शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पाणी वाहण्याची वणवण नशिबी आलेल्या मुलींच्या गावातून एक लाइव्ह रिपोर्ट: काय करता? पाणी भरतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 6:00 AM

सारी जिंदगाणीच पाण्यात गेली; पण डोळ्यात पाणी येईना असं सांगणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुलींच्या जगण्याचं एक प्रातिनिधिक वास्तव.

ठळक मुद्देडोळ्यात स्वप्न एकच, आजच्यापुरतं तरी पाणी मिळावं. आणि त्याहून मोठी आस म्हणजे, सासर तरी भरल्या पाण्याचं असावं!

- चेतन धनुरे

मु़पो़ कोळेवाडी़ 264 उंबरठे अन् पंधराशे लोकवस्तीचं एक छोटेसं गाव़़ शेती व पशुपालन हा इथला मुख्य व्यवसाय़ मात्र गेली दोन तप गावाला दुष्काळाने घेरले आह़े उस्मानाबाद जिल्हा तसाही अवर्षणप्रवण भागात मोडतो़ शेतकरी आत्महत्येत राज्यात अग्रस्थानी. आणि त्यात वर्षातील दहा महिने टँकरवर जगणारी ही कोळेवाडी. इथल्या पाणीटंचाईनं जगणंच पार कोरडं करून टाकलंय. इथं घशाखाली ढकलायलाच घोटभर पाणी बडय़ा मुश्किलीनं मिळतं, तिथं शौचालय बांधा नि वापरा या घोषणेचं काय करायचं? पाणी कुठून आणायचं? या प्रश्नानं बेजार आयाबाया, तरुण मुली या गावात भेटतात.

दुष्काळ आणि पाणीटंचाई याविषयावर चर्चा झाली तरी त्यांचं मत कुणी विचारत नाही. त्यांचे प्रश्न तर समाजाची ‘लास्ट प्रायोरिटी’ असतात. एकीकडे शिवारात बैल नांगरणी, कुळवणीला जुंपलेले दिसतात तर दुसर्‍या बाजूला इथं गावातल्या महिला, मुली सतत डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणताना दिसतात. त्यांना ना शिक्षणाची आस उरली, ना आरोग्याची तमा़ ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत बाराही महिने पाणी पाणी करत डोळ्यात पाणीही न उरलेली जिंदगाणी त्यांच्या वाटय़ाला आली आहे..

उस्मानाबादपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर हे कोळेवाडी गाव आहे. जवळपास गेली पंचवीस वर्षे हे गावं पाणी पाणी करत हाल काढतंय. ऑक्टोबर महिना उलटला की, पंचक्रोशीतील सगळीच जलस्नेतं आटतात आणि गावात टँकर सुरू होतो़ गेल्या दहा वर्षापूर्वी सरकारने नाही म्हणायला दहा खेडी पाणीपुरवठा योजनेत गाव बसवलं़ मात्र, दोन महिन्यातच ही योजना बंद पडली़ पुन्हा गावाच्या नशिबी पाण्यासाठी भटकंती आली़ 4 ते 5 किलोमीटर अंतर चालत जाऊन घरोघरच्या आयाबायांना पाणी मिळवावे लागत़े ही बाब लक्षात घेऊन 2014 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी गावाचा प्रस्ताव दिला होता़ मात्र, निधी नसल्याचे कारण पुढे करीत हा प्रस्ताव रद्द झाला़ आता मागच्याच आर्थिक वर्षात पुन्हा योजनेचा प्रस्ताव मांडण्यात आला़ मात्र ज्या गावांना यापूर्वी जीवन प्राधिकरणने पाणीपुरवठय़ाची योजना बनवून दिली होती, ती गावे पेयजल योजनेत बसणार नाहीत, असं सांगून पुन्हा प्रस्ताव फेटाळला गेला़ तात्पर्य, या पाण्यात बायकांच्या डोक्यावर पाणी वाहण्याचा भार आहे तो आहेच. या गावात गेलं तर काय दिसतं चित्र?

