शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

समाजभानाचं इंद्रधनुष्य

By admin | Published: November 10, 2016 2:33 PM

आपलं सामाजिक वास्तव तारुण्याला नुस्त कळत नाही, तर त्यातली गुंतागुंत समजून त्यावर ठाम भाष्य करण्याचीही त्यांची तयारी आहे. त्याचीच एक झलक मराठवाडा विद्यापीठात दिसली..

- राम शिनगारे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यभरातल्या २० विद्यापीठांतले ८०० युवक जमले होते. निमित्त होतं इंद्रधनुष्य महोत्सवाचं...‘नुस्ते मोबाइलमध्ये नाक खुपसून बसतात. व्यवहारज्ञान नाही तिथं सामाजिक भान कुठं असणार? पायाखाली काय जळतंय हे ज्यांना कळत नाही, ते काय उद्याचा समाज घडवणार..’- हे वाक्य कानावर पडलं नाही असा तरुण विरळाच.वडीलधाऱ्यांचं तर हे आजच्या तरुण पिढीविषयीचं एक जाहीर सोशल स्टेटमेण्ट आहे.खरंच भान नाही आजच्या तरुण मुलांना की समाजात काय चाललंय?की असलेलं भान सोडून ते भलतंच काहीतरी करताहेत?शोधत गेलो.निमित्त होतं औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ महोत्सवाचं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यभरातल्या २० विद्यापीठांतले ८०० युवक जमले होते. २४ कलाप्रकारांमध्ये या युवक-युवतींनी विविध कार्यक्रम सादर केले. आणि एकेक कार्यक्रम, प्रहसन, लघुनाटिका पाहताना वाटत होतं की, आपला भवताल किती चांगला कळतोय या कॉलेजात शिकणाऱ्या तारुण्याला. आणि नुस्ता कळत नाही तर तो पचवून त्याविषयी नेमकं भाष्य करण्याची आणि सामाजिक चुकांवर बोट ठेवण्याची धमकही त्यांच्यात आहे.अभिनय, नाट्य, गीतं, वादन, पोस्टर्स, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा असे किती प्रकार. आणि किती विषय. तरुणाईला छळणारे, डाचणारे, अस्वस्थ करणारे. ते सारे विविध कलांचं रूप घेऊन या महोत्सवात जोरकसपणे उभे राहिले. नागपूरच्या महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठातला पाच विद्यार्थिनींनी एक प्रहसन अर्थात लघुनाटिका सादर केली.विषय मुलींच्या जिव्हाळ्याचा आणि मुलांचे डोळे उघडणारा होता. मिनी स्कर्ट परिधान करून सादर झालेल्या या नाटुकलीनं प्रश्न उपस्थित केला की, दोष बायकांच्या कपड्यांचा, की पुरुषांच्या विकृत नजरेचा? धर्म कुठलाही असो, अत्याचार होतात ते महिलांवर. मग वय काहीही असो. बालिका ते अगदी वयोवृद्ध महिलाही शारीरिक अत्याचार, कमेण्ट्स आणि गलिच्छ नजरा यांच्या मारापासून सुटत नाहीत. या साऱ्यात मानसिकता कुणाची बदलायला हवी, तरुणांची, पुरुषांची. त्यांनी जरा संवेदनशीलतेनं आपलं वागणं तपासून पाहायला हवं, असं ही नाटुकली सांगत असताना तरुण प्रेक्षकवर्ग विचारत होता स्वत:लाच काही प्रश्न. ज्यांची उत्तरं माहिती असली तरी पचवणं जरा अवघड जात होतं.