शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

स्वत:लाच ‘शूट’ करायची टूम

By admin | Published: June 11, 2015 3:00 PM

मी आताच उठलो, फिलिंग फ्रेश’ हे मित्रंना दाखविण्यासाठी सकाळीच सेल्फी काढून तो व्हॉट्सअॅपवर टाकायचा किंवा फेसबुकवर टाकायचा. रेल्वेत-मेट्रोत बसलो म्हणून कंटाळा आला, बॉसने झापले म्हणून रडवेला सेल्फी, काहीतरी खाताना सेल्फी अशी असंख्य कारणं देत जो तो स्वत:चाच फोटो स्वत:च का काढत सुटलाय? आणि ते कमीच म्हणून उंच जागी जाऊन, धबधब्याजवळ, रेल्वेला लोंबकळताना सेल्फी काढण्याची फॅशन अचानक का आलीये ?

दोन क्षणांची उसंत मिळाली किंवा मोकळा वेळ मिळाला की, आपण काय करतो याचा थोडा विचार केला, तर लक्षात येईल आपला हात मोबाइलवरच जातो. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाइल हातात घेतल्याशिवाय दिनक्रमास सुरुवातच होत नाही. आपली अनेक कामे आणि भरपूर सोयी असलेल्या टचस्क्रिन फोनमुळे होतात. त्याचप्रमाणो फेसबुक, ट्विट, व्हॉट्सअॅप, ई-मेल यामुळेही फोन सारखा वाजतोच. पण या मोबाइल अॅडिक्शन पाठोपाठ स्वत:चे फोटो काढण्याचे नवे अॅडिक्शन तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे पंतप्रधान ली केकीयांग यांच्या सेल्फीची सध्या पाश्चिमात्य व भारतीय माध्यमांत जोरदार चर्चा सुरू आहे. या सेल्फीला इंटरनेटवर 31.85 दशलक्ष इतक्या हिट्स मिळाल्या आहेत. सेल्फी आपल्या आयुष्याचा इतका मोठा भाग कसा झाला? नरेंद्र मोदी, ली केकीयांग, बराक ओबामा यांच्यासारख्या नेत्यांनाही सेल्फी का काढावासा वाटतो?  

