नाचो नाचो सारे, क्रिकेटवाली बिटपे...हे गाणं ऐकलं तुम्ही?नाही?पाहिलंही नाही?अरे ये नहीं देखा तो क्या देखा?सचिन तेंडुलकरच्या फॅन्सना दिवानं होवून नाचावं असं वाटेल, त्याची बॅटिंग पाहताना ज्या आनंदानं आपण कधीकाळी बेभान व्हायचो तोच आनंद पुन्हा जगावासा वाटेल, नव्हे तो आनंदच वेड्यासारखा सिक्सरच्या स्पीडनं नाचू लागेल अशी ही एक गोष्ट आहे..सचिन तेंडुलकर चक्क गातोय..येस्स! बरोबर वाचलंत!सचिननं सोनू निगमसह स्वत: गायलेल्या एका गाण्याचा व्हिडिओ नुकताच रिलीज झाला..आणि त्या व्हिडीओत सचिन स्वत: गाताना दिसतो..गाण्याच्या ओळी आहेत, नाचो नाचो सारे क्रिकेटवाली बिटपे..आणि सचिनची बॅटिंग जशी आनंदाचा संसर्गजन्य अद्भूत अनुभव घेवून यायची तसंच हे गाणंही गाताना तोच आनंद होतो..आपली सामान्य प्रेक्षक म्हणून जी अवस्था होते त्याच स्पिरीटमध्ये सोनू निगमही गाताना दिसतो.. आणि पाठीमागे आवाज असतो जेफरी बॉयकॉटचा. शारजातल्या वादळी मॅचची कॉमेण्ट्री करताना बॉयकॉट ज्या उत्तुंग, अत्यंत विस्मयकारी आवाजात सचिऽऽऽऽन तेंडुलकर असं म्हणतो तोच सारा माहौलही परत जागा होतो..वेड लावणारं आहे हे गाणं, आणि मुख्य म्हणजे सचिनला मिस करणाऱ्या तमाम जनतेला सचिनचं एक आगळं रूपही त्यात दिसतं. सचिन गाण्यांचा दिवाना आहे, तो प्रचंड म्युझिक ऐकतो. टेन्शनवाल्या मॅचच्या आधीही तो गाणी ऐकायचा हे आपण कितीदा ऐकलेलं आहेच..आता तोच सचिन स्वत: गातोय..त्या गाण्यातली एक ओळ आहे..एक लाऊडवाली शाऊट..तसाच एक लाऊड शाऊट सचिनसाठीही द्यावासा वाटतोच, पुन्हा एकदा!आता प्रश्न पडेलच की, कशासाठी गायला आहे सचिन?तर त्यानं एक स्वत:चा सोशल मीडीया प्लॅटफॉर्म तयार केला आहे..१०० एमबी असं त्याचं नाव.सचिन हा व्हिडिओ संपताना सांगतो की, माझ्याविषयी, खेळाविषयी, मी काय करतोय, काय म्हणतोय हे सारं समजून घेण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असावा असं मला वाटत होतं. त्यातून हा १०० एमबी प्लॅटफॉर्म सुरु करतो आहोत. तिथं माझ्याशी ‘कनेक्ट’ ठेवता येईल..सचिनशी कनेक्ट तर आहेच आपला, आता त्याचं हे गाणं आणि तो म्हणतोय ते पहायचं असेल तर ही सचिन तेंडुलकरनेच युट्यूबवर पोस्ट केलेली लिंक पहा..