शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हो!! रशियन बांधणीची INS तुशिल युद्धनौका भारताला सुपूर्द; सागरी सामर्थ्य आणखी वाढणार!
2
‘‘आपण बिहार-बंगालवर कब्जा कराल तर आम्ही काय लॉलीपॉप खाणार का"? ममतांनी बांगलादेशला फटकारलं
3
कर्नाटक विधानसभेतील वीर सावरकरांची प्रतिमा काढण्याचा निर्णय; भाजपा आक्रमक, काँग्रेसवर टीका
4
One Nation, One Election : 'वन नेशन वन इलेक्शन'साठी केंद्र सरकारची मोठी तयारी, अधिवेशनात विधेयक आणू शकते!
5
लग्नानंतर १० दिवसांनी नववधू बॉयफ्रेंडसह ८ लाखांचे दागिने, २ लाखांची कॅश घेऊन फरार
6
मोठी बातमी: महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार?; नियमांबाबतची महत्त्वाची माहिती समोर
7
संजय मल्होत्रा होणार RBI चे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला पदभार स्वीकारणार
8
जगदीप धनखड यांच्याविरोधात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणणार, सपा-टीएमसीचा पाठिंबा
9
चुकीला माफी नाही! ICC कडून ट्रॅविस हेडपेक्षा सिराजवर कठोर कारवाई
10
सीरियात बशर-अल-असाद यांच्या सत्तापालटानंतर, इस्रायलनं अमेरिकेच्या सोबतीने केला 'मोठा खेला'!
11
रीलचा नाद लय बेक्कार! आई Video काढण्यात बिझी, चिमुकली लेक पोहोचली हायवेवर अन्...
12
“भाजपा महायुतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली, आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार”: नाना पटोले
13
जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, "योग्य वेळी निर्णय घेतील..."
14
Video: धक्कादायक! महिला फुटपाथवरून चालताना अचानक जमिनीखालून झाला स्फोट अन् मग...
15
“‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ म्हणता मग सीमावाद का सोडवत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
“बेळगावला केंद्रशासित प्रदेश कधी करणार? मराठी माणसांवरील अन्याय सहन करणार नाही”: आदित्य ठाकरे
17
रिकाम्या पोटी चालल्यास काय होतं? या व्यायामाचे वजन कमी करण्यासह ८ जबरदस्त फायदे
18
नागपुरात छमछम! MIDC मध्ये सुरू होता डान्सबार; पोलिस उपायुक्तांच्या पथकाचा छापा, २१ जणांविरोधात गुन्हा
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचे आधीचे नाव काय होते? स्थापना कधी अन् कशी झाली? जाणून घ्या...
20
“पुढील ५ वर्षांच्या काळात अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर चांगलेच होईल”: जय पवार

शफाली वर्मा : एकेकाळी फाटके ग्लोव्हज आणि तुटक्या बॅटीनं खेळणारी कोण ही मुलगी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 8:00 AM

हरयाणातल्या रोहतकमध्ये मुलांचे क्रिकेट सामने होते. एका संघातला प्रमुख फलंदाज ऐनवेळी आजारी पडला. त्याच्याऐवजी त्याची लहान बहीण ‘मुलगा’ म्हणून मग मैदानात उतरली. चौक्या-छक्क्यांनी तिनं मैदान दणाणून सोडलं. भारतीय संघाने विश्वचषक गमावला असला तरी तिची गोष्ट मात्र आरंभ आहे, नव्या क्रिकेट समीकरणांची, मैदानातल्या आणि मैदानाबाहेरच्याही!

ठळक मुद्देतिच्या याच अनोख्या अंदाजामुळे ‘लेडी सेहवाग’, ‘लाइफ सेव्हर’, ‘पिंच हिटर’, ‘हार्ड शूटर’, ‘रॉक स्टार’, ‘फायर स्टार्टर’ . अशा अनेक बिरुदावल्या तिला मिळाल्या आहेत.