याचा जरा स्वत:शीच ताळा करून पाहिला तर खूप गमतीशीर आणि तितकीच अंर्तमुख करणारी माहिती हाती येते.
साधारण चार दशकांपूर्वी फोटो काढायचा म्हणजे घरातील सर्वानी आवरून चांगले कपडे करून एकत्र स्टुडिओत जाऊन बसावे लागे. बहुतांश वेळेस वाढदिवस, सणाच्या दिवशीच असे कार्यक्रम होत असत.  काही काळानंतर निवडक घरांमध्येच रिळाचे कॅमेरे आले. त्यातील 34 ते 36 फोटांच्या रिळात सगळी सहल आणि कार्यक्रम बसवावे लागत. नंतर तोही टप्पा आपण ओलांडला व डिजिटल कॅमे:याचे युग सुरू झाले. या युगात रिळाची मर्यादा संपली. धडाधड फोटो काढायचे आणि सीडीमध्ये साचवून ठेवायची पद्धत आली. आणि शेवटी आले ते कॅमे:याचे मोबाइल. कॅमे:याचा मोबाइल असणा:याला विशेष प्रतिष्ठा मिळू लागली. 
मोबाइलमध्ये दोन्ही बाजूस कॅमेरे आल्यामुळे स्वत:च्या प्रतिमा काढण्याचीही सोय झाली. साहजिकच केवळ आपली मते मांडण्यापेक्षा आपण कसे दिसत आहोत हे सांगायची धडपड आणि चढाओढ सुरू झाली.
 ‘मी आताच उठलो, फिलिंग फ्रेश’ इतके दाखविण्यासाठी सकाळीच सेल्फी काढून तो व्हॉट्सअॅपवर टाकायचा किंवा फेसबुकवर टाकायचा. रेल्वेत-मेट्रोत बसलो म्हणून कंटाळा आला, बॉसने झापले म्हणून रडवेला सेल्फी, काहीतरी खाताना सेल्फी अशी असंख्य कारणो शोधली जाऊ लागली. आपण जे काम करत आहोत त्याचा पूर्ण आनंद घेण्यापेक्षा किंवा त्याआधीच आपण ते काम करत आहोत हे जगाला दाखविण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आणि सेल्फीने त्याला वाट करून दिली. लहान मुलापासून प्रौढांर्पयत सर्वाना सेल्फीची सवय लागली आहे.
आता मात्र विचित्र सेल्फीचाही प्रवाह आला आहे. उंच जागी जाऊन सेल्फी काढणो, धबधब्याजवळ, रेल्वेला लोंबकळताना सेल्फी काढणो अशा नव्या फॅशनमुळे अपघात होऊ लागले आहेत. अपघात हे निसर्गाचे व कायद्याचे बंधन न पाळल्यामुळे होतात, त्याचा दोष तंत्रज्ञानावर ढकलून चालणार नाही. तंत्रज्ञान कधीच वाईट नसतं, पण त्याचा अतिरेक आणि अयोग्य वापर झाला तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. सेल्फी काढताना बोट बुडाली, धबधब्यात पाय घसरून झालेले अपघाताच्या बातम्या आपण वाचल्याच आहेत. दिवसभरात आपण केलेली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर आणि सेल्फी काढून दाखविलीच पाहिजे असं नाही. एखाद्या निसर्गरम्य स्थळी फिरायला गेल्यावर तेथील निसर्गाचा व खाद्यपदार्थाचा मनसोक्त आनंद घेता आला पाहिजे. आपला हात मोबाइलवर जात असेल तर थोडे थांबण्याची सवय आपण सर्वानी लावून घ्यायला हवी. ट्रीपचे किंवा खाद्यपदार्थाचे वर्णन नातेवाइकांना, मित्रंना नंतर फोनवरून किंवा प्रत्यक्ष करता येईलच की. सेल्फीचे हे व्यसन हळूहळू कमीही करता येईल. सेल्फी काढायचा मोह झाल्यावर कोणते तरी दुसरे काम करायला घेणो, काम नसताना मोबाइल लांब ठेवणो, वाचताना, प्रवासात मोबाइल न वापरणो किंवा एखाद्या दिवशी सेल्फी उपवास, व्हॉट्सअॅप उपवास, सोशल मीडिया उपवास असे उपवास करून मनाचा निग्रहसुद्धा तपासता येईल. फोटोपेक्षा आपण आहोत तसे चांगले आहोत, हे स्वीकारलं की सेल्फीचं व्यसन सुटणं अवघड नाही.
- ओंकार करंबेळकर
 
सेल्फी नावाचा मानसिक  आजार ?
 
भारतासह परदेशात सेल्फीचे लोण वेगात पसरल्यामुळे नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅपच्या अॅडिक्शनप्रमाणो हे अॅडिक्शनदेखील वाढीला लागले आहेत. एखाद्या नेत्याची भेट झाली, अभिनेत्याची भेट झाली की लोकांचे हात तत्काळ मोबाइलकडे जातात आणि सेल्फी काढला जातो. त्यात दोघांचे सेल्फी, ग्रुप सेल्फी असे प्रकारही झाले आहेत. सेल्फी काढायला त्रस होऊ नये, म्हणून काही कंपन्यांनी सेल्फी स्टिक्सही बाजारात आणल्या आहेत. त्यामुळे सेल्फी काढताना त्यांचा वापर केला जात आहे.
 
सेल्फीच्या अतिरेकी वापरामुळे आत्मप्रितीलाही(नार्सिसिझम/ स्वत:वरच प्रेम करणो) वाट मिळत असते. केवळ स्वत:वर असे लक्ष केंद्रित झाल्यास ते आपल्यासाठी व समाजासाठी नक्कीच चांगले नाही. अमेरिकन सायकीअॅट्रिस्ट असोसिएशनने नुकतेच सेल्फीला मानसिक आजार (मेण्टल डिसॉर्डर) म्हणून घोषित केले आहे. वारंवार सेल्फी काढण्याच्या आजाराचे असोसिएशनने तीन भाग केले आहेत
 
बॉर्डरलाइन सेल्फीइट्स
यामध्ये दिवसातून किमान तीन वेळा सेल्फी काढणारे, मात्र सोशल मीडियावर ते प्रसिद्ध न करणा:या लोकांचा समावेश होतो.
 
