- अनिल भापकर (anil.bhapkar@lokmat.com)
टेक्नोसॅव्ही जगात ऑनलाइन शब्दाचं अप्रूप मोठं. त्यात अजून एक ट्रेण्ड येऊ घातलाय तो म्हणजे स्मार्टफोन किंवा टॅब वापरून इलेक्ट्रॉनिक साइन करण्याचा म्हणजे इलेक्ट्रॉनिक सही / स्वाक्षरी करण्याचा. पर्सनल टच हवाच ना टेकसॅव्ही जगातही. आता तर प्रेमपत्रावर सही करण्यापासून ते थेट ऑफिशियल जगातल्या कामांसाठी, महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठीही या इलेक्ट्रॉनिक साईनचा खूप उपयोग करता येऊ शकतो.
‘साइन ईझी’ या नावाचं एक जादुई अँप सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. या अँपचा वापर करून तुम्ही मोबाइल किंवा टॅबलेटवरून तुमच्या बोटाच्या किंवा स्टायलसचा मदतीने ऑनलाइन सही करू शकता.
साइन इझीमधे खास काय?
जगभरातील जवळपास १५0 देशांत या साइन इझी अँपचा वापर होतो. प्रोफेशनल्स, बिझनेसमन, उद्योजक आदि मंडळी याचा वापर करतात. अँग्रीमेंट साईन करणं, कॉन्ट्रक्ट साइन करणं, पर्चेस ऑर्डर, सेल्स रिपोर्ट आदिसाठी साईन इझी अँपचा वापर सुरू झाला आहे.
हे अँप डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर पहिल्या तीन डॉक्युमेंटसाठी साइन इझी मोफत आहे. त्यानंतर मात्र याचे वेगवेगळे प्लॅन्स गरजेनुसार विकत घ्यावे लागतील.
जवळपास सगळ्या डाक्युमेंट फॉरमॅटला साइन इझी हे अँप सपोर्ट करतं. पीडीएफ, वर्ड, एक्सेल, टेक्स्ट, जेपीजी, टीफ यासारख्या नेहमी वापरणार्या फाइल फॉरमॅटसाठीही ते वापरता येऊ शकतं.
स्वाक्षरी तर करता येतेच पण नाव, कंपनी अँड्रेस, आणखी इतरही माहितीही त्यासोबत लिहिता येऊ शकते.
सही केलेल्या डाक्युमेण्टला चार आकडी पासवर्डसुद्धा देता येतो. तुमच्या डाक्युमेण्टचा गैरवापर त्यामुळे टाळता येईल.
दुसरा एक इ-मेल आयडी सेट करुन ठेवायचा. साइन इझीचा अँपचा वापर करून सही केलेले डाक्युमेंट त्या मेलवर आपोआप सेण्ट केले जातात.
साइन इझी हे अँप ‘गूगल प्ले’
वर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
-------------
ही इलेक्ट्रॉनिक सही करतात कशी?
8 साइन इझी हे अँप डाऊनलोड करून इन्स्टॉल करणं एकदम सोपंय. त्यानंतर ज्या डाक्युमेंटवर सही करायची आहे. ते डाक्युमेंट ई-मेल, गूगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स यासारख्या कुठल्याही ठिकाणाहून इम्पोर्ट करून घ्यायचं.
8 त्यानंतर त्या डाक्युमेंटवर बोटाच्या किंवा स्टायलसच्या (स्टायलस म्हणजे स्मार्ट फोनबरोबर येणारी पेनसारखी काडी.) मदतीनं सही करता येते. एकदा का डाक्युमेंटवर सही झाली की ते सेव्ह करून इमेल करता येतं किंवा क्लाऊड स्टोरेजवर सेव्हही करता येतं.