-ऑक्सिजन टीम
हुंडाबळीच्या बातम्या तशा आपल्या समाजात नव्या नाहीत, हुंडय़ासाठी लेकीसुनांच्या जीवावर उठणारे कर्दनकाळ आजही आपल्या समाजात आहेतच. त्या छळाला कंटाळून आत्महत्या करणार्या मुलींचा खरंतर खूनच पडलेला असतो. मात्र त्याला आत्महत्या म्हंटलं जातं. हैद्राबादच्या अंजूमने हुंडय़ाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करताना एक सेल्फी व्हिडीओ शूट करुन ठेवला.
लगAानंतर जेमतेम दोन महिन्यात तिच्यावर ही वेळ ओढावली. आणि तिच्या आत्महत्येची नोंदही ‘सेल्फी सुसाईड’ नावाच्या एका भलत्याच कॅटेगरीत नोंदवली जाईल.
गेल्या काही दिवसात भारतातच नाही तर जगभरात अशा काही घटना घडत आहेत. ज्यात आत्महत्येच्या शेवटच्या क्षणी अनेकांनी सेल्फी फोटो तरी काढले, ते इतरांना पाठवले किंवा व्हिडीओ तरी शूट केले.
स्वतर्ला संपवण्यापूर्वी त्यांना जगाला काहीतरी सांगायचं होतं कदाचित.
हैद्राबादच्या अंजून फैजानचं जानेवारीत लगA झालं होतं. आईवडिलांच्या घरी तिनं स्वतर्ला छताला टांगण्यापूर्वी एक सेल्फी व्हिडीओ शूट केला, आणि म्हणाली, सॉरी!
पुण्याच्या एका तरुणानं चादरीनं स्वतर्चा गळा आवळताना एक फोटो काढला आणि शेजारच्याच खोलीत असलेल्या आपल्या मित्रांना पाठवला.
आणि मुंबईत फाईव्हस्टार हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरुन उडी मारताना एका तरुणानं आत्महत्या कशी करायची याचं फेसबुक लाईव्ह स्ट्रिम केलं.
कुणी मरण्यापूर्वी आपल्या बायकोबरोबर सेल्फी काढतोय, कुणी मुलांबरोबर तर कुणी स्वतर्चाच फोटो वेगळ्या अॅँगलबरोबर. अमेरिकेसह युरोपातही गेल्या काही दिवसात या घटना घडल्या.
आत्महत्या करताना सेल्फी काढणं, आपलं जाणं असं रेकॉर्ड करणं या सार्याची नोंद सेल्फी सुसाईड या शब्दात घेण्यात येवू लागली. तिकडे अमेरिकेत तर फेसबूकने एक हेल्पलाईन सुरु केली. आणि जगभर डिप्रेशनविषयी बोला म्हणून चळवळ सुरु झाली.
हे सारं कुठं चाललं आहे?
मरताना सुद्धा मन मोकळं करावं असं कुणी आपल्याला भेटू नये, या भावनेचं काय करायचं?
आपल्याला पुन्हा कदाचित जुन्याच वाटेनं जावं लागेल, बोलावंच लागेल माणसांशी, भरुभरुन प्रेम करावं लागेल जगण्यावर.
आपल्या जगण्याचा सेल्फी सुंदर असावा, त्यात सुसाईड नावाची काळी सावली कशाला हवी दबा धरुन बसलेली.?