- श्रुती मधुदीप
‘हा टॉप कसा वाटतो?’ - ती‘अं ठीक आहे’- तो‘‘ठीक?’’ भुवया उंचावून तिने विचारलं.‘यापेक्षा अजून कितीतरी छान टॉप मिळतील अगं!’’- तो.काहीशा नाखुशीनेच तिनं हातातला आवडलेला टॉप तिथल्या हॅँगरला अडकवून दिला. आणि अजून काही ‘खास’ मिळतं का ते ती पाहू लागली. ‘‘मी काय म्हणतो, आपण त्या पुढच्या चौकातल्या मॉलमध्ये जाऊया का? तिथे एकसे उपर एक असतात कपडे!’- तो ‘अरे हो! काही हरकत नाहीये इथून घेतले तरी. एक जीन्स आणि दोन टॉप तर घ्यायचे आहेत.’ - ती ‘.आणि जीन्स कुठून घेणार ?’ - तो‘इथं एक छोटंसं दुकान आहे ना समोर. तिथं छान मिळतात. तिथं जाऊया का आधी ?’ - ती ‘ तिथून जीन्स घेणार तू ?’ त्यानं एकदम कसंतरीच चेहरा केला. ‘हो! का रे ?.’ - ती ‘ऐक ना, आज तू मी म्हणतो तिथून घे कपडे! ?’ - तो ‘ओह! बरं सांग, कुठं?’ - ती.‘‘चल गं’’ त्यानं तिच्या पाठीला ढकलत पार्किगमधल्या गाडीकडे नेलं आणि त्याने त्याची गाडी स्टार्ट केली. 2. ‘हे बघ, हा कलर बघ, या कापडाचा फील बघ! आहा!ब्रॅण्डेड कपडय़ांची गम्मतच और!’ - तो ‘मस्त सूत आहे रे याचं खरंच! पण कलर आवडत नाहीये इतका.’ - ती ‘हा कसा वाटतो ?’ - तिने आनंदाने विचारलं. ‘ठीक आहे. किती डार्कीश कलर आहे त्याचा! आणि ब्रॅण्ड बघू कुठलाय?’’(बघून) ‘अगं हा ब्रॅण्डेडसुद्धा नाहीये.’ - तो म्हणाला. काहीतरीच मुद्दामून बोलतोय असं वाटून ती त्याच्याकडे उगाचंच हसली. आत्ता आत्ताच हा मुलगा आपल्याला आवडू लागला आहे हे तिला जाणवत होतं काही दिवसांपासून. म्हणूनच आज तिनं त्याला शॉपिंगला नेलं होतं. शॉपिंग करताना असं काही बोलणं होत नाही खरं, हे माहीत होतं तिला; पण अशा लहान लहान गोष्टीतून एकमेकांच्या चॉइसेस कळतात, आणि त्यामागचे विचार रिफ्लेक्ट होत राहतात, असं वाटून तिनं त्याला शॉपिंगला विचारलं आणि पुढच्या क्षणी तो तयार झाला. बारामतीवरून मुंबईला आलेला मुलगा हा ! वडील बॅँकेत क्लार्कवगैरे होते. आता रिटायरमेण्टला आलेले. त्यामुळे अगदी साध्या घरातून आलेला साधा मुलगा तो! ‘हा बघ! माय गॉड! ट्राय कर हा! नाहीतर रस्त्यावरच्या साध्या छोटय़ा दुकानात ट्रायल रूमसुद्धा नसते. घे हे दोन करून बघ’ - तोतिने एक क्षण त्याच्याकडे पाह्यलं.‘काय झालं? हे घे ना.’‘अं हो!’ - ती 3.‘चला ! मस्त शॉपिंग झाली की नाही?’ - त्यानं तिला विचारलं‘हो’.‘नेहमी इथूनच कपडे घेत जाऊ आपण तुला. किंवा माझ्या एरिआत एक खूप मस्त मॉल झाला आहे आत्ताच. तिथून. काय ?’ तो उत्साहाने बोलत होता. ‘‘अच्छा!’’ तिनं काहीच उत्तर दिलं नाही. ‘‘थ्री थाउजण्ड अॅण्ड फोर हंड्रेड’’ - काउण्टरवरचा माणूस बोलला. ‘‘हे घ्या’ असं म्हणून त्यानं त्याचं एटीएमचं कार्ड काढलं.‘ए ए एक मिनिट! मी तुला फक्त सोबतीला बोलावलं होतं चॉइससाठी. पैसे का देतोयस! वेडायस की काय ?’ - ती.‘हे घ्या ओ पैसे’ असं म्हणून तिने पर्स काढली. ‘अगं हे बघ असूदे! माझ्याकडून घे हे गिफ्ट समज’- तो.‘प्लीज!’ ती निर्धाराने म्हणाली.4.‘चलो! कुठे जाऊया जवळपास ?’ - तो‘हे काय! इथे फार टेस्टी मिळते कॉफी’ - ती ‘इथे ?’ - त्यानं आश्चर्याने विचारलं‘ का रे?’‘तसं नाही, बसायलासुद्धा नीट जागा नाहीये. आणि त्यात अस्वच्छ!’’ते दोघं कॉफी पिताना छान गप्पा मारत होते. एकमेकांत गुंतले होते. तितक्यात एक भीक मागणारा छोटा मुलगा तिथे आला.मुलगा र् ओ!तो र् (दुर्लक्ष)मुलगा त्याच्या कपडय़ाला हात लावत र् दादा! द्या ना. तो र् (कुत्सित) नाही. जा.मुलगा र् द्या ना.ती र् काय देऊ रे?मुलगा र् (हातातले चिल्लर वाजवत) ती र् कॉफी पितोस? सॅण्डविच खायचं? मुलगा र् हां.ती र् ये! इथे बस माझ्या शेजारी. आपण तुझ्यासाठी ऑर्डर करू हं. दादा जरा एक सॅण्डविच द्या.तो तिच्याकडे अवाक्होऊन पाहात राहिला. ती त्या मुलाशी बोलत होती. त्याच्याशी बोलता बोलता खळखळून हसत होती. त्याच्या हातावर टाळी देत होती. त्याच्याशी खेळ करत होती. त्याला मजेमजेत वेगवेगळे हावभाव दाखवून हसवत होती. त्याला कळेचना, काय खरं आणि काय खोट ते!आपले मित्न तर आपल्याला म्हणाले होते, मुलींना हायफाय गोष्टी आवडणारे, स्वतर्हून पैसे देणारे, बिल देणारे, ब्रॅण्डेड कपडे घालणारे, पॉश राहणारे, गाडी चालवणारे मुलं आवडतात आणि ही एकदम माझ्या मनातल्या मुलीसारखी कशी काय वागू लागली! म्हणजे कल्पनेतल्या गोष्टी सत्यात असतात तो तिच्या चेहर्यावरच्या लहान लहान कणांकडे निरखून पाहू लागला आणि त्याला ती अधिकच सुंदर वाटली. आणि आणि त्यानं त्या लहान फाटक्या मुलाचा गालगुच्चा घेतला. ‘काय रे, नाव काय तुझं?’ त्याच्या आवाजात एक वेगळाच ओलावा तिला जाणवला..