- समीर मराठे

काही वर्षापूर्वीची गोष्ट.हरयाणातलं रोहतक हे शहर.मुलांच्या क्रिकेटचे सामने होणार होते. सगळे खेळाडू उत्साहानं नुसते फुरफुरत होते.पण स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच एका संघातला प्रमुख फलंदाज आजारी पडला. सामने खेळणं शक्यच नव्हतं. वडिलांनी त्याला सांगितलं, ‘अशा आजारपणात तुला खेळता येणार नाही. डॉक्टरांनीही नाही सांगितलंय.’शेजारीच उभी असलेली त्याची लहान बहीण वडिलांना म्हणाली, ये तो नहीं खेल सकता, लेकिन उसके जगह पर मैं तो खेल सकती हॅँू !.वडिलांची परवानगी तिनं गृहीत धरली आणि क्रिकेटचे हे सामने ती खेळलीही. आपल्या भावाच्या ऐवजी आणि एक ‘मुलगा’ म्हणून!वयानं ती लहान होती. आधीच तिनं बॉयकट केलेला होता, मुलांसारखीच दिसत होती; पण ती मुलगा नसून मुलगी आहे, हे प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंना तरी कुठे माहीत होतं? प्रत्यक्ष स्पर्धेतही ती ‘मुलगी’ आहे, हे प्रतिस्पर्धी संघातल्या कोणीच ओळखलं नाही.या स्पर्धेत प्रतिस्पध्र्यावर ती वाघासारखी तुटून पडली, चौकार, षट्कारांची आतषबाजी केली. आपल्या संघाला सामने जिंकून दिले आणि मालिकेत ‘मॅन ऑफ द सिरीज’ही ठरली! कोण ही मुलगी? कोण ही ‘फायर स्टार्टर’?- ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं ज्या कोवळ्या मुलीनं प्रतिस्पर्धी संघाचं घामटं फोडलं आणि मोक्याच्या क्षणी ‘लाइफ सेव्हर’ म्हणून सातत्यानं भारताला विजयी पथावर कायम ठेवलं ती शफाली वर्मा म्हणजेच ही चिमुरडी!वयाच्या सोळाव्या वर्षी आणि केवळ सोळा आंतरराष्ट्रीय सामन्यांतच टी-ट्वेण्टीमधील ती जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू बनली आहे.शफाली वयानं अजून खूप लहान आहे. अनुभव कमी आहे. बोटावर मोजता येतील इतक्याच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव तिच्या गाठीशी आहे; पण म्हणून तिचा संघर्ष लहान नाही. या टप्प्यार्पयत पोहोचण्यासाठी अनेक कसोटय़ा तिला पार कराव्या लागल्या. अर्थातच त्यातली एक कसोटी होती, ‘महिला’ असण्याची.शफाली एका सर्वसामान्य घरातली मुलगी. तिच्या वडिलांचं सराफी व्यवसायाचं एक छोटंसं दुकान आहे. त्यांना स्वतर्‍लाही क्रिकेटची फार आवड. आपल्या परीनं त्यांनी पुढे जाण्याचा प्रय} केला; पण पुरेसा पाठिंबा आणि प्रशिक्षणाअभावी आपली क्रिकेटची आवड प्रत्यक्ष मैदानावर त्यांना फार पुढे नेता आली नाही. आपलं अधुरं राहिलेलं स्वपA आपल्या मुलांनी पूर्ण करावं असं मात्र त्यांना मनोमन वाटत होतं. त्यासाठी मग त्यांनी प्रय} सुरू केले.शफालीच्या घरात तशी सगळ्यांनाच क्रिकेटची आवड. त्यामुळे मोठा मुलगा साहीलला त्यांनी स्वतर्‍च क्रिकेटचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.त्याचा किस्साही मजेदार आहे. साहीलला ट्रेनिंग देण्याचा पहिलाच दिवस. छोटी शफालीही या दोघांबरोबर मैदानावर गेली; पण वडिलांनी तिला सांगितलं, तू काहीच करायचं नाही. फटकावलेला बॉल फक्त आम्हाला परत आणून द्यायचा. बॉल पकडायला, आणायला तासभर शफाली मैदानात इकडून तिकडे पळत होती. शेवटी वडिलांनाच तिची दया आली आणि त्यांनी तिलाही दोन-चार बॉल बॅटिंग करायची परवानगी दिली. पण हे बॉल तिनं आपल्या मोठय़ा भावापेक्षाही जोरात टोलवले!.