विदेशी फॅशन जगात असं मानतात की, ‘समर इज द परफेक्ट टाइम टू गो बोल्ड!’
आणि गेली काही वर्षे तर असे ‘बोल्ड’ रंग सर्रास वापरण्याचं ‘धाडस’ करणं हाच एक मोठा ट्रेण्ड आहे.
त्या ट्रेण्डचा हात धरून यंदा समरचा रंग बनून आलाय तो पिवळा रंग!
एरवी पिवळ्या रंगाचे कपडे कुणी उन्हाळ्यात वापरत नसे. पण यंदा मात्र लेमन यलो, निऑन यलो, कोरल रेड, पिंकिश रेड, समुद्री निळा, हिरवट निळा हे सगळे रंग यंदा भर उन्हाळ्यात तरुण गॅँग अंगावर मिरवताना दिसते आहे.
आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं तर हिंमत लागते असे रंग उन्हाळ्यात ‘कॅरी’ करायला! भर उन्हाळ्यात, रखरखाटात असे ‘भडक’ रंग घालून वावरणं ही एका वेगळ्या धाडसाची गोष्ट अनेकांना वाटते.
कपडे आणि अॅक्सेसरीज एवढय़ापुरताच हा विषय मर्यादित होता तोर्पयत ठीक; पण आता त्याच्यापुढे एक पाऊल टाकत सरळ चेह:यावरच्या मेकअपर्पयत या रंगांनी धडक मारली आहे.
निळ्या रंगाची, हिरव्या, हिरवट काळ्या, चॉकलेटी किंवा काळ्या रंगाची लिपस्टिक कुणी लावेल असं पूर्वी कुणी नुस्तं म्हणालं जरी असतं तरी लोकांनी त्यांना वेडय़ात काढलं असतं. सध्या मात्र हे सगळे रंग अत्यंत उत्साहानं ओठांवर विराजमान होत आहेत.
गेल्या काही वर्षात कलर काजळ आले तेही आता जुने झाले. निळ्या, हिरव्या मरुन, काजळरेषा डोळ्यात आता सर्रास दिसतात. त्यानंतर रंगीतच नाही तर अत्यंत भडक असे आयलायनर आणि आयश्ॉडो डोळ्यांवर विसावू लागले.
आणि आता त्यांच्यापुढे जाऊन काही भन्नाट रंग ओठांवर विराजमान होऊन मेकअपला एक बोल्ड लूक देत आहेत.
त्यापैकीच काही ‘बोल्ड’ लिपस्टिक कलर्सचा हा एक लूक..
बोल्ड लिपस्टिक डार्क कलर्स
भरमसाठ दागिने घालणं, भरमसाठ मेकअप करणं, खूप खास हेअरस्टाईल करणं हे सारं आता जरासं मागे पडतं आहे.
चेह:यावर एकच रंग, एकाच रंगाची डार्क छटा मिरवायची, पण ती अशी दणदणीत की सा:या गर्दीत आपण उठून दिसलं पाहिजे. आणि व्यक्तिमत्त्वात काही उणिवा असतीलच तर त्या झाकल्या गेल्या पाहिजेत. खरंतर त्यांच्याकडे कुणाचं लक्षच जाता कामा नये.
यासोबत अजून एक गरज असते, ती ‘कूल, डिफरण्ट आणि स्टायलिश’ दिसण्याची. त्यासाठीही बोल्ड रंग वापरून स्वत:ची एक खास मेकअप ‘पहचान’ बनवली जाते.
त्यासाठी सध्या बोल्ड कलर्सच्या लिपस्टिक सर्रास वापरल्या जात आहेत.
या रंगछटांना ड्रामॅटिक शेड्स म्हणतात. त्या बोल्ड असतात. बोल्ड दिसतात. त्यामुळे त्या ओठांवर लावायला हिंमत लागते हे खरंच!
1) लायलॅक कलर्स
ऐश्वर्यानं ज्या जांभळ्या रंगाची लिपस्टिक वापरली त्याला म्हणतात लायलॅक कलर्स. असे फुलाफुलांचे रंग असलेल्या या लिपस्टिक. काळ्यासावळ्या रंगांनाही उठून दिसतात. या लायलॅक कलर्सच्या लिपस्टिक एरवीही संध्याकाळच्या पार्टीसाठी मुली वापरतात.
2) निऑन
निऑन कलर्सची फॅशन आहेच; मात्र निळ्या रंगाच्या अत्यंत गडद छटा, निळा निऑन, त्यात ग्रे कलरची लिक्विड लिपस्टिक मिक्स करून लावली जाते.
ऑरेंज निऑन, पिंक निऑन हे रंगही लिपस्टिकमध्ये अत्यंत हिरीरीनं वापरले जातात.
3) ग्रिनिश-ग्रे-चेरी रेड
संध्याकाळी आवजरून वापरलं जातं असं अजून एक कॉम्बिनेशन म्हणजे हिरव्या लिपस्टिकमध्ये थोडा ग्रे मिसळून लावणं. या ग्रिनिश-ग्रे, निऑन ग्रीन-ग्रे, चेरी रेड या सा:या रंगाच्या छटा ओठांवर दिसू लागल्या आहेत.
4) गोल्ड/सिल्व्हर
गोल्ड, सिल्व्हर पिगमेण्ट लिक्विड विविध रंगछटांमध्ये मिक्स करून लावणं, ओठांना बोल्ड, वाईडर, प्लम्प लूक देणं हे सध्या अनेकींना आवडतं. 24 कॅरेट गोल्ड लिक्विड, सिल्व्हर या रंगातही लिपस्टिक लावली जाते.
5) या सा:यात सूत्र एकच, आपल्याला जो रंग आवडेल तो लावायचा, दुनियेची पर्वा करायची नाही!
- धनश्री संखे
ब्यूटी एक्सपर्ट