शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

कभी तो बनेगी अपनी बात.

By admin | Published: April 22, 2016 9:02 AM

समजा, आपण प्रवास करतोय. एखादा पत्ता शोधतोय. तो पत्ता सापडला नाही तर आपण रस्त्यातच बसकण मारून पुढे जाणं टाळतो का? मग करिअरच्या वाटेवर एखादा पत्ता चुकला, रस्ता भरकटला, तर ती वाटच सोडून घरी का बसता?

करिअरच्या वाटेवर लाल सिग्नल दिसत असला तरी तो कधी ना कधी हिरवा होईल. वाट पाहा, रस्ता आणि गाडी दोन्ही सोडून पळू नका.
 
कायम तडाखेबंद खेळासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू एखाद-दुस:या वेळेला शून्यावर बाद झाला तर त्याला त्याचं अपयश म्हणता येईल का?
**
परराष्ट्र धोरणात अत्यंत सावधगिरीने पावलं उचलावी लागतात. एखादा देश एखाद्या परिषदेत  आंतरराष्ट्रीय धोरणात आपली मतं पटवून देऊ शकला नाही तर त्या देशाने स्वत:ला अपयशी समजायचं असतं का?
***
एखादा सिनेमा सुपरडुपर फ्लॉप झाला तर आजवरचा सुपरस्टार लगेच फ्लॉप ठरतो का?
***
या प्रश्नांची उत्तरं जर ‘नाही’ अशी असतील तर मग 
एखाद्या शाखेकडे जाण्याचा, एखादा अभ्यासक्रम निवडण्याचा आपला निर्णय चुकला, तर आपण आयुष्यात कायमचे अपयशी ठरतो का?
- नाही ठरत!!
मग लगेच स्वत:ला कायमस्वरूपी ‘कंडम’ ठरवण्याचा आणि मोडीत काढण्याचा हताश मार्ग अनेकजण का स्वीकारतात?
निदान गेल्या काही दिवसांपासून या लेखाला प्रतिसाद म्हणून येत असलेल्या तुमच्या ईमेल्स तरी हेच सांगतात. आणि एका चुकीसाठी अनेकजण स्वत:ला कायमचं हरवून बसताना दिसतात.
म्हणून आज थेट त्याविषयीच बोलू.
समजा, आपण प्रवास करतोय. एखादा पत्ता शोधतोय. तो पत्ता सापडला नाही तर आपण रस्त्यातच बसकण मारून पुढे जाणं टाळतो का? 
थोरामोठय़ांनी ‘आयुष्य’ या एका जडणघडणीबद्दल खूप काही लिहून- सांगून ठेवलंय. जर आयुष्य हा एक प्रवास असेल तर त्यात खाचखळगे असणारच. सिग्नल्स असणार, वेडीवाकडी वळणं असणार, घाटातले गोल गोल फिरवणारे रस्ते असणार, अगदी चकवेदेखील असणार. पण हे सगळं आहे, म्हणून कधीतरी कोणीतरी प्रवासी रस्त्यातच थांबून राहिलाय, असं ऐकलंय का कधी?
गाडी चालवता तुम्ही, रस्त्यावर सिग्नल आहेत म्हणजे केवळ लाल आणि पिवळा सिग्नलच कायम असतो का? हिरवा सिग्नलही असतोच. घाटात बोगदेही असतात, डायव्हर्जन्सही असतात. उलट एक लक्षात घ्यायला हवं की, घाटात - जिथे जास्त अवघड वळणं असतात, तिथे विविध सूचनाही असतात. आपली वाट सोपी होईल यासाठी मार्गदर्शक फलकही असतात. त्यामुळे जिथे वाट दिसत नाही, तिथेही कोणीतरी असतंच. आपण कोणाचीही मदत घेऊ शकतो. आपल्या संकटांवर मात करून मार्ग काढू शकतो.  
तेव्हा प्रवास करताना लक्षात घ्यायलाच हवं की हे धोके तात्पुरते असतात. तसंच अपयशाचंही. हे अपयशही फारच तात्पुरतं असतं. ते आपल्याला शिकवतं की जिंकणं आणि हरणं हा या प्रवासाचाच एक भाग आहे. कधीही आणि काहीही स्थिर नसतं. काळाच्या हातात कधी यश आहे तर कधी अपयश. अपयश आपल्याला काय शिकवतं? आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा तपासून बघायला शिकवतं. आपल्या माहितीत यामुळे भर पडते. आपण यामुळे जास्त शांत होतो.
यश आणि अपयश यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोनही अशा स्पर्धेतूनच तयार होतो. 
 कोणत्याही खेळाच्या स्पर्धामधून जशा आपण आशाही बाळगायला शिकतो आणि निराशा ङोलायला शिकतो. जिंकलो काय किंवा हरलो काय, कसं खेळतोय हेही महत्त्वाचं आहेच की! 
त्यामुळे आधी निराशा झटका आणि झडझडून कामाला लागा.
हा करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्याचा पहिला टप्पा आहे असं समजा!
 