शफालीच्या क्रिकेटला सुरुवात झाली ती अशी. मग गल्लीत ती मुलांबरोबर क्रिकेट खेळू लागली. पण कोणीच तिला गांभीर्यानं घेतलं नाही. उलट म्हणायचे, अरे, तू तो छोरी है. तू क्या क्रिकेट खेलेगी? चल हट. बॉल-वॉल लग जाएगा, तो रोते बैठोगी.छोटय़ा शफालीला मुलांचं हे बोलणं फार लागलं. तिला वाटलं, आपल्या मोठय़ा केसांमुळेच मुलं आपल्याला मुलगी समजतात आणि क्रिकेट खेळू देत नाहीत. एक दिवस ती तरातरा वडिलांकडे गेली आणि म्हणाली, वो लडके मुझे खिला नहीं रहे है, मैं मेरे बाल कटवा सकती हॅँू क्या?. वडीलही तिला म्हणाले, क्रिकेट के लिए तू कुछ भी कर सकती है.त्याच दिवशी शफाली आपले मोठे केस कापून आली. त्या दिवसापासून ते अगदी आजर्पयत तोच तिचा हेअरकट आहे !घरेलू मैदानावर झालेले सामने असो, आपल्या हरयारणा राज्यातर्फे खेळलेले सामने असो किंवा आताच्या महिला वर्ल्ड टी-ट्वेण्टीचे. फिअरलेस शफालीनं कोणाचीच भीडभाड ठेवली नाही आणि चौकार-षट्कारांची आतषबाजी करताना प्रत्येकाला उचलून मैदानाबाहेर टोलवलं. मेगान स्कट ही ऑस्ट्रेलियाची भरवशाची आणि प्रमुख वेगवान  गोलंदाज. तिच्या पहिल्याच षट्कात शफालीनं चार चौकार खेचून तिची लयच बिघडवून टाकली होती. स्कटही शफालीला बिचकून आहे. गेल्या आठ वर्षापासून स्कट ऑस्ट्रेलियासाठी खेळतेय. ती म्हणते, तिरंगी मालिकेतही शफालीनं माझ्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षट्कार खेचला होता. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मला इतका उत्तुंग षट्कार आजवर कोणीच खेचलेला नाही!पण खरंच शफालीला कसलीच भीती वाटत नाही? कुठून आली तिच्यात इतकी हिंमत आणि जिगर? कशी झाली आजवरची तिची वाटचाल?शफालीचा आजवरचा प्रवास जाणून घेण्यासाठी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात असलेल्या तिच्या वडिलांशी, संजीव वर्माशी ऑस्ट्रेलियात संपर्क साधला.त्यांचं म्हणणं होतं, तिच्यात उपजत टॅलेंट आहे. क्रिकेटची ती फार शौकिन आहे. क्रिकेटसाठी काहीही करायला ती तयार असते; पण इतक्या लहान वयात ती आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली, जगभरातल्या महान गोलंदाजांना मोठय़ा हिमतीनं भिडतेय, याचं  श्रेय तिच्यापेक्षाही तिच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला, ते तिचे कोच, हरयाणा क्रिकेटचे पदाधिकारी, बीसीसीआय. अशा अनेकांना जातं. शफाली सचिन तेंडुलकरची जबरदस्त फॅन आहे. त्याला ती आपला आदर्श मानते. सचिनही तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला कसा जबाबदार आहे, याबद्दलचा एक किस्सा संजीव वर्मा सांगतात. ऑक्टोबर 2013 मध्ये सचिन हरयाणात रोहतकला आला होता. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 16 नोव्हेंबर 2013 रोजी त्यानं निवृत्ती घेतली, त्याच्या महिनाभर आधी. हा त्याचा अखेरचा रणजी सामना होता. मुंबई विरुद्ध हरयाणा. सचिनला पाहण्यासाठी आणि फ्री पासेस मिळवण्यासाठी तिथल्या लाहली स्टेडियमवर महामूर गर्दी होती. 

