अनिल भापकर
यारीदोस्तीतलं शेअरिंग वाढवणारा एक नवा फंडा नेट शेअरिंग. जो नेट शेअर करतो तोच सच्च दोस्त असंही लोक उद्या म्हणू लागतील, असा हा नवा फंडा!
--------------------
‘दोस्ती मे सब चलता है’ म्हणत एकेकाळी मित्र एकमेकांच्या वस्तू शेअर करत असत. मग ते अगदी पेन ,पेन्सिल पासुन ते कॅंटीन मधील कटिंग असो कि आपल्या रुममेटच्या कपडय़ांपासुन ते वही-पुस्तकांपर्यंत. सर्व काही बिनदिक्कत शेअर केलं जायचं. मात्र आताच्या हायटेक जमान्यात मित्रंच्या शेअरिंगच्या कल्पना थोडय़ा बदलल्या आहेत.
हल्ली नियमीत ऐकू येणारे संवाद म्हणजे यार मेरे लॅपटॉप पे नेट नही चल रहा है, जरा तेरा स्मार्टफोन वायफाय हॉटस्पॉट मोड पर डाल मुङो तेरा नेट शेअर करना है! समोरचा मित्र सुद्धा त्याच्या स्मार्टफोनवर काही तरी सेटिंग करतो आणि चल ले ये पासवर्ड डाल और कर ईंटरनेट अक्सेस असे म्हणतो. लॅपटॉपवर वायफाय सर्च करुन मित्रने दिलेला पासवर्ड टाकुन इंटरनेटचा वापर करुन े महत्वाचं काम केलं जातं.
पण हे वायफाय हॉटस्पॉट तंत्रज्ञान आहे तरी काय की ज्यामुळे हे इंटरनेट शेअरिंग अगदी सोपे झालंय!
अॅण्ड्राईड स्मार्टफोनवर ईंटरनेट शेअर (टिथरिंग)करण्याच्या तीन वेगळ्यावेगळ्या पध्यती आहेत.युएसबी टिथरिंग,वाय-फाय टिथरिंग आणि तिसरी पद्धत म्हणजे ब्लुटुथ टिथरिंग. त्यासा:याची इथं माहिती देतोय, एखाद्या जाणकार मित्रची मदत घेऊन हे सारं स्वत:च्या मोबाईलनं एकदा करुन पहा.
त्यात अवघड काही नाही, अनेकांना उगीच आपल्याला ते जमणार नाही असं वाटतं. पण त्यात क्लिष्ट आणि न जमण्यासारखं काहीच नाही!
1.युएसबी टिथरिंग-
युएसबी टिथरिंग हा अॅण्ड्राईड स्मार्टफोनचा वापर करुन इंटरनेट शेअर करण्याचा सगळ्यात सोपा आणि फास्ट इंटरनेट स्पीड देणारा प्रकार आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी डाऊन होण्याची अजिबात शक्यता नसते कारण ज्या लॅपटॉपला किंवा पिसिला स्मार्टफोन जोडता त्यावेळी तुमचा स्मार्टफोनसुद्धा चाजिर्ंग होत असतो. डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे इंटरनेटचा स्पीड सुद्धा चांगला मिळतो. मात्र यामध्ये तुम्ही एकाच डिव्हाईस सोबत इंटरनेट शेअर करु शकता. यासाठी तुम्हाला युसबी डेटा केबल च्या सहाय्याने तुमचा स्मार्टफोन लॅपटॉपला जोडावा लागेल.त्यानंतर अॅण्ड्राईड स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जाऊन वायरलेस आणि नेटवर्क मध्ये मोअर सेटिंग मध्ये जावे लागते. नंतर टिथरिंग आणि पोर्टेबल हॉटस्पॉट वर टॅप करावं लागतं.यामध्ये युएसबी टिथरिंग ला सिलेक्ट केलं की लॅपटॉप वर इंटरनेट सुरु.
2.वाय-फाय टिथरिंग
इंटरनेट स्पीडच्या बाबतीत वाय-फाय टिथरिंग दुस:या क्रमांकावर येतं. याचा इंटरनेट स्पीड युएसबी टिथरिंग पेक्षा थोडा कमी असतो. वाय-फाय टिथरिंग या इंटरनेट शेअरिंग प्रकारामध्ये तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त लवकर डाऊन होते. मात्र वाय-फाय टिथरिंगचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या इंटरनेट शेअरिंग प्रकारामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त डिव्हाईसवर इंटरनेट वापरु शकता. यासाठी तुम्हाला अॅण्ड्राईड स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जाऊन वायरलेस आणि नेटवर्क मध्ये मोअर सेटिंग मध्ये जावे लागेल.नंतर टिथरिंग आणि पोर्टेबल हॉटस्पॉट वर टॅप करावे लागेल . आता हेच नेटवर्क आणि पासवर्ड वापरुन तुम्ही इतर डिव्हाईसवर इंटरनेट वापरु शकता.
3.ब्लुटुथ टिथरिंग
हा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत सगळ्यात स्लो प्रकार आहे.मात्र यामध्ये सुद्धा तुमच्या स्मार्टफोन ची बॅटरी खुप कमी वापरली जाते.शिवाय ब्लुटुथ टिथरिंग वापरुन जुन्या डिव्हाईसवर इंटरनेट वापरु शकता. ही गाणी किंवा पिर शेअरिंगची सगळ्यात जुनी पद्धत. अर्थात अजूनही ही पद्धत काम करतेच.