- रणवीर सिंग
(लोकमत दीपोत्सव-2015)
‘फेमस’ होणं म्हणजे नक्की काय असतं, याची एक कल्पना असते आपल्या मनात. डोक्यात असतं की, पैसा-प्रसिद्धी, सिनेमात हिरो, नाक्यावर पोस्टर म्हणजे फेमस होणं!
मलाही तसंच वाटायचं!
सिनेमात काम करायचं होतं कारण आय थॉट इट्स कुल टू बी अ हिरो!
पण ते तसं नसतं. मध्यमवर्गीय जगण्याच्या फेमस होण्याच्या व्याख्या आणि आजच्या जगातल्या फेमस होण्याच्या परिभाषा यात खूप फरक आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लोकांची नजर असते. तुम्ही चोवीस तास पब्लिक रडारवर असता.
मी माझं करिअर सुरू केलं तेव्हा मलाही या सा:याची कल्पना नव्हती. मी साध्यासुध्या नॉर्मल जगात वाढलो. स्टारने तमुक प्रकारचे कपडे घातले पाहिजेत, ढमुक प्रकारे दिसलं पाहिजे, अमुक प्रकारे बोललं पाहिजे. किती गोष्टी होत्या ज्या मला जमत नव्हत्या, कळतही नव्हत्या.
हे सारं फार दिवस रेटवेना आणि ङोपेहीना!
त्यात एकीकडे माङो सिनेमे जरा चालायला लागले होते. मग मी स्वत:ला सांगून टाकलं की, असेल फेमस होणं वगैरे महत्त्वाचं, पण माङयातला मस्त आनंदी ‘मी’ जास्त महत्त्वाचा आहे. आय शुड बी हॅपी अॅज अ पर्सन, जस्ट बिईंग मायसेल्फ इज मोअर इम्पॉर्टण्ट दॅन एनिथिंग!
एका टप्प्यावर हे ठरवून मोकळा झालो. तसं हे ठरवणं आणि मोकळं होणं मला नवं नव्हतंच! कॉपी रायटर म्हणून उत्तम चाललेलं क्रिएटिव्ह करिअर सोडून अॅक्टिंग करायची हा निर्णय मी असाच झटकेपट एक दिवस घेऊन टाकला होता.
त्यामुळे आपण करतोय, त्यात रिस्क काय, परिणाम काय असले पुचाट प्रश्न मी स्वत:ला विचारत बसलो नाही. मला वाटतंय ना, अमुक केल्यानं बरं वाटेल, उत्तम होईल, संपला विषय!
मग मी तेच केलं. मला वाटलं तसेच कपडे घातले, जे मनात येईल ते मीडियासमोरही खुलेपणानं बोललो. पर्वाच केली नाही की जे करतोय ते कुणाला आवडतंय का? कुणी काही म्हणतंय का?
आणि गंमत पाहा, हे सारं करताना माझा आत्मविश्वासही वाढत गेला. प्रत्येक गोष्ट माङया स्टाईलनं होऊ लागली. यश मिळायला लागलं.
आणि जे मी करतो तेच किती ‘अनकन्व्हेन्शनल’ आहे याची लोक चर्चा करू लागले. त्याचं कौतुक व्हायला लागलं. पारंपरिक पठडीतल्या गोष्टींना फाटा देऊन मी कसं ‘वेगळंच’ आणि ‘मॅजिकल’ असं काही करतो असं लोक म्हणू लागले.
आपल्या मनाप्रमाणो जगणं हा खरा तर नियम असायला हवा ना, ते अनकन्व्हेशनल कसं?
त्याचं उत्तर शोधण्यातही मला रस नाही. कारण सांगितलं ना, मी अती विचारबिचार करत नाही!