-निकिता बॅनर्जी
पाऊस आणि कॉलेज. एकाचवेळी सुरू होतात. दरवर्षी वाटतं, यंदा नव्यानं सुरुवात करायची. भरभरून पाऊस जगायचा आणि कॉलेजमध्ये जाताना पावसासोबत बदलून टाकायचा आपला लूक. मात्र अनेकदा हे जमत नाही. त्याचं कारण असं की आपलं प्लॅनिंग मोठं शानदार आणि जबरदस्त असतं, प्रत्यक्षात घोळ होतो तो अंमलबजावणीचाच. लोकशाही देशात, आपलं सरकार जसं करतं तसंच आपणही. प्लॅनिंग उत्तम, अंमलबजावणी आणि सातत्याची बोंब. सरकारचं जाऊदेत, निदान आपण तरी फार मोठे क्रांतिकारी बदल स्वतर्त एका रात्री करण्याचे स्वपA पाहण्यापेक्षा अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी करू. अगदी छोटय़ा. वाचताना वाटेल की, हे काय सहज जमेल. तर ते सहज जमावं असंच आहे, फक्त ते नियमित जमवलं तर आपला लूकच नाही तर पर्सनॅलिटीही जरा वेगळी भासेल. इंग्रजीत म्हणतात ना, गेट द राइट अॅटिटय़ूड. तसंच. राइट अॅटिटय़ूड तेवढा हवा.तर यंदा या पावसाळ्यात आपण 5 गोष्टी करायच्याच नाहीत असं ठरवू. पावसाळा संपेर्पयत अगदी व्रत घेतल्यासारखं आपण हा ‘नो’ मोड ऑन ठेवू.
Say NO
या पाच गोष्टींना पावसाळ्यात आणि कॉलेज सुरू होताना एकदम ‘नाही असं स्पष्ट ठणकावून सांगा. म्हणा, नो मिन्स नो.तसं केलं तर आपोआप आपण गर्दीत उठून दिसू + आपलं आरोग्यही उत्तम राहील.
1) नो जीन्स.
पहिलं नाव आपल्या निळ्या-काळ्या जीन्सचंच घ्यावं लागेल. जीन्सशिवाय तर आपलं पान हलत नाही. आपण कुठंही जायचं असो जीन्स घालतो. पण पावसाळ्यात घालू नका. कॉलेजला जाताना जिन्स घ्यायचीच म्हणून घरी भांडू नका. ती खरेदी हिवाळ्यात करू. आता कॉटन पॅण्ट्स, स्कर्ट किंवा सरळ पारंपरिक सलवार घालणं उत्तम. पावसाळ्यात जीन्स भिजल्या की लवकर वाळत नाही. त्यात गारवा. वर्गात ओल्या जीन्स घालून का बसा. म्हणूनच जीन्स नको. त्यामुळे पावसाळ्यात होणारे त्वचाविकारही आपण टाळू शकू.
2) नो हाय हिल्स
3) नो लेदर
लेदरच्या महागडय़ा पर्स घेण्याची अनेकांना हुक्की येते. पावसाळ्यात ती बाजूला ठेवणं उत्तम. एकतर प्लॅस्टिकबंदी, त्यामुळे आतल्या वस्तू तुम्ही प्लॅस्टिकमध्ये ठेवू शकत नाही. त्यात या बॅग भिजल्या तर आतलं सामान भिजतं. त्यामुळे सरळ वॉटरप्रूफ बॅगपॅक घ्या. त्या युनिसेक्स असतात. त्यामुळे कुणी कुठल्याही रंगाची घेतली तर चालते. बॅगला नकार आणि सॅकचा स्वीकार हा उत्तम पर्याय.
4) नो-काळी छत्री
5) नो गिजमो शो ऑफ
काय घाला? काय टाळा?
*या पावसाळ्यात जमेल तितके ब्राइट आणि बोल्ड रंगाचे कपडे वापरा.* छत्री, जॅकेट, चपला हे सारे रंगीबेरंगी, जमल्यास फ्लोरोसण्ट वापरायला हवं.* प्लीप फ्लॉप/रबरी स्लिपर अजिबात वापरू नयेत.* त्याऐवजी कलरफुल क्रॉक्स वापरणं उत्तम.
यंदाच्या पावसाळ्यात जरुर वापरावेत असे रंग.
हल्ली अमुक रंग पुरुषांचा, तमुक बायकांचा असं काही उरलेलं नाही. त्यामुळे युनिसेक्स कलर सगळेच वापरू शकतात. अगदी पिंकही मुलं वापरू शकतात. त्यामुळे अमुक रंग कसा वापरायचा हे डोक्यातून काढून टाका.1) पिवळा- आणि पिवळ्या रंगाच्या सर्व छटा.2) कुंकू रंग. म्हणजे कुंकवाचा असतो तो रंग3) गुलाबी रंगाच्या सर्व छटा4) सी ग्रीन कलरच्या सर्व प्रसन्न छटा