शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

नींद उडे ते उड जाए?-असं तुम्हीही म्हणता, मग पस्तावाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 6:58 PM

दिवस मावळला की आठवतं, इतकी कामं बाकी आहेत? मग दिवसभर काय केलं? झोपेला आपण इतकं गृहीत का धरतो? आणि मग रडतो की मला झोपच येत नाही.

ठळक मुद्देझोपेला पर्याय नाही आणि शॉर्ट कटदेखील नाहीच, हे नीटच लक्षात ठेवायचं. 

- प्राची पाठक 

‘झोप येत नाही’.. ही तक्र ार तर कायमच चर्चेत असते.  मात्र हे तपासून पाहिलं पाहिजे की आपण आपला स्क्रीन टाइम वाढवत झोपेचं खोबरं करतोय का?  म्हणजे झोपेचीदेखील एक भाषा असते. आपलं शरीर, आपली झोप आपल्याला काहीतरी सांगत असते, ते आपण ऐकतच नाही. तिची साद आपण ऐकतच नाही. अंधार पडत चालला की आपल्याला एकेक ऊत येतो जणू. मग स्क्रीनवर सिनेमे लाव, रात्नी उशिरा जेवणं कर, रात्नी उशिरार्पयतच्या पाटर्य़ा असं सगळं सुरू होतं. दिवसा कामं आटोपायला काय प्रॉब्लेम असतो? का टंगळमंगळ केली जाते? दिवस मावळला की जणू आपलं उजाडतं. आपल्याला रात्नीच उशिरार्पयत मित्नमैत्रिणींशी फोनवर बोलायचं असतं. राहून गेलेली एकेक कामं रात्नीच आठवायला लागतात. त्यात हातात फोन घेऊन नेट सर्फिग सुरू झालं की विचारूच नका ! त्याने झोपेचं खोबरं झालंच. 

हे सगळं आटोपून आपण झोपायला जाणार. आपली अपेक्षा असते की पलंगावर पडल्या पडल्या झोप यायला हवी. ती अपेक्षा पुरी होईलच असं नाही. मग ‘करवटें बदलते रहे, सारी रात हम’ अशा तक्र ारी सुरू होतात. सुरुवातीला आपण हे होत असेल बाबा, असं करत दुर्लक्ष करतो. मात्र रात्नी जास्त जागरण झालं, तर सकाळी उशिरा उठायची सूट त्यातून मिळवून घेतो. कधी कधी तर अनेक दिवसांची झोप एकदाच कधी काढून घेऊ, असे प्लॅन्स करत बसतो. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, जसं आपल्याला रोजची रोजच भूक लागते आणि ती रोजची रोजच भागवावी लागते, तसंच झोपेचंदेखील असतं. ती रोजची रोजच घ्यावी लागते. तिचा दर्जा जितका चांगला तितकं आपलं आरोग्य उत्तम असायची शक्यता जास्त. पलंगावर पडल्या पडल्या आपल्याला झोप येईलच असं नाही. अशावेळी झोप येत नाही, म्हणून आपण आणखीन अस्वस्थ होतो. कोणी म्हणतं काहीतरी वाचायला घ्या. वाचता वाचता झोप येईल. तेही आपण करून बघतो. त्याने कोणाला काही काळ झोप येईलसुद्धा आणि काहींची झोप आणखीनच उशिराने होईल. कारण आपण वाचन करून मेंदूला आणखीन चाळवून ठेवणार. स्टोरी चांगली असेल तर आणखीन जागून पुढचं पुढचं वाचत जाणार. त्यासाठी आपल्याला दिवा सुरू  ठेवावा लागणार किंवा एखादी स्क्र ीन ! म्हणजे त्याचा प्रकाश डोळ्यांवर पडत राहणार. लाइट सुरू ठेवून झोपी गेलो, तर आणखीन वेगळा गिल्ट येणार, वीज वाया घालवल्याचा. घरातल्या लोकांचा ओरडा पडणार. मग तो दिवा आपल्या बेडपाशी नाहीये, पडल्या पडल्या आपल्याला झोप येत नाही, असं चक्र सुरू होणार डोक्यात. म्हणजे काय आहे, ते न बघता प्रत्येक लहान सहान गोष्टीत आपण काय नाही ती गैरसोय शोधणार. आपल्याला झोप येत नाहीये, हा मूळ मुद्दा बाजूलाच राहणार. आपण आधी जाऊन बेड साइड दिवा विकत आणून ठेवणार. तो वापरला गेला, तर ठीक. नाहीतर, घरातल्या समृद्ध अडगळीत नवी भर!झोपेवर काम करायचं सोडून भलतंच काही आपण सुधारायला घेणार. झोप ही आपली शरीराची, मेंदूची गरज आहे तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  झोपेला पर्याय नाही आणि शॉर्ट कटदेखील नाहीच, हे नीटच लक्षात ठेवायचं. 

