आपले मोबाइल जेव्हा ‘स्मार्ट’ नव्हते तेव्हाचे दिवस आठवतात? स्नेकसारखा एखादाच गेम थोडेच कॉण्टॅक्ट्स सेव्ह करण्याची सोय. पॉलिफोनिक रिंगटोन्स, पिवळ्या छोटय़ा स्क्रीन. त्यात फोन बदलल्यावर कॉण्टॅक्ट ट्रान्सफर करणं म्हणजे प्रचंड जिकिरीचं काम. त्यात एक गोष्ट बरी होती, सगळेच फोन नोकियाचे असायचे. त्यामुळे ब:याच गोष्टी सुकर असायच्या. किमान फोनबद्दल तक्र ार करायची झाल्यास सगळे समदु:खी भेटायचे.
नंतर स्मार्टफोन आल्यावर सगळ्या जगाचा जणू कायापालटच झाला. टचस्क्रीन अॅप्स आणि अॅण्ड्रॉईडमुळे फोनमधील कोणतीही गोष्ट मनाजोगती बदलण्याचे स्वातंत्र्य हातात आले.
पण एव्हाना तुम्ही ओळखले असेलच या सगळ्या सुधारणांमध्ये दोन गोष्टी मात्न पार बिघडल्या. एक म्हणजे बॅटरी आणि दुसरं म्हणजे या टचस्क्रीन फोनचा नाजूकपणा.
पण फिकर नॉट!
टचस्क्र ीनचे आयुष्य जरी आपापल्या वापरावर आणि काळजी घेण्यावर अवलंबून असलं, तरी बॅटरी लाइफ मात्न काही सोप्या युक्त्या वापरून नक्कीच वाढवता येतं.
बॅटरीचे सर्वात मोठे तीन शत्नू
स्क्र ीन, डाटा, जीपीएस
अॅण्ड्रॉईड फोनमध्ये सगळ्यात जास्त बॅटरी खर्च होते ती या तीन गोष्टींसाठी. त्यामुळे यांच्या काही सेटिंग्ज बदलल्यावर बॅटरीलाइफमध्ये ब:यापैकी फरक जाणवेल.
मोबाइल स्क्र ीन
टचस्क्रीन हे स्मार्टफोनचे अविभाज्य अंग आहे. आता अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमची आणि अॅप्सची बांधणीच टचस्क्र ीनला गृहीत धरून होते. त्यामुळे बटनांचा कीपॅड असलेले फोन आता फारसे बनतच नाहीत. सरासरी चार इंच मोठय़ा असलेल्या या स्क्रीनच्या टचसाठी आणि स्क्रीन ब्राइटनेस कायम ठेवण्यासाठी सर्वात जास्त बॅटरी जाते.
यावर ब्राइटनेस सेटिंग ऑटो मोडवर ठेवण्याचा सल्ला बरेच जण देतात. परंतु त्यापेक्षाही परिणामकारक मार्ग म्हणजे ब्राइटनेस ऑटो न ठेवता तो मिनीममच्या जवळ पण आपल्या डोळ्यांना कम्फर्टेबल वाटेल अशा लेव्हलवर ठेवायचा. जेव्हा आपण अधिक प्रकाशात जातो तेव्हा तो गरज भासल्यास वाढवायचा. यामुळे आपल्या दृष्टीने एक स्टेप वाढली तरी आपल्या डोळ्यांना आरामदायक वाटेल असा ब्राइटनेस मिळतो आणि गरज नसलेल्या एक्स्ट्रा ब्राइटनेसमुळे जाणारी बॅटरी वाचते.
डाटा
वायफाय आणि 2जी/3जी डाटा यामुळेही ब:यापैकी बॅटरी जाते. जेव्हा आपण कनेक्टेड असतो तेव्हा डाटा देवाणघेवाणीसाठी बॅटरी जातेच पण जेव्हा आपण कमी कव्हरेज किंवा कव्हरेज नसलेल्या भागात असतो तेव्हा नेटवर्क शोधण्यासाठी तर जरा जास्तच बॅटरी जाते. यातही सर्वात जास्त 3जीसाठी, त्यापेक्षा कमी 2जीसाठी आणि त्यापेक्षा कमी वायफायसाठी बॅटरी लागते. त्यामुळे अगदीच गरज नसते तेव्हा आणि बॅटरी कमी असताना आधी वायफाय आणि मोबाइल नेटवर्क बंद करून टाका.
जीपीएस
तुम्ही कुठे आहात त्या ठिकाणाला अनुसरून माहिती आणि सेवा देणो याला आता प्रचंड महत्त्व आले आहे. गुगल नाऊ, मॅप्स, फेसबुक, ट्विटर यांसारखे अॅप्स तुमच्या लोकेशन अॅक्सेसचा ब:यापैकी उपयोग करतात. परंतु जीपीएस उपग्रहाशी कनेक्ट होण्यासाठी आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी ब:यापैकी बॅटरी खर्च होते. हे टाळण्यासाठी लोकेशन पूर्णपणो ऑफ ठेवणो सर्वात चांगले. लोकेशन लागणारी आणि आपल्या दृष्टीने अगदी महत्त्वाची असलेली सव्र्हिस म्हणजे मॅप्स आणि नेविगेशन. बाकीच्या अॅप्समधून लोकेशनवर आधारित मिळणारी माहिती ही ब:यापैकी व्हॅल्यू-अॅड किंवा अगदीच अनावश्यक असणारी असते. त्यामुळे मॅप आणि नेविगेशन वापरतानाच जीपीएस सुरू केलेलं सर्वात चांगलं. अॅण्ड्रॉईडच्या नवीन आवृत्त्यांमध्ये लोकेशन ऑन आणि ऑफ याबरोबरच बॅटरी सेव्हिंग अशी आणखी पायरी उपलब्ध आहे. लोकेशन अगदीच बंद ठेवायचे नसल्यास या फिचरचा वापर करता येईल.
