शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

स्मार्टफोन तुमचं आयुष्य कमी करतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 3:29 PM

आपण जो फोन चोवीस तास बाळगून असतो, तोच आपला वैरी झाला तर?

- मयूर पठाडे

खरंच सांगा, स्मार्टफोनशिवाय तुमचं पान हलतं? फोन नुसता दोन मिनिटं जरी नजरेआड गेला तरी साऱ्या विश्वापासून आपण तुटल्याचा भास आपल्याला होतो. नुसता भास नाही, अनेकांच्या दृष्टीनं ते वास्तवच असतं आणि आहे. अनेक कारणं आहेत, पण आजकाल अगदी कुमारवयीन आणि लहान मुलांच्याही हातात स्मार्टफोन दिसतो.. अर्थातच या फोनचे अनेक उपयोग आहेत. शैक्षणिक उपयुक्ततेपासून, तर जगाशी कनेक्ट राहण्यापर्यंत. आणि तुमची, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, अनेक गोष्टी या स्मार्टफोननं सुलभ, अगदी सोप्या करून टाकल्य आहेत.

पण कोणतीही गोष्ट एका मर्यादेत असली तरच त्याचा फायदा होतो. स्मार्टफोनच्या बाबतीतही ते खरं आहे. स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत तसे महाभयंकर तोटेही आहेत. हा फोन जसा तुम्हाला जगाशी जोडतो तसाच तो तुम्हाला जगातून उठवूही शकतो.आयआयटी मुंबईचे प्रोफेसर गिरीश कुमार यांनी स्मार्टफोनच्या वापराचे, विशेषत: कुमार आणि तरु णांवर काय दुष्परिणाम होतात याचा चिकित्सक अभ्यास करून तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे.गिरीश कुमार यांच्या अभ्यासानुसार, स्मार्टफोन कितीही उपयुक्त असला तरीही दिवसभरात अर्धा तासापेक्षा त्याचा जास्त वापर करणं म्हणजे तुमच्या जिवाशीच खेळ होऊ शकतो.

स्मार्टफोनमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं तुमचं आयुष्य..स्मार्टफोनच्या वापरामुळे टीनेज मुलांमध्ये मेंदूच्या कॅन्सरचं प्रमाण तब्बल ४०० टक्क्यांनी वाढू शकतं. कोवळ्या वयात मुलांची कवटीही तुलनेनं विकिसत झालेली नसते. मोबाइलच्या रेडिएशनचा थेट त्यांच्या मेंदूवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यावरही या रेडिएशनचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो.आपल्या डीएनएवरही हे रेडिएशन परिणाम करतात आणि त्यामुळे होणारे नुकसान कधीच भरून न येणारे असते. आपल्या झोपेचं सारं शेड्यूल बिघडतं आणि त्यासंबंधीचे विकार जडतात. अल्झायमर, पार्किन्सन्स आणि मेंदूचे विकार वाढीला लागतात.