शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

निसर्गाच्या प्रेमात पडलेला एक तरुण दोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 4:43 PM

शाळकरी वयात त्याला निसर्गाची, पानाफुलांसह सापांचीही गोडी लागली. आणि आता तो त्यांच्या मदतीला धावतोय.

ठळक मुद्देऋषभने त्याच्या तज्ज्ञ मित्रांबरोबर 300हून अधिक सापांची सुटका केली आहे.

- ओंकार करंबेळकर 

शाळकरी वयातच एखाद्या मुलाला निसर्गाची ओळख करून देणार्‍या उत्तम कार्यक्रमात सहभागी होता आलं तर त्याचं आयुष्य कसं बदलून जाईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऋषभ शाह.  आता मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये राहणार्‍या मुलांचं शालेय जीवन फक्त शाळा आणि घर एवढय़ा परिघातच जात असतं. कधीकाळी सुटीच्या दिवशी किंवा मोठय़ा सुटय़ांमध्ये शहराबाहेर गेल्यावर जो काही निसर्ग डोळ्यांसमोर बाहेर पडेल तेवढाच. फार तर टीव्हीवर प्राण्यांच्या संबंधित कार्यक्रम पाहून निसर्गज्ञानाची भूक भागवावी लागते. ऋषभ शाहच्या शाळेच्या वेळेस अशीच स्थिती होती. शाळा आणि महाविद्यालयांबरोबर निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित काम करणार्‍या संस्था नव्या उत्साही मुलांचं पालन करत असतात, त्यांना निसर्गशिक्षण देत असतात. आज आपल्याकडे पर्यावरण क्षेत्रात उत्तम काम करणार्‍या तज्ज्ञांची त्याच्या कामाची सुरुवातही अशीच झालेली आहे.    आठवीत असताना ऋषभच्या शाळेत अचानक आपली शाळा ग्रीन ड्राइव्ह करण्याच्या विचारात आहे अशी घोषणा करण्यात आली. या मोहिमेमध्ये मुंबईतल्या पर्यावरण मित्र रहिवासी सोसायटय़ा शोधून त्यांच्या परवानगीने वृक्षारोपण करण्यात येणार होते. ऋषभला हे काहीतरी वेगळं वाटलं. त्यानं  आपल्याच सोसायटीच्या सेक्रेटरीची परवानगी मिळवली आणि वृक्षारोपणाची सुरुवात त्याच्याच घरापासून झाली. त्याच्या या असल्या धडपडीला ओळखून शाळेने पुढच्या वर्षी त्याला विद्यार्थी मंडळात पर्यावरण मंत्री म्हणून नेमलं. ऋषभ म्हणतो, खरं तर मला तेव्हा पर्यावरण वगैरेची फारशी माहिती नव्हती. पण पर्यावरण मंत्री म्हणून नेमल्यानंतर मी किड्स फॉर टायगर्स, ट्रेक्स, स्पर्धा आयोजित करू शकलो. त्यामुळे मित्रांबरोबर त्याच्याही निसर्गज्ञानात भर पडू लागली. याच कार्यक्रमांच्या आयोजनात त्याचा विविध एनजीओंशी संबंध आला. यामध्ये त्याची पहिली ओळख झाली सर्प या संस्थेच्या चैतन्य कीर आणि संतोष शिंदे यांच्याशी. या दोघांबरोबर राहून ऋषभने सापांची माहिती घ्यायला सुरुवात केली. अल्पावधीतच त्याला साप ओळखता येऊ लागले. घरांमध्ये आलेल्या सापांची सुटका करायलाही तो तेव्हाच शिकला. या कामामुळे त्याला शहराबाहेर पडून जंगलात फिरता आलं, नव्या लोकांना भेटता आलं, प्राण्यांना ओळखणं शक्य झालं. पण नवा छंद घरच्या लोकांना थोडा त्रासदायक वाटू लागला. यामुळे त्याचं अभ्यासातून लक्ष उडेल अशी भीती त्यांना वाटत होती. पण त्याचा फारसा परिणाम अभ्यासावर झाला नाही.     कॉलेजमध्ये गेल्यावर ऋषभने ‘सर्प’च्या मदतीने मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या महेश यादव आणि भूषण जाधव यांच्यामुळे जंगलातील विविध प्रजातींची माहिती त्याला मिळाली आणि वन्यजीवांच्या फोटोग्राफीचा नवा छंद त्याला मिळाला. आपला मुलगा निसर्गाशीच संबंधित काहीतरी करणार हे त्याच्या पालकांच्या एव्हाना लक्षात आलं होतं. एकेकाळी त्याचं साप हाताळणं त्यांना आवडायचं नाही; पण सापांची सुटका करण्याचं महत्त्व त्यांना समजल्यावर त्यांनी त्याला परवानगी दिली. त्याच्या वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची तीन प्रदर्शनंही झाली आहेत. चैतन्य कीरकडून अडचणीत सापडलेल्या प्राण्यांची सुटका कशी करायची, हे त्यानं शिकून घेतलं. आजवर त्यांनी अनेक सापासारखे सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राण्यांची सुटका केली आहे. दररोज त्यांना प्राण्यांची सुटका करण्याबद्दलचे किमान 14 तरी फोन येतात. त्यात बहुतांशवेळा सापासाठी आलेले फोन असतात. ऋषभने त्याच्या तज्ज्ञ मित्रांबरोबर 300हून अधिक सापांची सुटका केली आहे. सर्प, बीएनएचएस, बर्ड हेल्पलाइन, मिशन ग्रीन मुंबई, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जे. वाय, डिस्कव्हरी एन्व्हायरो, वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो अशा विविध संस्थांशी तो जोडला गेला आहे.    आज ऋषभ पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पर्यावरण आणि वन्यजीवांसंदर्भातील पत्रकारिता करण्याची त्याची इच्छा आहे. 2016 साली त्यानं नॅट्रावाइल्ड नेटवर्क नावाची एनजीओ स्थापन केली. या संस्थेने नुकतीच महासागर आणि त्यांच्या स्थितीवर एक माहितीपट तयार केला आहे. तो म्हणतो, मुंबईत राहणार्‍या 90 टक्के मुलांना मुंबईतल्याच जैवविविधतेची माहिती नसते. या मुलांनी मुंबईतल्या झाडांची, पशू-पक्ष्यांची माहिती मिळवायला हवी. मीसुद्धा त्यांची माहिती मिळवत आहे. शक्य झाल्यास मी मुंबईच्या जैवविविधतेवर पुस्तक लिहिणार आहे.