चांगल्या झोपेसाठी काय करता येईल?

* आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल आणि आपल्याकडे एखादी दुचाकी असेल, तर आपण चटकन दुचाकी काढतो आणि बाहेर जायला निघतो. कधीतरी बाहेर जावं लागायचं काही काम येईल बाबा, म्हणून आपण दुचाकीवर बसून राहत नाही. तसंच, कधीतरी येईल बाबा झोप असं म्हणत पलंगावर तासन्तास लोळायची वेळ येत असेल तर आपला हेल्थ अलार्म मोठय़ाने वाजायला हवा.* आपण झोपतो ती खोली किती स्वच्छ आहे, छताला जाळी जळमटी किती लागलीत, किती पसारा एकावर एक कपाटांवर कोंबून ठेवलेला आहे, तेही जरा बघू या. किमान सहा आठ दिवसांत पलंगावरची चादर धुवून बदलू या. नेटकी चादर टाकणं हे एक स्किल आहे, ते शिकू या. * एकूणच आपल्या घरी आपल्याला मोकळं, स्वच्छ आणि प्रसन्न वाटायला हवं. * बेडरूममध्ये किंवा जिथे झोपू, त्या जागीसुद्धा असा आस्थेटिक सेन्स वापरून बघता येतोच. मग खोलीचं तपमान, आपल्याला पंखा, एसी, उशी, पांघरूण वगैरे कसं लागतं, त्याचा विचार करायचा. त्यांची तजवीज करायची.* झोपायच्या आधी काही वेळ आपण स्क्रीन एक्स्पोजरपासून दूर राहून ट्रायल घ्यायच्या. * वेळच्या वेळी फोनमधल्या फॉरवर्ड मेसेजेसला आपण उत्तरं दिली नाहीत, तर काही कुठे आग लागत नसते, हे स्वत:ला बजावायचं. जे र्अजट असतं ते फोनवर थोडक्यात बोलून घ्यायची सवय करायची. म्हणजे स्क्रीन टाइम आटोक्यात ठेवता येतो. * झोपेच्या साधारण तासभर आधीपासून पलंग तयार करणं, झोपण्यापूर्वीची आपली वैयक्तिक जी कामं असतात, ती करायला घ्यायची. त्यानुसार आपला आहार झोपेच्या किमान दोन तीन तास आधीच आटोपून घ्यायचा. * हळूहळू आपल्या शरीराचे तापमान कमी झाले की आपण झोपेच्या गुहेत शिरायला लागतो.* आपल्याला त्या खोलीत कोणता आणि कसा डिम लाइट हवाय की पूर्ण अंधार हवाय, इथपर्यंत प्लॅन करत झोपेचा विचार करायचा. * आपली विशिष्ट खोली किंवा जागा, विशिष्ट पलंग किंवा गादी ठरावीक वेळेला आपण झोपेसाठीच वापरणार आहोत, असं वळण आपल्या शरीराला लावायचा प्रयत्न करायचा. * असं केल्याने या कुशीवरून त्या कुशीवर वळत बसायची सवय कमी होईल. * झोप येत नाही, म्हणून काय काय करू हे टेन्शन घेणं कमी होईल. * अमुक वेळी अमुक ठिकाणी पडलं की झोपलोच समजा, इतकी शरीराला शिस्त लावायची. * रोज एका वेळी झोपा, म्हणजे अगदी मिनिट काटा पाहत झोपायचं नाहीये. परंतु, साधारण आपली एक वेळ ठरवून घ्यायची आणि त्यानुसार जरा आधीपासून झोपेची तयारी सुरू  करायची.* किमान सहा ते आठ तास छान झोप येईल, अशाप्रकारे सर्व प्लॅन आखायचे आणि ते पाळायचा प्रयत्न करायचा. * आपल्याला काहीतरी कामाने बाहेर जावं लागेल म्हणत आपण जसं आधीपासूनच दुचाकीवर जाऊन बसत नाही, तसंच कधीतरी झोप येईल, लोळत पडून राहू पलंगावर, या सवयीवर मात करायचा प्रयत्न करायचा.