संजीव वर्मा सांगतात, कशीबशी तीन तिकिटं मला मिळाली. सामना सुरू होण्याच्या दिवशी स्टेडियममध्ये सुमारे वीस हजार लोक होते आणि तेवढेच क्रिकेट शौकिन स्टेडियमच्या बाहेर. सचिनच्या नावानं जल्लोष सुरू होता. छोटी शफालीही एवढी गर्दी पाहून हबकून गेली. तेव्हा ती दहा वर्षाची होती. शफाली मला म्हणाली, ‘पापा, क्या मैं भी सचिन जैसी इंडिया के लिये खेल सकती हॅँू?’ मी तिला सांगितलं, ‘बेटा, उसके लिए कडी मेहनत करनी पडती है. आसानी से कुछ नहीं होता.’ त्याच दिवशी संध्याकाळी तिनं मला सांगितलं, ‘पापा, आज से मैं टेनिस बॉल से नहीं, लेदर बॉल से क्रिकेट खेलूंगी!’आंतरराष्ट्रीय क्रिकेपटर्पयत पोहोचण्यासाठी शफाली, तुम्हाला काय संघर्ष करावा लागला, असं संजीव वर्मा यांना विचारल्यावर मुलीविषयीच्या अभिमानानं आणि गतकाळ आठवून गदगदत्या आवाजात ते सांगतात, उसकी मेहनत तो सब जानते है, लेकिन एक हादसा मैं जिंदगीभर नहीं भुलूंगा. आज मैं ऑस्ट्रेलिया में हॅँू. मगर आज भी वो क्षण बार बार मेरे ऑँखो के सामने आता है. चार वर्षापूर्वी; 2016मध्ये मी नोकरीसाठी ट्राय करत होतो. खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. नोकरीची गरज होती. त्यासाठी माझा आटापिटा चालला होता. माझ्या याच मानसिकतेचा एका भामटय़ानं फायदा घेतला आणि माझ्या कुटुंबासाठी, मुलांसाठी जी काही पुंजी मी आजवर जमा केली होती, ती सारीच्या सारी त्या भामटय़ानं लंपास केली. तब्बल साडेसात लाख रुपये आणि बायकोच्या अंगावरचं तीन-चार तोळे सोनं. काही म्हणता काही राहिलं नाही. त्यावेळी माझ्याकडे मोजून 280 रुपये राहिले होते !. ‘आज भी वो दिन मुझे याद है. फाटलेले ग्लोव्हज घालून आणि तुटक्या बॅटीनं शफाली मैदानावर खेळत होती. मी विसरूच शकत नाही ते दिवस.’ - त्यांचा आवाज आणखी कातर झाला. गदगदला. बहुदा डोळ्यांतून पाणीही आलं असावं. यापुढे संजीव वर्मा काही बोलूच शकले नाहीत.रोहतकमध्ये श्री रामनारायण क्रिकेट अकॅडमी ही एक प्रसिद्ध आणि जुनी संस्था आहे. अश्वनी कुमार यांची ही अकॅडमी. ते स्वतर्‍ उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि 1982 ते 1990 या काळात हरयाणाकडून 40 रणजी सामने खेळलेले आहेत. ओपनर बॅट्समन म्हणून त्यांनी आपला काळ गाजवलेला आहे. रोहतकमध्ये केवळ ही एकच अकॅडमी महिलांना क्रिकेटचं ट्रेनिंग देते. शफाली त्यांच्याच क्रिकेट अकॅडमीमध्ये आजही शिकते आहे.शफालीच्या जडणघडणीबाबत अश्वनी कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनाही शफालीचं अपार कौतुक. मात्र त्याचवेळी सावधानतेचा इशाराही ते देतात. शफाली अभी बच्ची है. उसके करिअर की अभी तो शुरुआत हुई है. सफर लंबा है. आगे बहोत कुछ सिखना पडेगा. उम्र और तजुरबा सब सिखा देती है.अश्वनी कुमार यांना विचारलं, वर्ल्डकपर्पयतचा शफालीचा संघर्ष काय होता, कोणकोणत्या अडचणी, कमतरतांवर तिला मात करावी लागली?यावर त्यांनीच प्रतिप्रश्न केला, अभी तक उसने संघर्ष देखाही कहां है? उसकी उम्र भी सिर्फ 16 साल है. जेव्हा बराच काळ तुम्ही खेळत असता, यशाच्या शिखरावर जाता, पुन्हा खाली येता, परत मेहनत करून आपलं स्थान मिळवता, टक्केटोणपे खात पुढे जाता. तेव्हा त्याला संघर्ष म्हणतात. त्यादृष्टीनं अद्याप तिच्या वाटय़ाला यातलं काहीही आलेलं नाही. संघर्ष तिला करावाही लागू नये ही सदिच्छा; पण अजून ती खूप छोटी आहे. आत्ताशी तर तिची सुरुवात आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अजून सहा महिनेही झाले नाहीत. काही गोष्टी मात्र तिला शिकाव्या लागतील.मैदानात चौके-छक्क्यांची बरसात करणारी शफाली सुरुवातीपासूनच तशी आहे, की तुम्ही तिला त्याबाबत ग्रुम गेलंत, असं विचारल्यावर तातडीनं अश्वनी कुमार सांगतात, नहीं, वो वैसीही है. अ‍ॅग्रेसिव्ह. टॅलण्ट भी बहोत है. वयाच्या मानानं तिची बॉडी, फिजिक स्ट्रॉँग आहे. तिच्यात ताकदही चांगली आहे. आक्रमक शॉट्स खेळायला तिला आवडतं. हमने उसके नॅचरल गेम के साथ बिलकुल छेडखानी नहीं की. आम्ही तिला एवढंच शिकवलं, तू मार, लेकिन पहले बाउण्ड्री देख. ती किती लांब, रुंद आहे ते बघ. शॉट सिलेक्शन कर. कुठे मारायचं ते ठरव. गॅप में मारो, फिल्डर के उपर से मारो, या तो फिल्डर के आगे. बॅटिंगबरोबर तिच्या फिल्डिंगवरही लक्ष दिलं.तिला ट्रेनिंग कसं दिलं, यावर अश्वनी कुमार सांगतात, साडेअकरा वर्षाची असताना ती आमच्या अकॅडमीत आली. आम्ही कोणतीही घाई केली नाही. तिचा कल आणि आवाका बघून तिला ट्रेनिंग दिलं. पण तिच्यातली ईर्षा आणि जोष बघून नंतर आम्ही तिला मुलग्यांबरोबर खेळायला दिलं; पण टप्प्याटप्प्यानं. आमच्या अकॅडमीत मॅचेस सुरू असतात. तिथे मुलांच्या टीमकडूनही तिला खेळवलं. आशिष होड्डा, अजित चहल, अमन कुमार. यांच्यासारखे चांगले रणजीपटू आमच्या अकॅडमीत आहेत. आशिष होड्डा तर गेल्या दहा वर्षापासून रणजी खेळतोय. या मुलांसोबतही शफालीला खेळवलं. तिच्यातलं पोटेन्शिअल ग्रुम करण्याचा प्रय} केला. फास्ट बॉलिंग, स्पिन बॉलिंग, बॉलिंग मशीन. या सार्‍या गोष्टींची तिला प्रॅक्टिस दिली.

