- मोनाली गोर्हे
यंदाच्या आशियाई स्पर्धेत नेमबाजीत कोल्हापूरच्या राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावले; पण ते जणू काही तिने आधीच बुक करून ठेवल्यासारखे वाटत होते. गेल्या काही दिवसांपासून मी फेसबुकवर तिचे अपडेट्स बघत होते. त्यात तिच्यातला आत्मविश्वास खूप वाढलेला दिसत होता. तिच्यात तो मुळातच खूप आहे. पण सोशल मीडियावर माझ्या माहितीप्रमाणे ती पहिल्यांदाच ते जणू चॅलेंजिंगली सांगत होती की, एशियन गेम्सचे सुवर्णपदक मी जिंकणारच ! आणि तिने ते जिंकलेच !!मी राहीला 2007-2008पासून ओळखते, खूप मितभाषी. पण शूटिंगमध्ये एन्ट्री केल्यापासून तिने जणू कातच टाकली. राज्य, राष्ट्रीय स्पर्धापासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धात, आख्या जगात ही मराठमोळी मुलगी आपला दबदबा निर्माण करत होती.2008मध्ये पुणे येथे कॉमनवेल्थ युथ गेम्स भरविण्यात आले होते. राहीने तेव्हा 25 मी स्पोर्ट्स पिस्तूल या तिच्या आवडत्या क्र ीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय क्रीडा जगात आपले नाव कोरले. तेव्हा राही फक्त 18 वर्षाची होती. तेव्हापासूनच राही केवळ युवा गटातच नव्हे, वरिष्ठ गटातसुद्धा आपला दबदबा निर्माण करत होती.माझा खेळ तेव्हा जवळ जवळ बंद झाला होता. मी माझ्या संस्थेच्या इतर नेमबाजांबरोबर प्रशिक्षक म्हणून जात असे तेव्हा राही आपल्या आईबरोबर स्पर्धेसाठी येत असे. राही जर फायनलमध्ये खेळत असेल तर जबरदस्त स्पर्धा खेळून ती जणू यश खेचून आणते असे वाटत असे.राहीच्या यशामागे अनेक रहस्य आहेत. मी राहीला 2011मध्ये पुणे येथे बालेवाडीच्या शूटिंग रेंजवर सराव करताना जवळून बघितलं. 8.30 वाजता रेंज उघडण्याच्या आधी राही नियमित वेळेवर हजर असायची. बर्याच वेळा रेंजवर स्वतर्च सर्व दिवे लावून, पूर्वतयारी करून वेळेवर सराव सुरू करत असे. 8.30 ते 1 र्पयत सराव मग 2 ते 2.30 र्पयत जेवणाचा ब्रेक. परत 3 ते 5 सराव. सायंकाळी 5.30 ते 7 फिटनेस असे तिचे व्यस्त वेळापत्नक असे. आजदेखील ते अशाच प्रकारे आहे. आठवडय़ातून 5 ते 6 दिवस सराव.यश एका दिवसात येत नाही, त्याला अनेक दिवसांची मेहनत व तपश्चर्या लागते. 2011-12 पासून जवळजवळ 2015र्पयत राही रशियन प्रशिक्षक अनातोली पिदूबनी यांच्याकडे नेमबाजीचे कौशल्य शिकत होती. राही आणि अनातोली यांचे गुरु-शिष्य टय़ुनिंग खूप चांगले होते. नेमाबाजीमधील करिअरच्या बर्याच चढउतारात राहीने अत्युच्च कामगिरी केली आहे. 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक, सांघिक सुवर्णपदक, 2012 ऑलिम्पिक स्पर्धा सहभाग. कोरिया येथे 2013 मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत ती फायनलर्पयत पोहचली होती. स्पर्धा खेळत असताना तिच्या असे लक्षात आले की, कोरियन लोक जे प्रेक्षक म्हणून बसले होते ते तिच्या चांगल्या शॉट्सवर शांत राहत व इतर देशांच्या मुलींनी चांगला शॉट मारला की त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत. तिच्या मनाला ते फार लागले; पण तरीही तिने स्वतर्ला विचलित होऊ दिले नाही. तिने जिद्दीने ठरवले की, वाजवा काय टाळ्या वाजवायच्या त्या इतरांसाठी; पण मी येथून सुवर्णपदकच घेऊन जाणार. शेवटच्या टाळ्या तुम्हाला माझ्यासाठीच वाजवाव्या लागतील. आणि खरोखरच जिद्दी राहीने अत्युच्च कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले आणि कोरियन लोकांकडून स्वतर्साठीच नव्हे तर आपल्या देशासाठीही टाळ्या वाजवून घेतल्या ! आपल्या देशाचा तिरंगा कोरियात रोवून ती आली. ती पहिली भारतीय महिला होती जिने 25 मि. स्पोर्ट्स पिस्तूल क्र ीडा प्रकारात वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.2014 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये परत तिने आपल्या कामगिरीचा आलेख वर नेला व 25 मि. स्पोर्ट्स पिस्तूलमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. 2014च्या आशियाई स्पर्धेत तिने सांघिक कांस्य जिंकले.2016चे साऊथ एशियन गेम्स; जे भारतात झाले होते, त्यातही तिने वैयक्तिक व सांघिक सुवर्णपदक जिंकले.2008 ते 2016 या कालावधीत राहीने नेमबाजीतील आपल्या करिअरमध्ये आठ वर्षात खूप मोठी सफलता संपादित केली आहे. राष्ट्रीय स्पर्धाच नव्हे तर कॉमनवेल्थ, आशियाई स्पर्धा, जागतिक नेमबाजी. या सर्व स्पर्धा तिने गाजविल्या आहेत.तिच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र शासनाने शिवछत्नपती क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे. सध्या ती उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे.