शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

सलवार आऊटडेटेड होतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 3:00 PM

सलवार आता कुणी घालतं का? चुडीदार तर आउटडेटेडच झाली असं आताशा कुणीही सहज म्हणत पलाझो, सिगारेट पॅण्ट हे सारं ‘मॉडर्न’ म्हणून स्वीकारतं. पण सलवार-कमीज हा ट्रेण्ड आधुनिक झाला आणि आता काळाचा एक टप्पा ओलांडून पुढं निघाला. ही गोष्ट फक्त त्या पोषाखाची नाही तर आपल्या समाजातल्या बदलत्या धारणांचीही आहे.

ठळक मुद्दे ड्रेस वही, अंदाज नया!

- सारिका पूरकर-गुजराथी

भारतात प्रत्येक राज्यात स्त्रियांचे पारंपरिक पोषाख आढळतात. मात्र त्या सार्‍यांच्या पुढे जात सलवार कमीज अर्थात पंजाबी ड्रेस सार्‍या भारतभर तरुण मुली-महिला वापरू लागल्या. म्हणता म्हणता सार्‍या देशात सर्वदूर सलवार-कमीज हा पोषाख मान्यताही पावला. अंगभर, रुबाबदार आणि नजाकदार-सुंदरही म्हणून हा ड्रेस मिरवला. आपल्या मापाचा ‘पर्सनलाइज्ड’ असा ड्रेस शिवून घेणं अगदी कुणाच्याही आवाक्यातलंच होतं. आजही आहेच. पण म्हणता म्हणता देशभर छोटे-मोठे मॉल उभे राहिले. ऑनलाइन फॅशन्स थेट अ‍ॅपच्या रूपात आपल्या मोबाइल फोनवर आल्या. ऑनलाइन शॉपिंग करता आलं नाही तरीही त्या ऑनलाइन कपडय़ांचा समावेश विशलिस्टमध्ये होऊ लागला. एकेकाळी फॅशन म्हणजे जीन्स, टॉप्स, मिडीज अशी ओळख करून देणार्‍या फॅशन विश्वाने आता याच पंजाबी ड्रेसला अर्थात सलवार- कमीजला फॅशनचा नवा चेहरा म्हणून प्रचंड उचलून धरलं आहे. सलवार-कमीज या प्रकारालाच कण्टेपररी लूक देऊन मोठमोठे ब्रॅण्ड्स नवे कपडे मार्केटमध्ये आणत आहेत. प्रतिथयश डिझायनदेखील सलवार-कमीजमधील एलिगन्स पाहून त्यांच्या शोमध्ये सादर करण्यात चाचरत नाहीयेत. लॅक्मे फॅशन वीकमध्ये (विंटर)देखील नुकतेच राजेश प्रतापसिंग यांनी अंगरखा विथ झपी, पॅण्ट्स, जॅकेट्स या नवीन अवतारातील सलवार-कमीजच्या त्यांच्या कलेक्नला रॅम्पवर अलीकडेच सादर केले. तिकडे ‘जयपोर’ या डिजिटल फॅशन व लाइफस्टाइल ब्रॅण्डच्या प्रमुख शिल्पा शर्मादेखील म्हणताहेत की, काही वर्षापूर्वी डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये फक्त वेस्टर्न आउटफिट्सच सर्वत्न दिसायचे, आता मात्न जिकडे पाहाल तिकडे सलवार-कमीजचा नवा ढंग दिसून येतोय. अनेक बडे ब्रॅण्डदेखील वेस्टर्न व क्लासिक यांचा मिलाफ घालू पाहताय. ड्रेस वही, अंदाज नया असंच काहीसं सलवार-कमीजबाबत झालेलं दिसतंय.

सलवार नव्या रूपात का?गेल्या दशकभरात सलवार-कमीज-दुपट्टा या थ्रीपीसच्या पोशाखातील सलवार व दुपट्टा या दोन प्रकारात प्रामुख्यानं बदल झालेले आहेत. पैकी सलवार हा प्रकार इतिहासजमा होताना दिसून येतोय. सलवारऐवजी पलाझो पॅण्ट्स, स्ट्रेट कट पॅण्ट्स हा सध्या इन ट्रेण्ड आहे. कधी लेंथ तर कधी लाँग, कधी अ‍ॅसेममेट्रिक हेमलाइन तर कधी मल्टिलेअर्ड टोगा कुर्ता, त्यावर लेअर्ड जॅकेट हे पलाझो, स्ट्रेट कट पॅण्ट्सवर आता घातले जाऊ लागलेत. हा लूक म्हटलं तर मॉडर्न आहे, म्हटलं तर पारंपरिक!  * घडय़ाळाचे काटे पुन्हा उलटे फिरताना दिसताहेत. पूर्वीचा कळीदार कुर्ता, अंगारखा याचंच हे रिन्यू केलेलं, रिइन्व्हेण्ट केलेलं रूप आहे. पलाझो हा तर इतका प्रचंड हिट ट्रेण्ड आहे की लग्नसमारंभ, डेटिंग, कॉर्पोरेट मीटिंग्ज, आउटिंग अशा कोणत्याही प्रसंगासाठी आता पलाझो वापरले जाऊ लागलेत. स्ट्रेट कट, प्लेयर्ड, लेयर्ड, प्लीटेड, टायअप हे पलाझोचे प्रकार कॉटन, डेनिम, लायक्र ा, कॉटन सिल्क या फेब्रिकमधील पलाझो इन आहेत. * पलाझोबरोबरच स्कर्ट-कुर्ती हादेखील नवा लूक इन आहे. घेरदार स्कर्टवर लॉँग कुर्तीचा ट्रेण्ड करीना कपूरने आणलाय. तिकडे दुपट्टाही आता काळाच्या ओघात नवा साज लेऊन आलाय. स्कार्फआणि स्टोल्स हे त्याचं नवं रूपडं खूपच हिट झालं आहे. असंख्य डिझाइन्समधील, पोतामधील हे स्टोल्स व स्कार्फ  जीन्स-टॉप, पलाझो-कुर्ती, लेगीन्स-कुर्ती अशा कोणत्याही पेहरावावर भाव खाऊन जाताना दिसताहेत. * जोडीला जॅकेट्सही आले आहेत. जॅकेट घातल्यावर दुपट्टय़ाचं काम उरतच नाही. कमीजमध्येही प्रचंड बदल झाले आहेत. मलमल अंगारखा ते ब्रोकेड कुर्ती, रॉ सिल्क कुर्ती, खादी कुर्ती, डेनिम कुर्ती, क्रे प कुर्ती, क्र ॉप टॉप असा कापडाचा पोत   डिझाइन्सनुसारही बदल पाहायला मिळत आहेत.  ब्लॉक प्रिंट कुर्ती, प्लेन कुर्ती, ब्रोकेड हे तर एव्हरग्रीन प्रकार सध्याही इन आहे.

