-अखिलेश नागरे/ ओंकार जाधव
मॅग्नस कार्लसन. बुद्धिबळाचा हा बादशहा. आता चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पिअन झाला आहे. 28 वर्षाचा तरुण. त्याच्यात असं खास काय आहे, जे यापूर्वीच्या चेस चॅम्पिअनमध्ये नव्हतं. त्याचं उत्तर एकच, तो उत्तम बुद्धिबळ तर खेळतोच; पण या खेळाच्या सर्वच फॉरमॅट्सवर त्याची हुकूमत आहे. एरव्ही काहीच फॉरमॅट्सवर खेळाडू राज्य करतात. मॅग्नस चं तसं नाही. त्याच्या आयुष्यात ‘ड्रॉ’ हा शब्दच नाही. जिंकता येत नाही तर हरूतरी नये हा मध्यममार्गच त्यानं झुगारून दिला आहे. त्याला कळतं ते फक्त जिंकणं आणि त्यासाठी तो शांतपणे खेळतो. बुद्धिबळ तर खेळतोच; पण त्याचं फिटनेसवर भयंकर प्रेम आहे. प्रचंड फिट राहतो. त्याच्याकडे पाहिलं की कळतं, उत्तम आरोग्य असेल तर बुद्धीही उत्तम काम करते..त्याच्याकडे पाहूनच कळतं की, हा मुलगा अजब आहे. शालेय शिक्षण संपलं आणि त्यानं वर्षभर शिक्षणातून ऑफ घेतला. युरोपभर फिरला आणि फक्त बुद्धिबळाचे सामने खेळला. पहिलं ग्रॅण्डमास्टर टायटल कमावलं तेव्हा तो फक्त 13 वर्षे आणि चार महिने वयाचा होता. तो जीनिअस आहे याची खात्री त्याचवेळी जगाला पटली.त्याला मात्र आपल्याला चिकटलेलं हे जीनिअस बिरुद मान्य नाही. तो म्हणतो, ‘आय अॅम नॉट जीनिअस. मी तसा आळशीच आहे. माझे मित्र मला भरीस घालत, क्लासला नेत मग स्पर्धेला नेत. त्यातून मला बुद्धिबळ आवडायला लागलं. इतकं की वाटलं हे रोज केलं तरी मन भरणार नाही. मला नेमकं काय आवडलं, हे मात्र सांगता यायचं नाही !’त्याला एकच सांगता येतं, ते म्हणजे ही हेट्स ड्रॉ. मॅच ड्रॉ झाली हेच त्याला मान्य नाही. तो जिंकण्यासाठीच खेळतो आणि जिंकतो. त्याच्या पूर्वाश्रमींपेक्षा वेगळं असं त्याच्यात काय आहे, तर हे त्याचं जिंकण्याचं स्पिरीट आहे. तरीही त्याची स्टाइल ‘डल’ आहे असं अनेकजण म्हणतात; पण तो टॅक्टिकल खेळतो आणि संधी मिळताच प्रतिस्पध्र्याला चुकवतो. सुरुवातीच्या काळात तर तो अत्यंत आक्रमक खेळायचा. मात्र त्यानं हळूहळू आपला खेळ बदलला, जगभरातल्या खेळाडूंना मात द्यायची म्हणून त्यानं बारकाईनं खेळावर काम केलं. आता पोझिशल आणि टॅक्टिकल अशा दोन्ही प्रकारात तो उत्तम खेळतो आणि प्रतिस्पध्र्याला त्याला हरवणंच जड जातं!त्याच्या खेळातल्या काही गोष्टी म्हटलं तर बुद्धिबळातल्याच आहेत; पण त्यातून आपण जिंकण्याची आणि सर्वोत्तम ठरण्याची, चॅम्पिअन होण्याची काही सूत्रं नक्की शिकू शकतो..
1. परिपूर्ण खेळाडूतो बुद्धिबळ खेळाडू म्हणून परिपूर्णच आहे. या खेळातलं असं काहीच नाही, जे त्याला जमत नाही. त्यामुळं त्याला हरवणं कुणालाही जडच जातं, स्वतर्चा खेळ बदलत तो अशी परिपूर्णता शिकला आहे.2. कमालीचा अभ्यासत्याचा अभ्यास दांडगा आहे; पण कमालीची स्मरणशक्तीही आहे. या खेळात जिंकायचं तर भरपूर अभ्यास लागतो, पोझिशन्स, मूव्हचा अभ्यास बारकाईनं करावाच लागतो. तो भराभर माहिती घेतो, ती लक्षात ठेवतो, चटकन कृतीत उतरवतो. मुळात त्याच्या विचारांत मोठी लवचिकता आहे. फ्लेक्झिबिलीटी दांडगी आहे. त्यातून त्यानं स्वतर्ची शैली विकसित केली आहे.3. ट्रेनिंगआजही त्याचं बुद्धिबळाचं प्रशिक्षण सुरूच आहे. जिंकलो. जगज्जेता झालो असं काहीच नाही. स्वतर्च्या खेळाचं विश्लेषण, त्याचा अभ्यास यावर तो काम करतो.4. मानसिक सरावबुद्धिबळ खेळाडूची मानसिकता, त्याचा अंदाज, त्यावर मात हेदेखील मोठं असतो. तो स्वतर्च्या मानसिकतेचे बारकावेही जाणतो. प्रसंगी भयंकर डिफेन्सिव्ह खेळतो. त्याची अवस्था खराब असली तरी ते दिसू देत नाही, माघारही घेत नाही. टिच्चून राहतो.5. महत्त्वाकांक्षा प्रबळलहानपणापासून त्याला एकच कळतं, जिंकायचं. आताही तो तेच करतो. त्याला जिंकायचंच असतं. जिंकला नाही तर त्याच्या चेहर्यावर ते हारणं, चुटपूट दिसते. त्याचं ‘बेस्ट’ असणं हेच त्याचं ड्रायव्हिंग फोर्स बनतं.