- स्वरदा बुरसे
मला एकटं वाटतंय रे.
चल नं फिरायला जाऊयात. माङयाशी बोल आत्ता.
आत्ताच्या आत्ता!
कसलीही कारणं देऊ नकोस,
मी मिसकॉल दिल्याक्षणी कॉलबॅक कर.
अशा मला त्याक्षणी वाटणा:या कुठल्याही गोष्टीसाठी
तू जीव टाकणार,
मला हवा तसाच,
माङया स्टाईलनं माङया
कुठल्याही हट्टावर,
प्रत्येक गोष्टीवर भरभरून
रिअॅक्ट होणार.
पण आहेस कोण तू माझा?
मित्र? जिवलग?
की यापैकी कुणीही नाही??
मुलींच्या नजरेतून पाहिलं तर दिसतात कशी स्वत:चा ‘कंधा’ करून घेणारी मुलं?
तनू वेड्स मनू नावाच्या सिनेमात
तनूसाठी वाट्टेल ते करू पाहणारा आणि वकील होऊ घातलेला ‘तो’
एकदा वैतागून सांगतो, ‘वो बिरादरी होती है ना लौंडों की, जो सिर्फ कंधा बनते है कन्या का, तो वो हूं मै!’
म्हणजे काय तर, ना मित्र, ना प्रियकर अशा अवस्थेतल्या आणि ‘ती’ कधीही आपली होणार नाही हे माहिती असलेल्या तरुणांचं हे एक रूप, कंधा नावाचं!
त्या ‘कंध्यांचंच’ जग सांगणारा एक लेख मागच्या अंकात तुम्ही वाचलात.
आता ही नाण्याची दुसरी बाजू,
मुलींच्या नजरेतून त्याच कथेचा दुसरा भाग सांगणारी.
तुमचा केलाय कधी कुणी असा कंधा?
आपण वापरून घेतले जातोय,
ती आपल्याला फक्त नाचवतेय
हे कळूनही स्वत:हून तिच्यासमोर आपला खांदा घेऊन उभे राहिलात तुम्ही?
आणि मुली?
तुम्हाला खरंच वाटतं की,
मुली असा सतत कुणी न कुणी ‘खांदा’ शोधत राहतात.
रडण्या-हसण्यापुरता, लाड करून घेण्यापुरता?
तुम्हाला काय वाटतं?
नक्की लिहा. तुमची कहाणी.
पत्ता? - नेहमीचाच, शेवटच्या पानावर तळाशी.
पाकिटावर -‘कंधा’ असा उल्लेख करायला विसरू नका.
बराच वेळ नुसतं शांत बसून आणि एकमेकांकडे बघत नुसते सुस्कारे सोडून झाल्यावर त्याने विचारलं, आज एवढय़ा दिवसांनी आठवण का? यावर काय उत्तर द्यावं याची जुळवाजुळव करत असतानाच तो अगदी शांतपणो म्हणाला, नको भेटूयात आपण यापुढे! काही क्षण यावर काय बोलावं समजेच ना!! फक्त शांत बसून राहिले त्याच्यासमोर.
काय? का? कसं? असं आणि एवढंच डोक्यात येत राहिलं. मी काहीच बोलत नाहीये हे समजून त्यानं विचारलं, मी कोण आहे गं? खांदा? तुला हवं तेव्हा डोकं ठेवशील, त्यावर डोकं ठेवून रडशील आणि नंतर निघून जाशील?
उत्तर नव्हतं, पण ‘तसं नाही, खूप काही आहेस तू.’ एवढंच म्हणून मला विषय संपवायचा होता. पण पडलेले प्रश्न आणि सुरू झालेलं विचारचक्र यात मी किती वाहवत गेले हे माझं मलाच कळलं नाही.
फेसबुकवर त्याचा पहिला मेसेज आल्यानंतर संवादाला जी सुरु वात झाली, ती आजतागायत या ना त्या निमित्तानं सुरूच आहे. आम्ही दोघं अखंड भेटत आणि बोलत होतो. लहानसहान गोष्टींमधली दोघांची एकमेकांच्या आयुष्यातली गुंतवणूक इतकी होती की या प्रवासात आपण एकमेकांचे कोण आहोत आणि का आहोत सतत एकत्र या प्रश्नावर विचार करायला वेळच मिळाला नाही. किंवा तशी वेळच आली नाही असं म्हटलं तरी चालेल.
खरंच कोण आहे तो माझा? जिवलग मित्र? मित्र? की नुसताच जिवलग? हा प्रश्न कधी न् कधी मला पडणार आणि त्याचं उत्तर शोधावं लागणार याची जाणीव असूनही कायम मी स्वत:शीच हा विषय टाळत आलेय.
आणि आज तो विचारतोय की, खरंच कोण आहे मी, फक्त एक खांदा, वाट्टेल तेव्हा येऊन रडण्यापुरतं डोकं टेकवायला?