बॅटरी वाचवायच्या काही
स्मार्ट टीप्स
1) अॅण्ड्रॉईडच्या सेटिंगमध्ये बॅटरी नेमकी कशामुळे जास्त खर्च होते ते कळते. यात बहुतेक वेळा गुगल सव्र्हिसेस, स्क्र ीन, व्हॉइस कॉल्स यांसारख्या गोष्टी दिसतील. यापैकी आपण फक्त स्क्र ीनच्या बॅटरीचा वापर नियंत्रित ठेवू शकतो.
2) फेसबुक आणि गुगल क्र ोमसारखे काही अॅप्स हे बॅटरीखाऊ असतात. आपण जरी ते अॅप बंद केले तरी प्रत्यक्षात ते अॅप पडद्यामागे सुरूच असते. त्यांना पूर्ण बंद करण्यासाठी तुमच्या अॅप ड्रॉअरमध्ये जाऊन त्या अॅपच्या आयकॉनला लॉँगप्रेस करून ठेवा. स्क्र ीनच्या वरच्या भागात वल्ल्रल्ल23ं’’ आणि अस्रस्र कल्ला असे दोन ऑप्शन्स अवतीर्ण होतील. त्यातील अस्रस्र कल्ला वर लॉगप्रेस केलेला आयकॉन तसाच ड्रॅग केल्यावर मग येणा:या स्क्रीनवर ऋ1ूी र3स्र या बटनवर टॅप करा. यामुळे ते बॅटरीखाऊ अॅपच्या बहुतेक सगळ्या मुख्य प्रोसेसेस पूर्णपणो बंद होतील.
3) डाटा ऑटो सिंक बंद करा. अॅण्ड्रॉईडच्या सेटिंगमध्ये अूू4ल्ल32 या सेक्शनमध्ये तुम्हाला डाटा सिंक करणा:या अॅप्सची यादी दिसेल. या सगळ्यांचे किंवा गरज नसणा:या अॅप्सचे ऑटो सिंक बंद करा. यामुळे तुमचे नेटपॅक तर वाचेलच; शिवाय बॅटरी लाइफपण वाढेल.
4) अॅण्ड्रॉईडच्या सेटिंगमध्ये डिस्प्ले सेटिंग्जमध्ये र’ीस्र किंवा रू1ील्ल43 ळ्रेी असा एक ऑप्शन असतो. तो शक्य तितका कमी सेकंदांचा ठेवा.
5) ब:याच अॅप्सच्या नोटिफिकेशनमुळेही स्क्र ीन ऑन होतो. अॅप सेटिंगमध्ये जाऊन हे थांबवता येते. अन्यथा अनावश्यक नोटिफिकेशन बंद करण्याचा ऑप्शन अस्रस्र कल्ला मध्ये आहे.
6) अल्ल1्रि िछ’’्रस्रस्र मध्ये अॅप्सची नोटिफिकेशन्स नियंत्रित करण्यासाठी सोपा मार्ग आहे त्याचा वापर करा. बॅटरी सेव्हर मोड आहे, त्याचा वापर करा.
7) अॅप्स कायम अपडेटेड ठेवा. परंतु ब:याचदा अॅप्स ऑटो-अपडेट मोडवर ठेवल्यास अचानक कधीतरी 1क्-12 अॅप्स अपडेट व्हायला सुरू होतात. यात बॅटरी आणि डाटा दोन्ही जातात. प्ले स्टोअरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे बदलता येतं.
8) डार्क रंगाच्या वॉलपेपरसाठी कमी बॅटरी खर्च होते.
9) होम स्क्र ीनवर असलेल्या विजेटसाठी जास्त बॅटरी खर्च होते.
1क्) कॉल, नोटिफिकेशन्स यांच्यासाठी व्हायब्रेशन्स जर ऑन असतील तर ती बंद करा.
11) प्रवासात ब:याचदा नेटवर्कनसते किंवा कवरेज अगदीच कमी असते. अशा वेळी शक्य असल्यासअ्र1स्र’ंल्ली टीि ऑन करा.
बॅटरी-सेव्हर अॅप्स
या लेखात सांगितलेल्याच काही सेटिंग सोप्या रीतीने बदलण्यासाठी काही अॅप्स प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. परंतु हे अॅप्स कॉल क्वालिटी आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर विपरीत परिणाम करतात. याशिवाय बरेच अॅप्स तुमची माहिती चोरणो वगैरे प्रकारही करतात. त्यामुळे त्यांचा वापर जपून करा.
बॅटरीचं आयुष्यमान वाढवता येतं !
बॅटरी चार्जिग करण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे ती 2क् ते 25 टक्के पर्यंत डिस्चार्ज होऊ द्यायची. त्यानंतरच फोन चार्जिगला लावून पूर्ण 1क्क् टक्के चार्ज करणं. ‘दिसला चार्जर की लाव चार्जिगला’ या सवयीमुळे बॅटरी लवकर बदलावी लागते. याशिवाय रात्नी झोपताना चार्जिगला लावून सकाळी उठल्यावरच चार्जिंग बंद करायचं हे बॅटरीसाठी फार घातक आहे.
- गणोश कुलकर्णी