सार्वजनिक ठिकाणी वेश्या शब्द उच्चारण्यास पुरुषांसह महिलासुद्धा घाबरतात. मात्र ‘होय, आम्ही करतो धंदा, दलालीचा नव्हे कष्टाचा’ असं म्हणण्याचं धाडस करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे प्रश्न, त्यांची पिडा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी दाखवली. लघुनाटिकेतून वेश्याची होणारी परवड त्यांनी बिनधास्तपणे मांडली आणि एकप्रकारे प्रश्नच केला उपस्थित तरुण समाजाला की, आपण या महिलांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तृतीयपंथीयांचं जगणं उलगडलं, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी विविध टेंडर्स आणि त्यातून होणारा भ्रष्टाचार, त्याची साखळी याचं रोखठोक वर्णन केलं. नाटुकल्यांच्या माध्यमातून असं विविधरंगी जगणं उलगडत असताना बरेचजण नि:शब्द झाले.पण दुसरीकडे रंगलं काय पेटलं होतं वादविवाद स्पर्धेचं व्यासपीठ. विविध जातीय मोर्चातला तरुणांचा सहभाग ते विविधप्रश्नी रस्त्यावर उतरणारे तरुण हे चित्र काय सांगतं याचा एक लेखाजोखाच यावेळी उलगडला गेला. रस्त्यावर का उतरताहेत तरुण याची कारणं यावेळी तरुणांनी शोधली. तेच सर्जिकल स्ट्राइकचंही. युद्धाचा ज्वर आणि शांतता, विकास यांची उत्तम जुगलबंदी यावेळी साऱ्या कॅम्पसनं अनुभवली.प्रश्न एकच, घटना एकच पण तरुण मुलंमुली त्या साऱ्याचा किती विविध अंगानं विचार करतात हेच इथं उलगडत होतं. आपलं वास्तव किती गुंतागुंतीचं आहे हे या मुलामुलींना समजत होतं, हेच सांगणारी ही काही उदाहरणं आहेत. त्यामुळे इतका बहुरंगी आणि बहुडायमेन्शनरी विचार करणाऱ्या या तारुण्याला कुणी सहज गंडवण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी ग्रामीणच नाही तर शहरी युवकांनासुद्धा आस्था आहे. मॉल, व्यापारी दुकाने, हॉटेलमध्ये गेल्यानंतर मध्यमवर्गीय मागेल तेवढे पैसे काढून देतात, तिथं भाव करत नाहीत; मात्र फाटक्या कपड्यात शेतमाल विकत असलेल्या शेतकऱ्यासोबत मध्यमवर्गीय भाव करतात. हा संकुचितपणा सोडायला हवा. शेतमालालाही सन्मान द्यायला हवा, असं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे युवक सांगत असतात तेव्हा आपलं आपल्यालाच काहीतरी उमगल्यागत शहरी तारुण्यही अंतर्मुख होताना दिसतं. पाच दिवस चाललेल्या या ‘इंद्रधनुष्या’नं तरुणाईच्या मनातल्या सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा जागवणारे अनेक रंग उलगडले. त्या रंगात हे तारुण्य मनसोक्त रंगूनही गेलं. मात्र हे सारं करताना या तारुण्यानं एक गोष्ट अधोरेखित केली की, आजच्या सामाजिक वास्तवाचं नुस्त भान नाही, तर त्यावर या मुलांचं काही म्हणणं आहे..समाज ते ऐकून घेणार का, हा वेगळा प्रश्न.* विविध संघटना, समाजाचे मोर्चे, महिला अत्याचार, हुंडाबळी, अवयवदान, जातीभेद निर्मुलन, अंधश्रध्दा, निर्मुलन, वेश्या व्यवसाय, बेटी बचाव, भ्रष्टाचार, सोशल मिडियाचा गैरवापर, रँगिंग, धार्मिक अनिष्ट रुढी, तृतीयपंथीयांच्या समस्या, शेतीमालाचा भाव, पोलिसांवरील अन्याय, सर्जिकल स्ट्राईक यासारख्या ज्वलंत विषयांवर युवकांनी बेधडक भाष्य केलं. * गोंडवाना या आदीवासी विद्यापीठातील युवकांनी वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी जागर केला तर अन् मुंबईतील युवकांनी एडस संदर्भातले धोके समजावून सांगितले.* ‘लेक वाचवा,वंश वाढवा’चा गजरच पोस्टर, शोभायात्रा, रांगोळी, मूक अभिनय, मिमिक्रीच्या माध्यमातून करण्यात आला.
 
(लेखक लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपसंपादक / वार्ताहर आहेत.)

shingareram07@gmail.com