पुण्यातली महाविद्यालयं कुठे मागे राहिली? राहिली का?याचा जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सादरीकरणातील क्लिष्टता आणि संहितेची मांडणी याकडे अधिक लक्ष देणं गरजेचे असल्याचं समोर आलं. याचा अर्थ पुण्यातल्या महाविद्यालयांचे सादरीकरण कमी दर्जाचं होतं असं नाही. परंतु एकांकिका, तिचे विषय आणि त्यांच्या सादरीकरणाकडे अधिक सजगतेने पाहण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्यातच समाजमाध्यमांचा परिणामसुद्धा आता एकांकिकांवर होतोय. त्यामुळे प्युअर नाटक कुठेतरी मागे पडतंय, तर दुसरीकडे नगरचे विद्यार्थी आपल्या मातीशी नाळ जोडलेल्या कथा घेऊन समोर येत असल्यानं त्यातला सच्चेपणा सरस ठरत आहे.दुसरीकडे नाटक करणारी पुण्यातल्या सर्वच महाविद्यालयांमधली एक फळी महाविद्यालयांमधून बाहेर पडल्याने काहीशी पोकळी निर्माण झाल्याचं वातावरण आहे. एकांकिका ही स्पर्धेसाठी नाही तर आपलं म्हणणं, आपला विषय, जगताना येणारे अनुभव मांडण्यासाठी केल्या जात होत्या. स्पर्धेत जिंकण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी नव्हे तर केवळ चांगलं नाटक करायचंय ही भावना त्यावेळच्या तरु णांमध्ये प्रकर्षाने जाणवत होती. त्यासाठी मग ते दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करण्यासाठी मागेपुढे बघत नसत. परंतु पुण्यातल्या आताच्या संघांमध्ये हे समर्पण फार कमी दिसतं असं निरीक्षण अनेक वर्षे पुरुषोत्तम केलेले आणि करंडक मिळवलेले कलाकार खासगीत नोंदवतात. एक टीम म्हणून काम करण्याची भावना आणि उत्तम नाटक करण्यापलीकडे कुठलीही नसलेली महत्त्वकांक्षा जास्त महत्त्वाची असते असं त्यांचं मत आहे. तेव्हा विषय जरी क्लिष्ट असला तरी तो मांडण्याची सहजता तितकीच आवश्यक असल्याचंही अनेकजण सांगतात.पुरुषोत्तमच्या निमित्ताने पुण्यासोबतच इतर ठिकाणीसुद्धा सांस्कृतिक वातावरण आता तयार होतंय, नवनवीन कलाकार समोर येत आहेत ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. येत्या काळात नगरच्या ऐवजी आणखी कुठल्यातरी दुसर्‍या शहरातले विद्यार्थीही पुरुषोत्तम करंडक पटकावतीलही. त्यामुळे नाटक, चित्रपट हे पुण्या- मुंबईपुरतेच मर्यादित आहे या समजुतीला छेद देण्याचं काम नगरच्या निमित्ताने सुरू झालं आहे.

***********

नव्या वाटेवर..

पुरुषोत्तम करणार्‍या पुण्यातल्या आताच्या तरुणांचं मत मात्र काहीसं वेगळं आहे. ते म्हणतात, पुण्यात इतकी र्वष नाटक करताना त्यात आम्ही वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहोत. नाटकातील वेगवेगळ्या लेवल्स गाठण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यासाठी निवडण्यात येणारे विषयदेखील वेगळे आहेत. त्यात काहीशी क्लिष्टता आली, ते साधं, सुबोध नसलं तरी नवीन काहीतरी करून पाहण्याचा आमचा प्रयत्न जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे नवीन काही करून पाहण्याचा धोका आम्ही पत्करतो आहोत, तो मोलाचा आहे असं काही तरुण कलाकार-दिग्दर्शकांना वाटतं. असं असलं तरी एकांकिकेच्या संहिता लेखनामध्ये विचार कमी पडत असल्याचं ते मान्य करतात त्यावर काम करण्याची गरज असल्याचेही ते बोलून दाखवतात. 

( पुण्यातल्या विविध नाटय़ स्पर्धेत सहभागी होणारा राहुल आता लोकमत  ऑनलाइनमध्ये वार्ताहर आहे.)