शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

सिग्नल शाळा

By admin | Published: September 30, 2016 9:54 AM

रस्त्यावर, सिग्नलवर भीक मागणारी, फुटपाथवर राहणारी मुलं. ती जातात का शाळेत? नाही. - तर मग त्यांच्या शिक्षणाचं काय?

- ओंकार करंबेळकर

पोटापाण्यासाठी मुंबईच्या दिशेने आजही लोकांचे लोंढे पोट भरण्याच्या उद्देशाने येतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे लोक मुंबई, ठाणे आणि आसपासच्या रायगड, पालघर, नवी मुंबईत व उपनगरांमध्ये येत आहेत. अंगावरचे कपडे आणि एक दोन गाठोडी एवढ्याच काय त्या सामानासह आपलं गाव काहीजण सोडतात. मुंबईत सिग्नल, फ्लायओव्हरखाली, फुटपाथवरच पथारी नाइलाजानं टाकावी लागते. पण मग मुलांच्या शिक्षणाचं काय? सिग्नलवर भीक मागणं, लहानमोठ्या वस्तू, खेळणी विकणं अशी कामं लेकरं करू लागतात. शाळा कायमची सुटते. आणि वाट्याला येतं हे रस्त्यावरचं बिकट जगणं. या मुलांनी शिकावं म्हणून ठाण्यात एक ‘सिग्नल शाळा’ सुरू करण्यात आली आहे. राईट टू एज्युकेशनचा कायदा झाला; मात्र सर्वच मुलांना शिक्षणाचा लाभ होतो असं नाही. सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांचा तर अनेकदा शिक्षणाशी संबंध येत नाहीच हे ठाण्याच्या भटू सावंत यांच्या लक्षात येत होतं पण यावर उत्तर काय हे त्यांना सापडत नव्हतं. एकेदिवशी ठाणे महानगरपालिकेच्या यादीमध्ये सिग्नलवरील शाळेचा उल्लेख वाचून त्यांच्या मनामध्ये सिग्नल शाळेची कल्पना पुन्हा येऊ लागली. सिग्नलजवळ शाळा सुरू करायची तर त्यासाठी ठाण्यात योग्य जागा शोधायला हवी, शाळेला योग्य संख्येत मुलंही मिळायला हवीत. म्हणून त्यांनी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. समर्थ भारत व्यासपीठ संस्थेमार्फत सर्वेक्षण करून ठाण्यातील तीन हात नाका हा फ्लायओव्हरखालचा मोठा सिग्नल त्यांनी निवडला व शाळेच्या कल्पनेचा श्रीगणेशा केला. आता ठिकाण तर निश्चित झाले पण शाळेला मूर्त रूप कसं द्यायचं, तेही इतक्या गजबजलेल्या ठिकाणी, फ्लायओव्हरखाली बांधकाम करायला परवानगी नसताना. या महत्त्वाच्या समस्येवर त्यांना तोडगा सापडला तो म्हणजे कंटेनरचा. ठाण्यातीलच नौपाड्यामध्ये चालणाऱ्या एका गुजराती शाळेचा कंटेनर या शाळेसाठी पालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आला. कंटेनरनंतर महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे सर्वेक्षणातून निवडलेल्या मुलांना एकाच जागी बसवून काही शिकविण्याचा. शाळेत अजिबात न गेलेल्या किंवा शाळेशी बराच काळ संपर्क तुटलेल्या मुलांना सुरुवातीपासून शिकवण्यापेक्षा पहिले काही दिवस खेळ, गाणी म्हणवून घेणं अशा गमतीजमतीद्वारे आवड लावण्याचा प्रयत्न केला गेला. पण थोडा वेळ झाला की मुले खेळता खेळता, गाणी ऐकतच झोपायची. सुरुवातीस त्यांची झोप पूर्ण होत नसेल म्हणून ती लगेच झोपत असावीत असे वाटले. पण हा प्रकार थोडा वेगळा असल्याचे भटू आणि शाळेच्या शिक्षिकांना लक्षात आले. यावर उपाय म्हणून त्यांनी या मुलांची आरोग्य तपासणी करायचे ठरवले. या तपासणीमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती उघड होत गेली. रस्त्याकडेलाच राहणं, तिथंच झोपणं यामुळे अनेक मुलांना उंदीरमामा चावून गेले होते. सर्व म्हणजे सर्वच मुलांना त्वचारोग होते. कित्येकांचे कान फुटले होते. दिवसभर बाहेर अरबट-चरबट खाणं किंवा शिळ्या अन्नामुळे पोटात जंतही मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यामुळे शिकवण्याआधी पहिली मोहीम आरोग्य सुधारण्याची हाती घेतली गेली. शाळेतच केस कापायची व्यवस्था करून सर्वांना नखे कापून अंघोळी घालण्यात आल्या. स्वच्छतेच्या धड्यांपासून सुरुवात करण्यात आली. या मुलांना रोज अंघोळ करण्यासाठी कोणतीही रोजची सोय नव्हती, त्यामुळे शाळेजवळ पाण्याची सोय करून त्यांना रोज अंघोळ करायला जागा दिली. पण शाळा म्हटलं की मुलांच्या अंगावर धड कपडे हवेत. या मुलांसाठी ठाण्यातील काही लोकांनी जुने कपडे आणूनही दिले. पण त्या कपड्यांमध्येही देणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे चांगला-वाईट फरक होताच. त्यामुळे सर्वांचे कपडे एकसारखे असावेत या कल्पनेला छेद