अक्यूट सेल्फीइट्स
यामध्ये दिवसातून किमान तीन वेळा सेल्फी काढणारे आणि ते सर्व सोशल मीडियावर प्रसिद्ध करणा:या व्यक्तींचा समावेश होतो.
 
क्रॉनिक सेल्फीइट्स
या वर्गातील लोकांची परिस्थिती मात्र खरच गंभीर आहे. या वर्गातील लोक दिवसातून सहार्पयत सेल्फी काढून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असतात. दिवसातून अनेकवेळा सेल्फी काढण्याचा मोह त्यांना होतो आणि त्यातच ते गुंतून पडतात.
 
 
तंत्रज्ञानातील ही एक लाट आहे
 
अनेक प्रकारच्या फॅशन्स आणि नव्या प्रवाहाप्रमाणो सेल्फी हीसुद्धा एक लाटच आहे. कालांतराने ती ओसरेलही. पण सेल्फी हा आजार म्हणता येणार नाही. फक्त त्याचा अतिरेक होत असेल तर त्यास अस्वाभाविक (अॅबनॉर्मल) म्हणता येईल. हातातील सर्व कामे बाजूला ठेवून चोवीस तास एखादी गोष्टच करत राहिलो तर ते अयोग्यच ठरेल. मग ते चोवीस तास सेल्फी काढणो असो वा सतत आरशासमोर जाऊन उभे राहणो असो. 
 डॉ. हरिष शेट्टी मानसोपचारतज्ज्ञ
 
‘मी’ हिच ओळख महत्त्वाची होतेय.
 
गेल्या काही काळामध्ये आपल्या वर्तनामध्ये मोठे बदल झाले आहेत. गटाच्या किंवा मोठय़ा ओळखीपेक्षा केवळ स्वत:ची ओळख आपल्याला महत्त्वाची वाटू लागली आहे. या स्वकेंद्रित्वाच्या लाटेचे परिणाम सर्वच बाबींवर झाले आहेत. एकेकाळी मी अमुक देशाचा, अमुक राज्याचा, अमुक गावाचा, अमुक जातीचा किंवा गटाचा अशी ओळख देत असत, आता मात्र केवळ माङो नाव आणि मीच एवढी ओळख उरली आहे. अशा स्थितीमध्ये व्यक्त होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या युगात सेल्फी जवळचा पर्याय म्हणून स्वीकारला जातो. सेल्फी काढण्याचा अतिरेक झाल्यावर आपल्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो.
प्रत्येक क्षेत्रमध्ये लोक आयकॉन किंवा आदर्श शोधत असतात. भारतीय राजकारणामध्ये दोन-तीन दशकांमध्ये अशा चेह:याची पोकळी होती. ती पोकळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरून काढली. पूर्वीच्या काळीही अशी प्रसिद्धीची पद्धत होती पण नेते तितके टेक्नोसॅव्ही नव्हते आणि तंत्रज्ञानही प्रगत नव्हते. पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचीही अनेक छायाचित्रे प्रसिद्ध झालेली आहेत इतकेच नव्हे तर महात्मा गांधींचीही रेल्वेप्रवास करताना, सूक्ष्मदर्शिकेतून पाहताना, चरखा चालवताना, भाषणाची असंख्य छायाचित्रे आहेत. नरेंद्र मोदी यांना मात्र तंत्रज्ञानाच्या विकासाचा उपयोग करण्याची अधिक संधी मिळाली, ती त्यांनी घेतलीही. ज्यांना ते आदर्श वाटतात ते त्यांचे अनुकरण करणारच !
 - डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकारतज्ज्ञ