 हा बदल कशामुळे?

* एक तर 90चं दशक महत्त्वाचं ठरलं. आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळात फॅशन विश्वानंही कूस बदलली. महिलाही स्थानिक ब्रॅण्ड्सबरोबर इंटरनॅशनल ब्रॅण्ड्स, ट्रेण्ड्स हे सारं फॉलो करू लागल्या. साहजिकच याच काळात सलवार-कमीजचे कण्टेपररी पण तरीही नवनवीन ट्रॅडिशनल लूक बाजारात येत राहिले. त्याकाळात आलेल्या सिनेमांनीही सलवार-कमीज या पारंपरिक पोशाखात अनेक बदल केले. विशेषतर्‍ दिल तो पागल है चित्रपटातले माधुरी दीक्षितचे ड्रेस आणि प्यार किया तो डरना क्या सिनेमातले काजोलचे ड्रेस एका अर्थानं ट्रेण्डसेटर ठरले.  याच काळात नोकरदार तरुणींची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली. त्यांना सुटसुटीत पण रीही स्टायलिश वाटेल असा पेहराव हवाच होता. सलवार-कमीज-चुडीदारने त्यातही वैविध्य दिलं. ‘कम्फर्ट’ हा मुख्य क्र ायटेरिया लावत हा पोषाख त्यांनी चटकन स्वीकारला. पुढे बॉलिवूडने सलवार-कमीजला ‘चुडीदार’ रूपात रु पेरी पडद्यावर आणलं. खरं तर एकेकाळी प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानू आथिया यांनी 1960 च्या वक्त चित्नपटात साधना यांना अगदी टाइट, शॉर्ट कुर्ता व तितकीच टाइट फिटिंगची चुडीदार पॅण्ट या पेहरावात सादर केलं.  रातोरात साधना व चुडीदार दोघंही हिट झाले. नंतर मग मुमताज, आशा पारेख या कायम चुडीदारमध्येच दिसल्या. या चुडीदारआधी ‘ स्लॅक्स ‘ हा प्रकार लोकप्रिय झाला होता. मात्न चुडीदार हा प्रकार सर्रास शिवून घेतला जाऊ लागला. 80-90 च्या दशकात भाग्यश्रीने मैने प्यार किया मधून पॅडेड, लाँग स्लीव्हज, शॉर्ट विथ टाइट फिटिंग कुर्ती व चुडीदार दोनही लोकप्रिय केले. 2000 च्या दशकात मै अपनी फेविरट हूँ म्हणणार्‍या गीत अर्थात करिना कपूरने जब वुई मेटमध्ये ट्रेनमध्ये घातलेली पतियाला सलवार व टी-शर्ट असा हटके अंदाज लोकप्रिय केला. सलवारवर कुर्तीच घातली पाहिजे हा नियम तिनं मोडित काढला. करिनाप्रमाणेच अनुष्का शर्माचा मिक्स अ‍ॅण्ड मॅच हा फंडादेखील बॅण्ड बाजा बारात या सिनेमामुळे हिट झाला, तर शर्ट कुर्ती व पतियाला सलवार हा ट्रेण्ड बोल बच्चन चित्नपटामुळे इन झाला. नंतर पिकू चित्नपटात दीपिका पदुकोणने घातलेली पलाझो काय आली बाजारात, सर्व चित्नच बदलून गेलं. आता सलवारला सगळ्यांनीच बाय बाय करायचं ठरवलं आहे. आणि चुडीदारलाही. कारण लेगीन्स, जेगीन्स आल्या आहेत. सिगारेट पॅण्ट, अँकल लेंथ लेगीन्सही आल्या. सलवारचा काळ संपला अशी चर्चा सुरू झाली.अर्थात फॅशनचं वतरुळ गोल फिरतं, त्यामुळे सलवार कालबाह्य होणार नाहीच, येईलच पुन्हा फॅशनच्या चक्रात. सजधजके!