वेळ सकाळी 10 वाजताची़ टँकर येणार असल्याची वर्दी दारोदारी एव्हाना पोहचलेली होती़ त्यामुळे बाया-बापुडय़ांची घागरी, हंडे तोलत टँकर पॉइंटकडे पळापळ सुरू झालेली़ यात प्रामुख्याने महिला व मुलींची संख्या लक्षणीय़ पुरुषांनी अन्नधान्यासाठी राबायचे अन् बायका-मुलींनी पाण्यासाठी, हा जणू आता इथला शिरस्ताच बनला आह़े काही वेळातच टँकर आला आणि पाणी वितरण सुरू झाल़े घरटी दहा ते बारा घागरी पाणी मिळण्याची शिस्त लावण्यात आली आह़े ती गावकर्‍यांच्याही आता अंगवळणी पडलीय़ मात्र, इथे उन्हात उभ्या मुलींच्या नजरेत एक अस्वस्थता दिसत होती़ आजचं भागलं उद्या काय हा प्रश्न. काही मुलींशी बोलायचा प्रयत्न केला तशा त्या हंडे उचलून निघून गेल्या. मात्र काहीजणी बोलल्या. सांगत राहिल्या आपल्या पाणी वाहण्याची रोजकथा. दहावीत शिकणारी वैष्णवी खोत म्हणाली, ‘जसं कळायला लागलं तशी पाणीटंचाई आम्ही पाहतो आहोत़ आता टँकर एकदिवसाआड येतो़ दहा-बारा घागरी पाणी मिळत़े एक दिवसाचं भागतं़ दुसर्‍या दिवशी पुन्हा पायपीट़’ मध्येच क्षितिजा आकोसकर बोलली, ‘चार-चार किलोमीटर अंतर पायी तुडवून पाणी भरावं लागतं. आतातर इतक्या दूर गेलो तरी पाणी मिळत नाही़ बोअर, विहिरी आटल्यात़ पाणी नाही त्यात़’ प्रियंका कोळी, ज्ञानेश्वरी आकोसकर यांचीही हीच तक्राऱ टंचाईवर पोटतिडीक मांडताना या मुलींना आपलं शिक्षण, करिअर, भविष्य याचा विचार करायलाही फुरसत नाही. डोक्यात एकच पाणी भरायचं, पाणी कसं पुरायचं, कुठून आणायचं. तव्याप्रमाणे तापलेल्या भुईवरून अनवाणी पायानं सायकलवर तब्बल सहा घागरींचं ओझं वाहून नेणारी प्रियंका म्हणाली, ‘भविष्य आहेच कुठं आम्हाला? दिवसभर पाण्याची चिंता वाहायची़ शाळा, कॉलेज, करिअर याची चिंता शहरातील, पाणी असणार्‍या गावातील मुलींना़..’ ती बोलतच होती तोवर कंबरेवर घागर घेऊन उभी क्षितिजा पटकन म्हणाली, ‘आम्हाला तर स्वपAं पाहण्याचाही अधिकार नाही !’

आता उन्हाळा असल्यानं आता तरी टँकर गावात नियमित येऊ लागले आहेत़ अन्यथा, वर्षातील किमान 7 ते 8 महिने कोसो दूर शिवारातील जलस्नेतांवरून पाणी आणण्यातच इथल्या विद्यार्थिनींचा सूर्य मावळतो़ मग शाळा, कॉलेजही बुडत़े मुलींना शिक्षण घेता यावं म्हणून शासनानं मोफत पास, बारावीर्पयत शुल्क माफ केलं. शाळकरी मुलींना मोफत सायकली दिल्या़ मात्र, याच शिक्षणाच्या आड येणार्‍या पाण्याचा अडसर दूर करण्याचा प्रयत्न होत नाही़ अभ्यासाच्या बाबतीत या मुली सांगतात, ‘शाळा-कॉलेजमध्ये आज काय शिकवले, ते मैत्रिणींना विचारून घेतो़ त्याचा घरीच मिळेल त्या वेळेत अभ्यास करतो़ आता असा अभ्यास झाल्यावर शिक्षणाचा ‘निक्काल’च लागणार की़.!’

