शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

व्यायामाचा सिझनल झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 9:00 AM

थंडीची पावलं वाजायला लागली की, अनेकजण ठरवतात यंदा जिम लावायचंच. व्यायाम करायचाच. मात्र काहींचा उत्साह आळस खाऊन टाकतो, तर काहींच्या चुकांमुळे तब्येत सुधारण्याऐवजी बिघडतेच. असं का होतं? नेमकं काय चुकतं? जिम लावण्यापूर्वी काही गोष्टी हाताशी ठेवा म्हणजे फिटनेसचा हात सुटणार नाही!

- चिन्मय लेले- ओंकार करंबेळकर

थंडीची पावलं जरा वाजायला लागली की अनेकांना वाटतं, यंदा जिम लावायचंच. अशी तब्येत बनवू की बोलायचं काम नाही ! काहीजण इथंही आळस करून १ जानेवारीचा मुहूर्त काढून ठेवतात आणि गुलाबी थंडीत तोंडावर पांघरूण घेऊन झोपतात. पण बऱ्यापैकी लोक थंडीत जरा तरी तब्येतीला सिरीयसली घेऊ लागतात. तसा हा वार्षिक कार्यक्रम दरवर्षी होतो. फिटनेस किती वाढतो हा प्रश्न मात्र तसाच राहतो.

खरंतर आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी एकमेव मोफत पर्याय म्हणजे व्यायाम. चालणं, फिरणं, पळणं यासाठी एक छदामही मोजावा लागत नाही. पण तसं न करता आपल्या फेवरिट हिरो-हिरोइन्ससारखी फिगर किंवा बॉडी बनवण्याचे डोहाळे लागतात. आजूबाजूचे शेजारपाजारी किंवा मित्र कोणीतरी जिमला जात असतंच, त्यामुळे त्यांचा सल्ला घेत जिमला जायची घाई होते. मग जिम लावायचं तर आधी व्यायामाचे कपडे, शूज, पाण्याची बाटली वगैरेची खरेदी होते. साधारणपणे महिनाभर हा उत्साह सुरु राहतो. सकाळी तासभर जिममध्ये जायचं. हेल्दी फूडच्या नावाखाली घरीही प्रयोग केले जातात. मी जिम जॉइन केली हे बऱ्यापैकी सगळ्यांना सांगून होतं. फेसबुकवर फोटो, सेल्फी, स्टेटस टाकले जातात. व्हॉट्सअ‍ॅपवर जिमचा फोटो आणि 'डोण्ट डिस्टर्ब', 'इन अ मीटिंग', 'बॅटरी लो' प्रमाणे 'अ‍ॅट जिम' असा कायमस्वरूपी स्टेटस टाकून दिला जातो. पुरेपूर प्रसिद्धी करून झाल्यावर हळूहळू महिनाभरामध्येच जिममधले हे मशरुम एकेक करून गायब व्हायला लागतात. मग एक दिवसाआड, कधी आठवड्यातून दोनदा, मग एकदाच असं करत जिमला जाणं बंद होतं. बर 'अरे ! काय सांगू वेळच मिळत नाही जिमला जायला' हे सर्वांचं आवडतं सुरेख कारण मदतीला येत असतंच.

अशा तात्पुरत्या काळासाठी जिमला जाण्याची खरी कारणं आपल्याच आळसामध्ये असतात. मला चार-पाच दिवसांमध्ये माझ्या शरीरामध्ये बदल हवे असतात. ज्या लोकांना पाहून आपण जिममध्ये येतो तसं आठवडाभरात आपल्याला व्हायचं असतं. महिनाभर इकडेतिकडे वजनं उचलूनही काही झालं नाही की मग सरळ तेच बंद करून टाकण्याचा सोपा उपाय निवडला जातो. पण व्यायाम हा तितका सरळ आणि स्वप्न तत्काळ साध्य करून देणारा नसतो. ज्या लोकांना आदर्श मानून आपण व्यायाम करायला लागता त्यांनी काही वर्षे घाम गाळला आहे या सत्याकडे आपण पुरेपूर दुर्लक्ष करतो. व्यायाम टाळण्याची एकेक कारणं सुचायला लागतात आणि व्हायचं तेच होतं. पहाटे डोक्यावर घेतलेलं पांघरूण आपल्याला सुदृढ शरीरापासून लांब ठेवायला लागतं.

काहीजण म्हणतात 'जिम सोडली की माणूस जाड होतो'. पण व्यायाम करायचा तर जिमलाच जायला हवं हे कुणी सांगितलं? व्यायाम हा काहीच दिवस करायचा आणि मग थांबवायचाच आहे असं आपण मनाशी ठरवलेलं असतं. रोजची झोप, जेवण, खाणं यांच्याप्रमाणे व्यायाम हा चांगल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं आपल्याला का वाटत नाही? व्यायामाचा असा सिझनल झटका का येतो आपल्याला? वेळ नसण्याचं कारण सांगून आपलं क्षणिक समाधान होऊ शकतं पण त्यातून आपलंच नुकसान होतं हे आपल्या लक्षात यायला हवं.

