आता कॉलेज सुरू होणार. त्यापूर्वी शॉपिंग तर हवंच. या दिवसात हमखास वाटतं की, मागच्या वर्षीचे सारेच ड्रेसेस बोअर आहेत. आता नवीन काहीतरी स्टायलिश घ्यायला हवं.
बरं स्टायलिश म्हणजे काय?
तर जे आपले मित्रमैत्रिणी सांगतात ते किंवा आपण ज्यांना स्टायलिश समजतो ते!
आणि इथंच घोळ होतो.
आपण स्टाईल कॉपी करायला जातो आणि आपली स्टाईलच तयार होत नाही.
पैसे खर्च होतात तरी फार कपडे खरेदी झालेले नसतात. चपला-बूट-बॅगा-कानातली-गळ्यातली-बेल्ट्स हे सारं बाकीच असतं.
आणि मग कॉलेज सुरू झाल्यावर लक्षात येतं की, स्टायलिश शॉपिंग तर केलं पण आपला लूक काही बदललं नाही.
हे असं का होतं?
स्टायलिश बनण्याच्या हट्टात आपली स्टाईलच का हरवते?
स्टायलिश व्हायचं तर नेमकं शॉपिंग कसं करायचं?
याच्याच काही खास टिप्स
येत्या शुक्रवारी
‘ऑक्सिजन’ मध्ये.