शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

संवेदना ते सृजनशीलता

By admin | Published: January 07, 2016 10:14 PM

नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित डॉ. एपीजे अब्दुल कलाम ‘इग्नाइट’ इनोव्हेशन स्पर्धेच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तरुण मुलांना संबोधित केले.

-  प्रणव मुखर्जी, माननीय राष्ट्रपती

तरुण पिढीला आता न सुटणा:या, 

जटिल वाटणा:या समस्यांसोबत 
जगायचं नाही. 
त्यांना आपले प्रश्न सोडवायचे आहेत, 
तोडगे हवे आहेत आणि
त्यासाठी ते स्वत: उत्तरं शोधत 
नवनिर्मितीची वाट चालत आहेत.
 
नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित डॉ. एपीजे अब्दुल कलाम ‘इग्नाइट’ इनोव्हेशन स्पर्धेच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तरुण मुलांना संबोधित केले. त्या भाषणाचा हा संपादित अनुवाद
 
इनोव्हेशन.
नवनिर्मिती ही आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक किल्ली आहे. आपल्या समाजात, राष्ट्रात निर्माण होणा:या गरजांना, आव्हानांना आपण कसा प्रतिसाद देतो, त्यावर काय तोडगे काढतो यावर राष्ट्र म्हणून आपली परिपक्वता दिसते. 
नवनिर्मिती ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक पावलावर, प्रत्येक पायरीवर तिचं भरणपोषण व्हायला हवं. आणि त्या प्रक्रियेला पाठबळही मिळायला हवं. ही गरज लक्षात घेऊनच राष्ट्रपती भवनात मार्च 2015 मध्ये नॅशनल इनोव्हेश फाउंडेशनच्या सहकार्यानं नवनिर्मिती महोत्सव भरवण्यात आला होता. भारतातल्या सुदूर भागात राहणा:या, खेडय़ापाडय़ातल्या, वयानं लहान असणा:या पण नवोन्मेषशाली मनाच्या कल्पक मुलांनी त्यात सहभाग घेतला. यावर्षीही मार्चमधे असा महोत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. 
कल्पक विचार करणा:या, भन्नाट काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करणा:या मुलांनी जरूर या महोत्सवात सहभागी व्हावं!
यापुढच्या काळात आपल्या समाजासाठी ‘इनोव्हेशन’ अर्थात नवनिर्मिती हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र ठरणार आहे. उच्च शिक्षण आणि उद्योगसंस्था यांचं एक उत्तम नेटवर्क तयार होऊन समाजात वेगळे प्रयोग करणा:या कृतिशील कल्पक मुलांना संधीही मिळायला हवी. तळागाळात, खेडय़ापाडय़ात जी मुलं अनेक प्रयोग करतात, आपल्या गरजांपोटी काही उपकरणं, अवजारं बनवतात, वेगळा विचार करत समस्येवर तोडगा काढतात त्या शिक्षण घेणा:या मुलांना उद्योगांनी स्वत:शी जोडून घ्यायला हवं. त्या कल्पक इनोव्हेशनचा उपयोग मोठय़ा प्रमाणात, व्यावसायिक तत्त्वावर कसा करता येईल याचाही उद्योगांनी विचार करायला हवा. देशातल्या 114 मध्यवर्ती संस्थांना मी असं सांगितलं आहे की, शिक्षण आणि उद्योग अंतरसंबंध प्रस्थापित व्हावेत. त्यातून अनेक नवनिर्मितीचे प्रयोग, अनेक उपक्रम थेट बाजारपेठेशी जोडले जाऊ शकतील. 
नवर्निमिती करू पाहणा:या तरुण हातांची आज देशात कमतरता नाही. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनकडे ‘इग्नाइट-2015’ या स्पर्धेसाठी देशभरातून 28 हजार अर्ज आल्याचं मला कळलं. भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना या सृजनशील मुलांनी ख:या अर्थानं विज्ञाननिष्ठ आदरांजलीच वाहिली असं म्हणायला हवं. डॉ. कलामांनी नेहमी लहान मुलांची मनं प्रज्वलित केली, त्यांना प्रेरणा दिली. आज त्याच वाटेवर चालण्यासाठी ही मुलं तयार होत आहेत. 
या सगळ्या इनोव्हेशन्सचं प्रदर्शन पाहताना माङया लक्षात आलं की, अनेक प्रयोग, इनोव्हेशन हे आपल्या विकसनशील समाजाच्या गरजांवर शोधलेले तोडगे आहेत. समाजातील म्हातारी माणसं, लहान मुलं, अपंग या घटकांच्या समस्या कमी व्हाव्यात म्हणून किती बारकाईनं विचार करून या मुलांनी आपले प्रयोग सुचवले आहेत. या मुलांनी आणखी एक गोष्ट सिद्ध केली आहे, ती म्हणजे नवनिर्मितीची ही आस, ही ऊर्मी सर्व प्रकारचे भेदाभेद नष्ट करते आणि अमर्याद उत्साही शक्यता आणि उमेद यांसह नवीन क्षितिजं शोधू लागते. 
या सा:या प्रयोगांकडे पाहून आपल्या देशाच्या भवितव्याविषयी आणि तरुण पिढीविषयी मला अत्यंत आशादायी वाटतं आहे.
आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जाणवते आहे ती म्हणजे तरुण पिढीला आता न सुटणा:या, जटिल वाटणा:या समस्यांसोबत जगायचं नाही. त्यांना ते प्रश्न सोडवायचे आहेत, तोडगे हवे आहेत आणि त्यासाठी ते स्वत: उत्तरंही शोधत आहेत.
या सा:या नवनिर्मितीच्या प्रयोगांमध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची दिसते आहे. या मुलांनी जे प्रयोग केले आहेत, जे तोडगे सुचवले आहेत त्यात समाजासाठीची सहवेदना, संवेदना दिसते आहे. हे सगळे तरुण क्रिएटिव्ह मुलं ‘संवेदना ते सृजनशीलता’ या एका सूत्रनं जोडले गेले आहेत, त्यांचे सारे प्रयोग त्याच भावनेतून आकार घेत आहेत.  
भारत हा 120 कोटी सृजनशील मनांचा देश आहे. या कोटय़वधी सृजनशील मनांतून उठणा:या ऊर्मीचा जर विधायक कामांसाठी उपयोग झाला तर भारतीय समाजाचे अनेक प्रश्न, अनेक समस्या सुटतील. आज ज्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत त्या समस्या उद्या कदाचित या सृजनशील वाटेवर सुटलेल्याही असतील.
पण त्यासाठी या देशात राहणा:या आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट करावी लागेल. 
स्वत:ला निष्ठेने या देशाप्रती समर्पित करत देशाचे, समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून काम करावं लागेल. प्रश्नांसोबत जगणार नाही, तर सर्वासाठी त्या प्रश्नाचं उत्तर शोधीन असं म्हणून नवनिर्मितीची विधायक वाट निष्ठेने चालावी लागेल!
तरुण प्रज्वलित मनं आपल्या देशासाठी, उज्‍जवल भविष्यासाठी आणि समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी ही वाट नक्की चालतील याची मला खात्री आहे!
जय हिंद!!
 