अश्वनी कुमार सांगतात, शफाली फक्त बॅट्समन नाही, ती चांगली विकेटकीपरही आहे. हरयाणाकडून खेळताना ती विकेटकीपिंगही करते. एवढंच नाही, ती पार्टटाइम बॉलरही आहे. ऑफस्पिन बॉलिंग टाकते. ऑलराउंडर आहे. पण अजून बर्‍याच गोष्टी तिला शिकाव्याही लागतील. ती चांगली कीपर आहे, भविष्यात इंडियाची कीपर होण्याचीही संधी तिला आहे; पण सध्याची भारताची कीपर तानिया भाटिया, या घडीला तरी शफालीपेक्षा चांगली कीपर आहे. शफाली वर्ल्डकपमध्ये दोन वेळा पन्नाशीजवळ पोहोचली, एकदा 46, नंतर 47. पण दोन्ही वेळा तिला फिफ्टी पूर्ण करता आली नाही. आपली खेळी आणखी लांब कशी करता येईल याकडे तिला लक्ष द्यावं लागेल. रनिंग बिटविन द विकेट इम्प्रूव करावी लागेल. फिल्डिंग टॉप क्लासच असली पाहिजे. याचा अर्थ या सगळ्यांत ती कमी आहे, असं नाही, पण तुम्ही कितीही उत्तम खेळाडू असलात, तरीही कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला आणखी पुढे जाता येतंच. शिवाय कोणताही खेळाडू जेव्हा चांगलं खेळत असतो, तेव्हा त्याला त्याच्या उणिवा सांगत बसण्यात काही अर्थ नसतो. आणि अनुभव हीदेखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असतेच ना. हा अनुभवच तुम्हाला बर्‍याच गोष्टी शिकवत असतो. शफाली अनुभवातून आणखी तयार होईल.शफालीचं भवितव्य उज्‍जवल आहे. सचिनसहित जगातल्या अव्वल क्रिकेटपटूंनी शफालीचं कौतुक केलं आहे. अख्ख्या जगाचं तिच्याकडे लक्ष आहे. टी-ट्वेण्टीमध्ये भारताला  पहिल्यांदाच अंतिम फेरीर्पयत पोहोचवण्यात तिचा वाटा खूप मोठा आहे.पुस्तकी शॉट्स तर तिच्याकडे आहेतच; पण आजर्पयत कधीच, कोणीच न अनुभवलेले स्वतर्‍च तयार केलेले ‘टेलरमेड’ शॉट्सही तिच्याकडे आहेत.यंदाच्या वर्ल्डकपमधलाच श्रीलंकेविरुद्धचा सामना तुम्ही पाहिलात?श्रीलंकेची स्पिनर शशिकला श्रीवर्धनेनं नवव्या ओवरचा टाकलेला पहिलाच बॉल. खरं तर हा बॉल वाइड होता; पण तोही सोडून न देता, शफालीनं क्रिज सोडलं, स्टम्पसच्या मागे गेली आणि तिथून बॉल तडकावला. फोùùùर! - असे अनेक शॉट तिच्याकडे आहेत.तिच्या याच अनोख्या अंदाजामुळे ‘लेडी सेहवाग’, ‘लाइफ सेव्हर’, ‘पिंच हिटर’, ‘हार्ड शूटर’, ‘रॉक स्टार’, ‘फायर स्टार्टर’ . अशा अनेक बिरुदावल्या तिला मिळाल्या आहेत.वर्ल्डकपच्या या संपूर्ण मालिकेत भारतीय संघानं अतिशय उत्तम खेळ केला. (अपवाद फायनलचा) त्यात छोटय़ा शफालीचा वाटा फार मोठा आहे.