काहीजण इथवर तरतात. पण आपली बेस्ट बॉडीची मोठी स्वप्नं कमीत कमी कालावधीत पूर्ण व्हावीत म्हणून झटतात. त्यात त्यांना धोका संभवतो तो फुकट सल्ले देणाऱ्यांचा. मसल्स कमवायचे म्हणजे तुला प्रोटिन्सचे डबेच्या डबे संपवावे लागतील, औषधे, गोळ्या, इंजेक्शने घ्यावी लागतील असा सल्ला जिममध्ये कोणी दिला तर तो धोक्याचा इशारा आहे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांना भेटून सल्ला घेणंच महत्त्वाचं. आपलं वजन, उंची, जीवनशैली, कामाचं स्वरूप, आहार याचा विचार करून कोणता व किती व्यायाम करावा याबाबत तेच सर्वात शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करू शकतात. पण हे न करताच रंगीबेरंगी डब्यांवर पिळदार बाहूंच्या पोरी-पोरांचे फोटो पाहून त्यातल्या पावडरी घ्यायला अनेकजण सुरुवात करतात, ते जिवावर बेतू शकतं.हे सारं बहुसंख्य जनतेच्या बाबतीत होतं, यंदा तुमच्याही बाबतीत होणार का? तपासून पाहा. हा सिझनल झटका टाळून व्यायाम सिरीअस घ्या.. उगीच जिवाशी खेळ नको.

जरा सिरीयसलीच घ्यायचं आता स्वत:ला, असं म्हणत थंडीत जिम लावताय तुम्ही?

- चांगली गोष्ट आहे. पण हा सिझनल झटका आणि आवेश टाळा. आणि व्यायाम ही गोष्ट आणि तब्येतीची काळजी ही भावना आपण आयुष्यभरासाठी स्वीकारतोय हे मनात पूर्ण रुजवा. मगच जिमची पायरी चढणं उत्तम. परफेक्ट बॉडी किंवा परफेक्ट फिगर हे भुलावे असतात. त्यासाठी जिम लावणार असाल तर तो एक चकवा आहे हे आपल्याला माहिती असलेलं बरं !त्यामुळे यंदा जिम लावणार असाल तर या चुका नक्की टाळाच..

१) सोशल पोस्टर बंदम्हणजे काय तर जिम लावलं हेच गावभर सांगायचं. त्यात फोटो काढायचे. फेसबुकवर टाकायचे. त्याचीच चर्चा. व्यायाम कमी तोंडाचा व्यायामच जास्त. त्यात काहीजण तर जिममध्ये दोस्ती करतात. जिमबडीचं हे नवीन फॅड. तिथंच गप्पा मारतात. हे सगळं बंद करा, त्यानं व्यायामावरचा फोकस हलतो.

२) फोकस काय तुमचा?व्यायाम हाच फोकस हवा. तो सोडून कपडे, जिम अ‍ॅक्सेसरी सोशल मीडिया शो ऑफच जास्त. आपण जिम लावलंय, व्यायाम करतोय याचीच नशा इतकी की त्यात मुख्य व्यायाम करणंच राहून जातं.

३) फॅट बर्निंग झोनकाहींना आपण किती कॅलरी जाळल्या याचंच अप्रूप जास्त. सतत मोजतात. कमी खातात. हा सारा मूर्खपणा आहे हे एकदा स्वत:ला सांगून टाका.

४) कार्डिओचा अतिरेकमी कार्डिओपण घेतलंय हे अनेकजण फार कौतुकानं सांगतात. त्या कार्डिओ मशीनच्या भुलाव्यात अडकू नका. ट्रेनर सांगतो तेवढाच कार्डिओ करा. आपण पैसे मोजलेत म्हणून वाट्टेल ते प्रयोग स्वत:वर करू नका.

५) ट्रेडमिलवर किती धावाल?जे कार्डिओचं तेच ट्रेडमिलचं. अनेकजण त्यावर इतके धावतात. का तर आपण पैसे मोजलेत, लवकर फिगर/बॉडी कमवायची आहे. तसं करू नये. ट्रेडमिलवर चालण्यापेक्षा जरा बाहेर मोकळ्या हवेत चाला.

६) बदला प्रोग्रॅमकाहींना चार दिवसात वाटतं की आपण जो व्यायाम प्रोग्रॅम घेतलाय तो काम करत नाही. रोप उपटून मुळं किती वाढलीत पाहण्याचा हा प्रकार. त्यामुळे तसं करू नये. निदान महिनाभर तरी कुठलाच प्रोग्रॅम बदलू नये.

७) स्पॉट रिडक्शन ट्रेनिंगहा शब्द जिमवाल्यांच्या जगात हीट आहे. दंड/ पोट/ पाय यांच्यावरची अतिरित चरबी कमी करण्यासाठी असे स्पॉट रिडक्शन ट्रेनिंग दिलं जातं. तसं करणं तब्येतीला फारसं चांगलं नाही. संतुलित व्यायाम करणंच उत्तम.

८) ट्रेनर सर्टिफाइड आहे का?ट्रेनरचं प्रमाणपत्र पाहा, त्याला काय येतं हे तपासा. ते न करता कुठल्याही स्वस्तातल्या जिममध्ये जाऊन वाट्टेल ते व्यायाम करणं बरं नव्हे.

९) तासन्तास जिमपैसे मोजलेत ना, म्हणून मग काहीजण तासभर सोडून दोन दोन तास जिममध्ये व्यायाम करतात. त्याला जिम मारणं म्हणतात. असं जिम मारू नका. आठवड्यातून तीन किंवा फार तर चार दिवस जिममध्ये व्यायाम करणं पुरतं. व्यायामात आरामही तितकाच महत्त्वाचा आहे.

१०) प्रोटिन पावडरींना नाही म्हणाकुणी कितीही आग्रह केला तरी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय प्रोटिन पावडरी घेऊ नका.