काय खोटं बोलतोय तो, जेव्हा जेव्हा मला हवं तेव्हा तेव्हा तो होताच, हक्कानं मी त्याला बोलवत होतेच.
मला एकटं वाटतंय रे. किंवा चल नं फिरायला जाऊयात. माङयाशी बोल आत्ता, कसलीही कारणं नको देऊस. माङया या कुठल्याही हट्टावर, कुठल्याही नाही तर प्रत्येक गोष्टीवर भरभरून रिअॅक्ट व्हायचास तू! माङया आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला तूच होतास रे माङया खांद्याला खांदा देऊन उभा. ‘अरे तुम्ही दोघं एकमेकांचा का विचार करत नाही. यू बोथ आर परफेक्ट फॉर इच ऑदर आहात’ अशा मित्रंच्या कमेंट्स आणि प्रश्नांनंतर आम्ही फक्त मित्र आहोत हे आपल्या दोघांचंही उत्तर होतं.
मग आता तुला या अनकंडिशनल स्टेटसने का फरक पडतोय. मला सगळं आवडतं. तुझी काळजी घेणं, तुङया अवतीभोवती असणं, तुला त्रस देणं, खोडय़ा काढणं, जरा काही झालं की भेट भेट चा जप करणं. हे फक्त मित्र या टॅगखाली टिकवणं खरंच शक्य होत नाहीये आताशा हे खरं!
माङया सगळ्या मैत्रिणी भेटल्या की हटकून तुझा विषय निघतोच. मोना मला म्हणते मी मूर्ख आहे. फार विचार करते. तिच्या मते मुलं एवढय़ापुरतीच असतात. मैत्री टिकेल तेवढी टिकू द्यायची, फार सांभाळत नाही बसायचं.
कंधेच असतात ते, आपल्या कामापुरते. सगळे शब्द ङोलतात, वाट्टेल ते करतात, पण असं सेण्टी होऊन लगेच प्रेमाबिमाचा विचार मी तरी नाही करत!
मला मान्य आहे की, मोना म्हणते तसं मुली अनेक मुलांचा ‘कंधा’ करून सोडून देतात.
पण माझं तसं नाही. माङया दृष्टीनं नाव नसलेलं आपलं हे नातं पण महत्त्वाचंच आहे.
असं काही मी सांगितलं की अमृता जवळ जवळ शाळा करते माझी. मला म्हणते, तू त्याला विचारणार नसशील तर मला तरी त्याला पटवूदेत. असा मुलगा नाही गं शोधून सापडणार. पडत्या फळाची आज्ञा आणि आपण आहोत तसं सहन करणारा मुलगा नाही सापडत लवकर!’
खरं सांगते, तुङया असण्यानं आणि माङयासाठी बरंच काही करण्यानं मला काही वेळा खूप स्पेशल फिलिंग येतं. बरंही वाटतं. पण. तरी खरंच तू विचारलंस तसं तू कोण आहेस माझा?
खूप दिवसांनी भेटलो आपण काल! खरंतर फक्त एक महिनाच गेला होता मध्ये. पण नेमकं याच काळात तुझं आजारपण येऊन गेलं. या सगळ्यात तुझी खूप चिडचिड झाली.
मी नेहमीच्याच चहाच्या टपरीवर तुझी वाट बघत बसले आणि तूही नेहमीप्रमाणो पंधरा मिनिटात पोहोचतो सांगून तासभर लावलास. तुङया चेह:यावर गंभीरपणा बघून मला जाणवलंच की आपल्या दोघांच्या अशा निनावी नात्याबद्दल कोणत्या ना कोणत्या निर्णयाला तू पोहोचला असणार. मनात साचलेलं सारं भडाभडा बोलून मोकळा झालास. माङयासाठी तुझं इतकं अगतिक होणं खूप नवीन होतं.
आणि आता तू मला विचारतोय कोण आहे मी फक्त तुझा खांदा?
उत्तर नाहीये आत्ता माङयाकडे?
फक्त प्रश्न आहेत. तुङयासमोर बोलताना, शब्दांची जुळवाजुळव करताना माझी फार फार धावपळ झाली होती. आता मी विचार करतेय की, अनेक मुली इतर मुलांचा खांदा म्हणून वापर करतात, पण म्हणून सगळीच नाती अशी असतात का?
मैत्रीचंही नातं न सांगणारी, नावच नसलेली नाती नसतात का?
एकमेकांच्या आयुष्यात नाव नसलेली जागा निर्माण होणं महत्त्वाचं नाही का?
उत्तरं नाहीयेत माङयाकडे. पण म्हणून तू ‘खांदा’ नाहीस, कधी नव्हतासच.
होप, हे तुला समजेल. कधीतरी!