- डॉ. यशपाल गोगटे
उंची व वाढीसाठी ग्रोथ हार्मोन गरजेचं असतं. उंची एका विशिष्ट वयानंतर स्थिर होते; पण वाढ मात्न कायम चालू असते. या वाढीसाठी जबाबदार असलेले सहायक हार्मोन्स म्हणजे सेक्स हार्मोन्स. मानवी शरीरात तीन मुख्य सेक्स हार्मोन्स असतात. टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. हे हार्मोन्स पुरुषांमध्ये वृषणात व स्त्रियांमध्ये बीजकोषात तयार होतात. याशिवाय अॅड्रिनल ग्रंथीतूनदेखील काही सेक्स हार्मोन्स तयार होत असतात, हे हार्मोन्स अत्यल्प असले तरी गरजेचे असतात. पिटय़ूटरीमधील एफएसएच, एलएच, आणि प्रोलॅक्टिन हार्मोन्स हे वृषण व बीजकोषातील हार्मोन्सवर नियंत्नण ठेवतात. पिटय़ूटरी- वृषण व बीजकोषातील हार्मोन्सची परस्परावलंबी असलेली ही प्रणाली शिस्तबद्ध रीतीनं शरीरात कार्यरत असते.इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्यानं स्त्रियांमध्ये कार्यरत असणारे हार्मोन्स आहेत. स्त्रियांमध्ये स्तनांचा विकास, बीजकोष व गर्भाशय याची वाढ, पाळीची नियमितता व गर्भधारणा या सगळ्यांसाठी महत्त्वाची भूमिका निभावणारे हे हार्मोन्स आहेत. मुख्यत्वे स्त्रियांमध्ये आढळणारे हे हार्मोन्स पुरुषांमध्येदेखील हाडांच्या बळकटी करता गरजेचे असतात. इस्ट्रोजेन या हार्मोन्समुळेच स्त्रियांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण कमी असते. स्त्रियांच्या विशिष्ट स्वभावाकरतादेखील हे हार्मोन्स जबाबदार असतात. डोक्यावरील केस हे या हार्मोन्सच्या कृपेनं वाढत असतात. पुरुषार्थाशी निगडित असलेले हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉन. मुलांमध्ये वयात येतानाचे बदल या हार्मोन्समुळे घडत असतात. डोक्याचा भाग सोडून इतर शरीरावरील केसांची वाढ टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्समुळे होत असते. पण या हार्मोन्समुळेच पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण अधिक असते. स्नायूंची वाढ व शरीराचा एकूण दणकटपणादेखील टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्समुळेच येतो. पण या हार्मोन्सची नकारात्मक बाजू म्हणजे एकूणच पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळणारा हृदयरोग, ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अप्नोआ व स्ट्रोक यासारखे आजार. खेळाडू व बॉडी बिल्डर या हार्मोन्सचा जास्त प्रमाणात गैरवापर करतात. मात्र त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्याचे अतिरिक्त सेवन टाळावे.पिटय़ूटरीमधील एफएसएच, एलएच हे सेक्स हार्मोन्सवर नियंत्नण ठेवतात. त्यामुळे शरीराची अपेक्षित वाढ होण्यास मदत होते. हे हार्मोन्स पाळीची नियमितता ठेवतात व पुरुषांमध्ये शुक्र ाणूंची निर्मिती करतात. प्रोलॅक्टिन हे स्तनांच्या वाढीकरिता व गर्भधारणेच्या काळात दूध निर्मितीकरता जबाबदार असते. खरं तर ही सारी यंत्रणा उत्तम काम करत असते. अचूकही असते. पण तरीही या नियमितपणे चालणार्या प्रणालीमध्येही गडबड होऊच शकते. ती गडबड होते तेव्हा काय होतं हे आपण पुढील लेखांमध्ये बघू.