पोर्नबंदी हा विषय गेले काही दिवस गाजतोय. व्यक्तिस्वातंत्र्याचे नारे एकीकडे आणि दुसरीकडे मानसिक आरोग्यासह संस्कृती वाचवण्या-बुडवण्याचे प्रश्न.
असा बराच खल चालला आहे.
जो तो आपापली बाजू लावून धरतोय,
सोशल मीडियावर चर्चेचे रतीब आणि जोक्सचा मारा होतो आहे.
मात्र ज्यांच्या जगण्याशी हा विषय निगडित आहे, अशा तरुण मुलामुलींना कुणी काही विचारतंय का पण?
इंटरनेट आणि मोबाइल अॅडिक्शन या विश्वाचा
एक भाग म्हणता म्हणता पोर्नोग्राफिक अॅडिक्शन अनेकांच्या आयुष्यात घुसते.
‘तसल्या’ साइट्स पाहण्यासाठी घरातून पैसे चोरून सायबर कॅफे गाठणारे,
मोबाइलवर रात्रीबेरात्री ‘ते’ पाहणारे,
बेचैन होणारे,
त्यातून मित्रंच्या मोबाइलमधून हॉट व्हिडीओ ढापणारे.
अशा अनेक कहाण्या तरुण मुलं आणि मुलीही
अधनंमधनं ऑक्सिजनला लिहून कळवतात.
तुमचा अनुभव काय सांगतो?
तुम्ही पाहता त्या साइट्स?
त्याचं व्यसन लागलंय?
ते पाहतो आपण म्हणून गिल्टीबिल्टी वाटतं की असं वाटतं गिल्टी वाटायचं काय कारण? साधं मनोरंजन तर आहे?
त्यातून तुमची लाइफस्टाईल, खाण्यापिण्याचे-झोपण्याचे वेळापत्रक बदलले?
तुम्ही एकेकटे झालात?
मित्रंशी बोलणं टाळू लागलात की तसलंच काही पाहणा:या मित्रंसोबत राहू लागलात?
नेमकी काय उलथापालथ होते या व्यसनानं आयुष्यात?
की काहीच घडत नाही?
एक मनोरंजन यापलीकडे त्याला तुम्ही महत्त्व देत नाही?
बोलता मित्रंशी खुलेपणानं त्याविषयी?
तुमचा अनुभव काय म्हणतो?
मोकळेपणानं लिहा.
चांगलं-वाईट, नैतिक-अनैतिक, कायदेशीर-बेकायदा अशी चर्चा न करता,
फक्त तुमच्या अनुभवाविषयी लिहा.
तुमचे प्रश्न आणि त्यातून अनुभवलेल्या बेचैनीविषयी.
नाव लिहाच असा आग्रह नाही.
नाव-गाव लिहा अगर लिहू नका पत्रवर.
फक्त मन मोकळं करा.
पत्ता : संयोजक, 'ऑक्सिजन' , लोकमत भवन, बी-३, एम.आय.डी.सी, अंबड, नाशिक - ४२२०१०
अंतिम मुदत- 20 ऑगस्ट 2015
पाकिटावर- ‘तसलं काही’ असा उल्लेख अवश्य करा.