 
 
‘‘सर्वसमावेशक विकास ही फक्त एक घोषणा असू नये. आपल्या शाश्वत विकासाच्या प्रवासात सगळ्यांचा सहभाग आणि त्यातून होणारी सगळ्यांची भरभराट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.’’
 
‘‘आपल्याकडच्या नावाजलेल्या उच्चशिक्षण संस्थांनी तळागाळातल्या अत्यंत छोटय़ा पण वेगळ्या, नवनिर्मिती करणा:या कल्पनांना व्यासपीठ देत त्यांचं भरणपोषण करत मार्गदर्शन करायला हवं; तर नव्या कल्पना, विचार आणि कृती यांना प्रोत्साहन आणि पाठबळही मिळेल!’’
 
‘‘नॉलेज आणि इनोव्हेशन. राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक असे हे दोन स्तंभ आहेत. त्यांच्या भोवतीनं जर मेहनतीनं काम केलं तर 21व्या शतकात राष्ट्र समृद्धी आणि विकास यांची कास धरू शकेल!’’
 
‘‘ज्ञान आणि सृजनशीलता, नावीन्याची ओढ आणि आस, त्यासाठीची व्यवस्था हे सारं जर आपल्या तरुण मुलांना मिळालं तर त्यांचं भवितव्य झळाळून निघेल आणि वेगानं जागतिकीकरण होणा:या जगात या तरुण मुलांना आघाडी घेता येईल असं वातावरण आपण तयार करू शकू.’’
 
‘‘विज्ञान आणि शिक्षण, संशोधन आणि नवनिर्मिती या चार गोष्टींभोवती विकास आणि कार्यसंस्कृती यांची वीण पक्की होती. राष्ट्राच्या विकासासाठीही या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत.’’