करिअरच्या वाटांवरचे
चकवे
 
 आज खूपशा मुला-मुलींपुढे काही प्रश्न कॉमन आहेत. आणि ते प्रश्नच सांगतात की, आजच्या तरुणाईपुढे जशा आशा-आकांक्षा आहेत, तशा खूप सा:या संधी आहेत. मागच्या पिढीपेक्षा खूपशी दारं त्यांच्यासाठी उघडी आहेत. पण त्याचबरोबर इतरांच्याही त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. आणि त्याहीपेक्षा स्वत:कडूनही त्यांच्या फार जास्त अपेक्षा आहेत. खरंतर स्वत:कडून अपेक्षा असणं ही अत्यंत आशावादी गोष्ट आहे. पण मग अपेक्षा पूर्ण करताना अडचणींचा विचारही करून ठेवायला हवा. त्या अडचणी येणारच हे मान्य करायला हवं. आणि त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वत:ला थोडा वेळही द्यायला हवा. 
काही चुकलं तर स्वत:ला लगेचच धारेवर धरायचं नाही. तसंच, एखादी- दुसरी- तिसरी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून स्वत:ला अपयशी समजायचं नाही.
हमखास त्रस देतात असे प्रश्न
* करिअरची निवड. जे निवडलंय ते योग्य आहे का, की दुसरंच काहीतरी निवडायला हवं होतं, हा प्रश्न छळतो.
* करिअरची केलेली निवड योग्य आहे की चुकली आहे, हा प्रश्न.
* करिअर निवडलं तर आहे, पण परीक्षांमध्ये सातत्याने अपयश येतं आहे.
* आवडीच्या विषयात शिक्षण घेऊन नोकरी मिळवली आहे, पण या दोन्हीचा संबंध नाही, त्यामुळे काय करावं याबद्दल द्विधा मनस्थिती.
 
 
आपला फॉम्यरुला, आपल्यासाठी!
 
यश आणि अपयशाला सामोरं जावं लागणारच आहे, तर दोन्हीला सामोरं जाण्यासाठी काही गोष्टी कराच.
* एखाद्या छोटय़ा गोष्टीतलं यशही साजरं करा. स्वत:ला शाबासकी द्या.
* आयुष्यातल्या एखाद्या अपयशातून काय शिकलात, हे कोणाला तरी सांगा.
* आपल्या ध्येयार्पयत जाण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या. खूप मेहनत करा.
* जेव्हा एखाद्या गोष्टीत यश मिळतं तेव्हा मनात काय भावना आल्या ते लिहून ठेवा. हे यश मिळवण्यासाठी किती आणि कोणत्या अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली हेही लिहा. 
* ज्या ज्या वेळी अपयशाला सामोरं जाण्याची वेळ येईल तेव्हा ते वाचा.
 
 
 
 
डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
 
drshrutipanse@gmail.com