जात होता. शेवटी ठाणे पालिका शाळांप्रमाणे या मुलांसाठी युनिफॉर्म शिवण्यात आले. मात्र कपडे धुवायचे असतात अशी कल्पनाही मुलांच्या डोक्यात नव्हती. एक कपडा अंगावर घातला की तो फाटेपर्यंत अंगावर वागवायचा, अगदीच जीर्ण झाला की फेकून दुसरा घालायचा एवढंच त्यांना माहिती होतं. युनिफॉर्म घरी (?) नेण्यास दिले तर ते उंदराने कुरतडण्याचीच शक्यता जास्त होती. त्यामुळे ही मुले दररोज शाळेत येऊन कपडे बदलतात, युनिफॉर्म शाळेतच ठेवतात. त्यांचा युनिफॉर्म धुऊन स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही शाळेनंच उचलली आहे. असे एकेक प्रयोग करत करत सिग्नल शाळा आकारास येत आहे. आता वेगवेगळ््या वयोगटातील मुलांना एकत्र शिकवणे तसं आव्हानच होतं. पण समर्थ भारतच्या शिक्षिकांनी तेही आव्हान स्वीकारलं आणि त्या आनंदानं येथे काम करू लागल्या.. सतत अ, आ, इ, ई पेक्षा रोचक पद्धतीने कसे शिकवता येईल याचा विचार तेथे कायमच सुरू असतो. या मुलांसाठी टाटा टेक्नॉलॉजीचा डिजिटल सिलॅबस विकत घेण्यात आला असून, आता तेथे प्रोजेक्टरच्या साहाय्याने शिकवले जाते. फळ्यापेक्षा प्रोजेक्टरवर, गाणी ऐकवून, चित्रांच्या मदतीने एखादी गोष्ट समजावून सांगितल्यास ही मुलं एकाग्र चित्ताने शिकतात असा अनुभव भटू आणि शाळेच्या शिक्षिकांना आला आहे. दररोज अंघोळ, प्रार्थना झाल्यावर प्रत्येक दिवशी चित्रकला, हस्तकला, वादन असे विविध विषयही शिकवले जातात. हे विषय शिकवण्यासाठी ठाण्यातील अनेक लोकांनी मदतीचा हात आपणहून पुढे केला. एक मुलगी तर या मुलांना कराटे शिकविण्यासाठीही आठवड्यातून एकदा आवर्जून येते. फ्लायओव्हरखाली असलेल्या मोकळ्या जागेतच या मुलांची कवायत घेतली जाते आणि बागेसारखी घसरगुंडी, झोपाळे अशी खेळणी बनवून शाळा अधिकाधिक आवडावी यासाठी भटू प्रयत्न करतो आहे. शाळेबाबत बोलताना भटू ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि उपआयुक्त मनीष जोशी यांच्या मदतीचा आवर्जून उल्लेख करतो. तंबाखू मळणारं बालपण सिग्नल शाळेतील मुले भीक मागायची, काही मुले गजरे वगैरे वस्तू विकायची. पण त्यापैकी बहुतेक मुलांना एकच पालक आहेत. दिवसभर एकटेच फिरत असल्यामुळे त्यांना व्यसनेही लवकर लागायची. एकदा प्रार्थना चालू असताना विशाल नावाचा मुलगा सतत आवंढा गिळत असल्याचं भटूने पाहिलं. त्याला विचारताच तो तंबाखू खात असल्याचं त्याच्या लक्षात आले. त्याची कौटुंबिक परिस्थिती काळजी करण्यासारखीच आहे. वडील जेलमध्ये आणि आईच्या सोबतीने फ्लायओव्हरखाली राहणं विशालच्या वाट्याला आलंय. थोड्याफार फरकाने सर्वच मुलांची ही स्थिती आहे. कौटुंबिक हेळसांड आणि व्यसनांचा या मुलांना लहानपणापासूनच त्रास सहन करावा लागतो. पण शाळा सुरू झाल्यापासून या मुलांचं भीक मागणं थांबलं आहे. भीक मागणं थांबलं.. आरती पवार ही समर्थ भारत व्यासपीठमध्ये पूर्वीपासूनच कार्यरत होती. पण शाळेची कल्पना पुढे आल्यानंतर तिने सर्वेक्षणापासून प्रत्येक टप्प्यावर उत्साहाने मदत केली. आज ती शाळेत सर्वांची लाडकी शिक्षिका झाली आहे. या मुलांना शिकविण्यासाठी पूर्वीचा शिकविण्याचा असलेला अनुभव कामास आला. ही मुलं थोडी वेगळी आहेत. शिकता शिकता झोपण्याची त्यांची सवयही पहिल्या काळात समजून घेणं थोडं अवघड गेलं. पण आता हळूहळू ही सवय कमी झाली आहे. आरती सांगते, या मुलांच्या पालकांनाही शाळेचे महत्त्व आता थोडे समजू लागले आहे. संध्याकाळीही मुलं शाळेत राहू शकतील का असं ते विचारतात. आरतीच्या मते या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्या प्रवासात आपला हातभार लागला यात खरा आनंद आहे. मुलांचं भीक मागणं बंद व्हावं यासाठी ती सतत प्रयत्न करते. कोणी मुलगा भीक मागत असेल तर त्याची इतर मुले स्वत: येऊन तक्रार करतात. शाळेत जेवणही सिग्नल शाळेच्या मुलांसाठी शाळेतर्फे दररोज वेगवेगळा आहार देण्यात येतो. दूध, फळे, चिक्की, लाडू, भात, खिचडी असा आहार बचतगटांच्या व इतर लोकांच्या साहाय्याने देण्यात येतो. एकेकाळी एका जागी स्वस्थ न बसणारी ही मुले, रोज दुपारी एक वाजला की एका रांगेत बसून वदनी कवल घेता म्हणत हा आहार घेतात.onkark2@gmail.com 

लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.