*************

पहिल्याच सामन्यात  सचिनचा विक्रम मोडणारी  विक्रमवीर शफाली!

28 जानेवारी 2004 हा शफालीचा जन्मदिवस. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळायला सुरुवात करून शफालीला अजून पुरते सहा महिनेही झाले नाहीत; पण या अवधीतच अनेक मोठे रेकॉर्ड तिनं आपल्या नावावर केले आहेत.24 सप्टेंबर 2019 रोजी शफालीनं आपला पहिला टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यावेळी तिचं वय होतं, 15 वर्षे 239 दिवस ! या पहिल्याच सामन्यात तिनं आंतरराष्ट्रीय रेकॉर्डही केलं. सर्वात कमी वयाची ती पहिली भारतीय महिला ठरली. याआधी 1978मध्ये शफालीपेक्षाही कमी वयात भारताच्या गार्गी बॅनर्जीनं आपला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. त्यावेळी तिचं वय होतं 14 वर्षे 165 दिवस; पण हा ‘वन डे’ सामना होता. सचिन तेंडुलकर जेव्हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला, त्यावेळी त्याचं वय होतं, 16 वर्षे 238 दिवस ! आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत सर्वात कमी वयात पहिली हाफ सेंच्युरी मारण्याचं रेकॉर्डही शफालीच्या नावावर आहे. नोव्हेंबर 2019मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेतील सामन्यात शफालीनं आपली झंझावाती पहिली हाफ सेंच्युरी झळकवली (49 बॉलमध्ये 73 रन्स- सहा फोर आणि चार सिक्स !) त्यावेळी तिचं वय होतं 15 वर्षे 285 दिवस. याआधी हे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे होतं. सचिनचं वय 16 वर्षे 214 दिवस होतं, त्यावेळी त्यानं हे रेकॉर्ड केलं होतं. गेली तीस वर्षे हे रेकॉर्ड सचिनच्या नावे होतं. शफालीनं ते मोडलं.देशांतर्गत क्रिकेटमध्येही तिनं अनेक विक्रम केले आहेत. 2018-19 या वर्षात हरयाणातर्फे खेळताना तिनं तब्बल 1,929 धावा कुटल्या. त्यात सहा सेंच्युरीज आणि तीन हाफ सेंच्युरीज होत्या.जानेवारी 2020मध्ये टी-ट्वेंटी वर्ल्डकपसाठी शफालीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्याबरोबर बीसीसीआयचं कॉन्ट्रॅक्टही तिला मिळालं. महिला वर्ल्डकप टी-ट्वंेटीच्या पहिल्या चार सामन्यांतच तिनं 161 धावा फटकावल्या. त्यात नऊ षट्कारांचा समावेश होता. ग्रुप स्टेजमधील तोर्पयतचे ते सर्वाधिक षट्कार होते!

****

‘शफाली’ की ‘शेफाली’?

शफाली वर्माचं नाव नेमकं काय? ‘शफाली’ की ‘शेफाली’? तिची दोन्हीही नावं प्रचलित आहेत; पण ती स्वतर्‍ इंग्रजीत आपलं नाव ‘शफाली’ असंच लिहिते. तिचे मित्र-मैत्रिणी, कोच मात्र तिला ‘शेफाली’ या नावानं हाक मारतात. पण अर्थातच नावापेक्षाही आपल्या कामगिरीचं महत्त्व तिला अधिक आहे. (लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)