‘चांगलं शिक्षण घ्यावं, शहरात जावं, चांगली नोकरी मिळवावी, करिअर घडवावं, आयुष्य घडवावं असं आम्हालाही वाटतं; पण आम्हाला तो अधिकारच नाही का? उठलं की पाण्याचा हंडा उचलून फिरायचं.’ पदवीचं शिक्षण घेत असलेली क्षितिजा कळकळीने बोलत होती़ चुकीचं तरी काय तिच्या बोलण्यात़ पाणीटंचाईने कोळेवाडीतील सर्वच विद्यार्थिनींची ही अवस्था आह़े सूर्य उगवतो त्यांच्या डोईवर रिकामा हंडा देऊन अन् मावळतो भरलेल्या हंडय़ाऩे या काळात त्यांच्या नजरेत केवळ पाण्याचं स्वपA भरलेलं असतं.इतर स्वपAांना त्यांच्याकडे वेळच नाही़ त्यामुळे भरभराटी स्वपAांची स्वतर्‍हून या विद्यार्थिनींनी दुष्काळदाहात आहुती दिली आहे. या गावात राहून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली एकही विद्यार्थिनी नाही, मुलींना सोडावीच लागते शाळा असं गावकरीच सांगतात. अशा किती कथा. एका ओळीत सांगायचं तर उठलं की पाणी भरायला जायचं. लांब लांब. रोज. एक-दोन हंडे पाण्याठी पायपीट करत राहायची. आलं पाणी की पळायचं. डोक्यात फक्त एकच .पाणी. बाकी काहीच नाही. या मुलींचं आयुष्य फक्त हंडाभर पाण्याभोवती फिरतंय..

***** 

सासर तरी पाण्यानं भरलेलं असावं बाई !

टँकरचं पाणी भरता भरता जनाबाई खोत पटकन म्हणाल्या, ‘आमचं जे हाल झालं, पुढं ते आमच्या लेकराबाळांचं होऊ नये बाई़ आमची कोवळी लेकरं अनवाणी पायाने लांबून पाणी आणतात़ ऊन, पाऊस काईच बघत नाहीत़ यामुळे सतत आजारीही पडतात़ त्यांच्याकडे पाहिलं की काळीज चिरतं़  म्हणूनच आम्ही पोरगी देताना पोराच्या जमीन-जुमल्यापेक्षा त्याच्या गावात पाण्याचं कसं हाय, ते आधी बघतो आणि मगच पोरगी द्यायचा विचार करतो़’नुकताच विवाह झालेली देवकन्या घंटे ही कोळेवाडीच्या माहेरी आली होती़ आई-वडिलांचं गाव, माहेर हे नवविवाहितेसाठी कित्ती म्हणजे कित्ती अप्रूप असतं; मात्र, देवकन्या सासरी असलेल्या पाण्याचंच तोंड भरून कौतुक करत होती. सासरी पाणीटंचाई नाही म्हणत होती.जास्त अपेक्षाच नाही जगण्याकडून, पाणी फक्त दे बाबा घरात अशी स्वपA पाहणार्‍या इथल्या मुली. त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचंही मोल मोठं आहे.

सरपंचबाई म्हणतात़़़कोळेवाडीच्या सरपंचही महिलाच आहेत़ त्यामुळे त्या मुली-महिलांच्या वेदना अधिक प्रकर्षाने मांडत होत्या़ ऑक्टोबरचा महिना आला की काळजी वाढत़े अगदी दहा किलोमीटर अंतराच्या परिघातही पाणी मिळत नाही़ प्रशासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसावं लागतं. दोनवेळा पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव फेटाळले गेले आहेत़ इथल्या महिला-मुलींची अवस्था पाहून तरी सरकारने विशेष बाब म्हणून पाणीपुरवठा योजना दिली पाहिजे, अशी मागणी सरपंच राजकन्या राऊत करीत होत्या़ पाणी वाहून वाहून शिणलेल्या गावातल्या आयाबायांना अजून काय हवं, विचारत होत्या.

 

चेतन लोकमतचे उस्मानाबादचे प्रतिनिधी आहेत.